भारताची १६ वी जनगणना – नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा भारताची १६ वी जनगणना देशभरात सुरू असून, यावर्षी नागरिकांना ‘Self Enumeration’ अर्थात स्वतःची माहिती स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी 15 मेपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. त्यानंतर प्रगणक प्रत्येक घरापर्यंत पोहोचून जनगणनेची माहिती संकलित करतील. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. जनगणनेतून संकलित होणारा डेटा हा शासनाच्या विविध विकास योजनांचे नियोजन, धोरणनिर्मिती आणि निर्णय प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय उपक्रमात जबाबदारीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 🔗 Self Enumeration साठी संकेतस्थळ: 👉 https://se.census.gov.in 📢 चला, अचूक माहिती देऊया – विकसित भारत घडवूया ! #जनगणना2026 #CensusIndia #SelfEnumeration #DigitalIndia #ViksitBharat #Ahilyanagar #PublicParticipation #CitizenFirst #DataForDevelopment #माझीजनगणना #IndiaCounts

- भारताची १६ वी जनगणना – नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा भारताची १६ वी जनगणना देशभरात सुरू असून, यावर्षी नागरिकांना ‘Self Enumeration’ अर्थात स्वतःची माहिती स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी 15 मेपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. त्यानंतर प्रगणक प्रत्येक घरापर्यंत पोहोचून जनगणनेची माहिती संकलित करतील. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. जनगणनेतून संकलित होणारा डेटा हा शासनाच्या विविध विकास योजनांचे नियोजन, धोरणनिर्मिती आणि निर्णय प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय उपक्रमात जबाबदारीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 🔗 Self Enumeration साठी संकेतस्थळ: 👉 https://se.census.gov.in 📢 चला, अचूक माहिती देऊया – विकसित भारत घडवूया ! #जनगणना2026 #CensusIndia #SelfEnumeration #DigitalIndia #ViksitBharat #Ahilyanagar #PublicParticipation #CitizenFirst #DataForDevelopment #माझीजनगणना #IndiaCounts1
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिरूर पोलीस उपविभागात पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. साईदीप सह्याद्री हॉस्पिटल, अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तपासण्या केल्या. या शिबिरात डॉ. अनिकेत कुऱ्हाडे, डॉ. कस्तुरी कुऱ्हाडे, डॉ. स्मिता वाघमोडे, डॉ. गौरी कोठारी, डॉ. हेमांगी चव्हाण व अक्षय वाघमोडे यांनी सहभागी होत उपस्थितांची बीपी, शुगर, ईसीजी तसेच रक्त तपासण्या करून आवश्यक समुपदेशन व मार्गदर्शन केले. शिरूर तालुक्यातील पोलीस ठाण्यांतील सुमारे ११५ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कुटुंबीयांसह या शिबिराचा लाभ घेतला. तसेच पत्रकारांनीही सहभाग नोंदविला. कार्यक्रमास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.2
- छत्रपती संभाजी नगर मधील अतुल सावे साहेब व माननीय संजयजी शिरसाट यांच्या हस्ते शुभारंभ उपस्थित माननीय कल्याणजी काळे साहेब व माननीय अनुराधाताई चव्हाण राजगुरू साहेब तसेच राजेंद्र जंजाळ साहेब तसेच माननीय सर्व पदाधिकारी व आयुक्त साहेब तसेच सर्व भागातील प्रभागातील झोनल व प्रभा ग अधिकारी तसेच नगरसेवक हे सगळ्यांनी उपस्थित होते व कामगारांना गाड्या सोपवण्यात करण्यात आला व गाड्या वाटप करण्यात आले व आज कामगार दिनानिमित्ताने कामगारांच्या हक्कासाठी व नवीन कामगारांना संधी देणे देण्यात आली तसेच महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन घंटागाडी जेसीबी टिप्पर 407 व टाटा एसी व टाटा एसी ev छत्रपती संभाजी नगर मधील प्रभागांमध्ये रूट मॅप सहित नागरिकांना सेवेसाठी देण्यात आले तसेच4
- नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला2
- ------- पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा शहरातील महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पावन वास्तव्याने धन्य झालेल्या श्रीकृष्ण मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भक्तनिवास वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या वेळी बोलताना आमदार धस म्हणाले की सन २०१९-२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना श्री.देवेंद्रजी फडणवीस व पर्यटन मंत्री मा.श्री.जयकुमारजी रावल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागाच्या विशेष योजनेतून मंजूर ₹२.५१ कोटी निधीतून सुसज्ज हॉल, निवासी खोल्या, टॉयलेट-बाथरूम सुविधा, संरक्षण भिंत, पाणी फिल्टर आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. नानासाहेब डिडुळ, सतीश बप्पा जाधव व सहकाऱ्यांनी अत्यंत गुणवत्तापूर्ण काम करून पाटोद्यात एक सुंदर वास्तू साकारली आहे. महानुभाव पंथाची समता, साधेपणा व सर्वसमावेशकता अधोरेखित करत, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी मराठीतील ‘लीळाचरित्र’ च्या माध्यमातून दिलेला सामाजिक संदेश आज ही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. पाटोदा हे त्यांच्या वास्तव्याने पवित्र स्थळ असून, या ठिकाणाचा विकास आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी आमदार सुरेश आण्णा धस यांनी व्यक्त केला. राज्य शासनाकडून महानुभव पंथ व श्री चक्रधर स्वामी मंदिर विकासासाठी मोठा निधी मंजूर झाल्याने भविष्यात पाटोदा शहराला धार्मिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास विविध मान्यवर, महंत, पदाधिकारी व महानुभव पंथीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Post by Sanjhsuyog News Channel1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- बीडमध्ये अल्पसंख्यांकांचा एल्गार; संरक्षण कायद्यासाठी उपोषण आंदोलन1