माजी सैनिकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह उदगीर मध्ये आढळल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. उदगीरमध्ये माजी सैनिकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; परिसरात खळबळ उदगीर (प्रतिनिधी) : शहरातील जळकोट रोड परिसरात जय मल्हार धाब्याच्या पाठीमागील परिसरातील घरामध्ये माजी सैनिकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित घराची पाहणी केली असता, घरामध्ये एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तपासणीदरम्यान सदर मृतदेह हा माजी सैनिक प्रकाश बाबुराव सासष्टे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत (बॉडी कंपोज झाल्यामुळे) असल्याने जाग्यावरच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार, संबंधिताचा मृत्यू सुमारे चार दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
माजी सैनिकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह उदगीर मध्ये आढळल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. उदगीरमध्ये माजी सैनिकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; परिसरात खळबळ उदगीर (प्रतिनिधी) : शहरातील जळकोट रोड परिसरात जय मल्हार धाब्याच्या पाठीमागील परिसरातील घरामध्ये माजी सैनिकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित घराची पाहणी केली असता, घरामध्ये एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तपासणीदरम्यान सदर मृतदेह हा माजी सैनिक प्रकाश बाबुराव सासष्टे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत (बॉडी कंपोज झाल्यामुळे) असल्याने जाग्यावरच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार, संबंधिताचा मृत्यू सुमारे चार दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
- मी भाजपाचा साधा सदस्य सुद्धा नाही, संघ परीवारच कुठल दायीत्व माझ्याकडे नाही असे सांगत स्वत: किशोर शिवणीकर यांनी भाजपा संबंधाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.1
- माजी आ. सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेना मजबुतीकरणसाठी पाया रोवला उदगीर (विशेष प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री बनतो, हे शिवसेनेचे नेते ना. एकनाथराव शिंदे यांनी दाखवून दिले. मात्र ते मुख्यमंत्री असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बाळसे धरता आले नव्हते. नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि शिवसेना बांधणीचे काम सुरू झाले. खऱ्या अर्थाने पक्ष संघटन बांधणे हे काही फार सोपे नाही, मात्र अवघ्या पंधरा दिवसात सुधाकरराव भालेराव यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे उदगीर नगरपालिकेमध्ये स्वतंत्र पॅनल शिवसेनेने टाकले, आणि 40 च्या 40 जागा लढवल्या, जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे ती ही जागा मोठ्या ताकतीने शिवसेनेने लढवली. ज्या ठिकाणी बोटावर मोजन्या इतके कार्यकर्ते होते, त्याच उदगीर शहरांमध्ये गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने रॅली निघाली, घराघरातून शिवसेना आणि ना. एकनाथराव शिंदे यांचे नाव घुमू लागले. ही किमया घडउन आणली केवळ माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि पक्ष बांधणी संघटन कुशलतेमुळेच असे म्हटले तर नवल वाटू नये. त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील मोठ्या ताकतीने शिवसेनेने जागा लढवल्या, उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये महायुती असली तरीही शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केली होती. तरीही शिवसेनेने अत्यंत तगडी लढत देत अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काही जागा तर शुल्लक मतांनी गेल्या. निवडणुका म्हटले की, हार जीत हे येणारच, परंतु अल्पावधीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी उदगीर परिसरात जादूची कांडी फिरावी, त्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी केली आहे. असे म्हटले तर नवल वाटू नये. कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांनी उभारून दाखवली, त्यामुळेच अनेक नेत्यांना शिवसेना हा पक्ष आवडू लागला. परिणामतः अहमदपूरचे माजी मंत्री विनायकराव पाटील, औसा येथील सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर येथील भाजपचे नेते गोमसाळे या मान्यवरांनी