Shuru
Apke Nagar Ki App…
बीड शहरात भीम जयंती.. रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी यांनी धरला ठेका..! बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी केला तुफान डान्स..!
Mahesh Mangrulkar
बीड शहरात भीम जयंती.. रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी यांनी धरला ठेका..! बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी केला तुफान डान्स..!
More news from Beed and nearby areas
- बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी केला तुफान डान्स..!1
- “जिद्द, चिकाटी आणि संघर्ष यांची सांगड घातली तर यश नक्की मिळते” याचा जिवंत आदर्श म्हणजे शेख वसिम २०१३ पासून पाटोदा ग्राम पंचायत ते नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून रोजदारी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शेख वसिम यांची अखेर अधिकृत नगरपंचायत विजतंत्रीपदी समावेशन करण्यात आले आहे. मात्र या यशामागे अनेक वर्षांचा खडतर संघर्ष दडलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोजदारी पद्धतीवर काम करत असताना वसिम यांनी केवळ आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नाही, तर कायमस्वरूपी नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला. स्थानिक प्रशासनापासून छत्रपती संभाजीनगर आणि मंत्रालयापर्यंत विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत त्यांनी आपली लढाई सुरू ठेवली. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना न्यायालयीन लढाही त्यांनी दोन वर्षे जिद्दीने लढला. अनेकांनी “हा नाद सोड” असा सल्ला देत हेटाळणी केली, मात्र वसिम यांनी आपल्या ध्येयावरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही. संकटांच्या वादळातही त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि अखेर न्यायालयीन लढ्यात यश मिळवत त्यांनी आपले स्वप्न साकार केले. आज त्यांच्या समावेशनाची अधिकृत घोषणा होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या संघर्षाची दखल घेत भाई विष्णुपंत घोलप,पाटोदा तालुका औद्योगिक बहुउदेशीय ग्रामीण सहकारी संस्थेचे चेअरमन डिगंबर नाईकनवरे, पत्रकार हमिदखान पठाण, पत्रकार जावेद शेख, मोसिन भाऊ जनतावाले, यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत सत्कारही केला. शेख वसिम यांच्या सह रावसाहेब काळे यांची पंप ऑपरेटर, चांगदेव अडागळे यांची पंप ऑपरेटर, सुनिल चौरे यांची पंप ऑपरेटरपदी समावेश करण्यात आला असुन या सर्वांचा प्रवास केवळ यशाची कहाणी नसून, संकटांवर मात करून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1
- जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे सुरू असलेले जलसमाधी आंदोलन स्थगित सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केलं होतं मागण्या मान्य; आंदोलन स्थगित दरम्यान, प्रशासनाकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर युवा शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. घनसावंगी चे तहसीलदार रमेश पागोटे व गटविकास अधिकारी प्रदीप यांच्या मार्फत संबंधित पत्र स्वीकारण्यात आले. या निर्णयानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत “शेतकरी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा दिल्या. गुंज परिसरातील या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.1
- छत्रपती संभाजीनगर मधील छावणी परिसर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची पायाभरणी करत असताना छावणी येथील बंगलो नंबर नऊ येथे ते राहत होते मात्र सध्या त्या बंगलोची बिकट परिस्थिती झाल्याचंही सांगण्यात येत आहे1
- छत्रपती संभाजी नगर मधील पत्रकार:- सुशील नावकर छत्रपती संभाजी नगर मधील रहिवाशी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व जन्मदिवस विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले गायन पार्टी तसेच डीजे लावून नाचणे रोड शो करणे व काही ठिकाणी अन्नदान व काही स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर मधील अनेक ठिकाणी हे बघायला मिळाले तसेच रमाबाई आंबेडकर नगर येथे डीजे लावून व फटाकड्याची आतिषबाजी करत सण साजरा करण्यात आला तसेच शाहूनगर येथे तसेच करण्यात आले अंबिका नगर येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या गाण्यांचे कार्यक्रम घेण्यात आले तसेच रोडशोही करण्यात आला मिरवणूक काढण्यात आल्या व सर्व नागरिकांनी उत्साहात साजरी करण्यात आली3
- बदनापूर जिल्हा जालना ढासला येथील सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ढासला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. ज्ञान, समता आणि न्याय यांचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या महामानवाच्या विचारांनी कार्यक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. गजभार व्ही. पी. यांनी अत्यंत ओघवत्या, आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी शैलीत केले. त्यांच्या नेटक्या व सुसंगत निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एकसंधता लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर करत बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. तसेच, विद्यार्थ्यांनी सादर केलेले भीमगीत, गीतगायन आणि नृत्य यांमुळे कार्यक्रमात उत्साहाची रंगत वाढली व उपस्थितांची दाद मिळाली. ज्ञानाचा दीप लावून अंधःकार दूर करणारे, समानतेचा मार्ग दाखवणारे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे महामानव म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजही प्रत्येक पिढीसाठी दिशादर्शक ठरत आहे. त्यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम स्तुत्य ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बचकूल ए. एस. होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धनाड आर. व्ही. उपस्थित होते. यावेळी श्री. भोवते एन. बी. यांनी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. व्यासपीठावर श्री. नलावडे पी. आर., श्री. शिंदे एस. एस., श्री. कदम एस. बी., श्री. गायकवाड एम. डी., श्री. कुऱ्हे एल. व्ही., श्रीमती. भोईटे एस. आर., श्रीमती. दुबे डी. वाय., श्रीमती. दराडे ए. जे. व श्री. गाडेकर एस. डी. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री. नालिंदे एम. एस. यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.3
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1