आपापल्या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेची बांधणी एवढ्या मोठ्या ताकतीने झाली नव्हती, तेवढ्या ताकतीने सध्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष बांधणी सुरू आहे. कार्यकर्त्याचे संघटना अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू असल्यामुळेच माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. जिल्ह्याचे संघटक म्हणून ते काम पाहत आहेत. संघटन बांधणीसाठी गाव पातळीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम राबवत असताना, प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील नागरिकाच्या मनामध्ये शिवसेना घर करून बसू लागली आहे. हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी फार प्रबळ दावेदारी ठरू शकणार आहे. अहमदपूर मध्ये विनायकराव पाटील यांनी मित्र मंडळाच्या बळावर निवडणूक लढवून जिंकून दाखवली होती. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना देखील त्यांनी त्यावेळी निवडणूक जिंकली होती. आता तर शिवसेनेचे पाठबळ मिळाले आणि पक्ष बांधणी याच ताकतीने सुरू राहिली तर निश्चितपणे त्यांनाही भविष्य आहे. अशी चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने आपले प्रयत्न चालू राहतील अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे संघटक म्हणून कार्य करत असलेले माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. आपल्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पद्धतीने शिवसेनेला बळ देण्याचे काम आपण करून दाखवू असा विश्वास जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी बोलून दाखवला आहे.4
- जळकोट1
- Post by नागनाथ ससाने1
- आरटीओ आणि वाहनचालकात शाब्दिक चकमक. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी बाबळगाव चे वाहन चालक यांना केली मदत. रेनापुर पोलीस ठाण्यात आरटीओ ने दिलेली तक्रार मध्यस्थीने माघार. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026. लातूर तालुक्यातील बाबळगाव चे रहिवासी असलेले निळकंठ शिंदे यांची बोलेरो पिकप वाहन ही कोथिंबीर भरण्यासाठी लातूर तालुक्यातील बामणी शिवारात लावली असता या ठिकाणी आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी गाडीचे कागदपत्रे विचारात दोघांमध्ये तक्रार होऊन निळकंठ शिंदे विरोधात रेनापुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. लातुर जिल्ह्याच्या आरटीओ. कार्यालयातील आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी कारण नसतांना बाभळगाव येथील बुलेरो पीकअपचे मालक निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे बेलोरो पिकप वाहन मालक निळकंठ शिंदे यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांना माहिती कळवताच तात्काळ प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी रेणापूर पोलीसांना संपर्क साधुन निळकंठ शिंदे यांना मदत करीत प्रकरणाविषयी चौकशी कामे निळकंठ शिंदे हे बाभळगाव येथील रहीवाशी आहेत, त्यांनी कर्ज काढून एक बुलेरो पिक अप मालवाहतूक गाडी खरेदी केली आहे,ते दररोज शेतकऱ्यांची कोथिंबीर घेऊन नागपूर ला जातात, रोजच्या प्रमाणे ते लातुर तालुक्यातील बामणी शिवारात रसत्याच्या कडेला (रस्ता सोडून) आपली बुलेरो पिक अप व्हॅन लावली होती आणी ते कोथिंबीर घेण्यासाठी शेतकर्यांच्या फडात गेले होते, तेंव्हा अचानक अष्टा मोड हुन एक RTO ची गाडी आली आणी निळकंठ यास बुलेरो पिक अप व्हॅन चे कागदपत्र मागितले, निळकंठ यांनी सर्व कागदपत्र दाखविले, लायसन्स दाखविले यात गाडी मालकाची कोणतीही चूक नसताना संबंधित इन्स्पेक्टर नी पैसे मागीतले ते पैसेही गाडी मालक निळकंठ यांनी दिले, तरीही 1500 रुपयाचा खोटा फाईन गाडी वर लावला आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ यांना शिवीगाळ केली, नंतर इन्स्पेक्टर आणी निळकंठ मध्ये शाब्दिक चकमक झाली, आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, ही बातमी समजताच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी रेणापूर पोलीस निरीक्षक आणी संबंधित बीट आमलदार यांना संपर्क साधुन, निळकंठ यांना समज देत हे प्रकरण या ठिकाणीच मिटवण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे खंडापूरकर बाबा यांनी बोलताना आजही RTO लातुर मधील इन्स्पेक्टर यांची मुजोरी समाप्त झाली नाही, यापुढे जो कोणी भ्रष्टाचार इन्स्पेक्टर करत आसेल तर त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची गाढवावर बसवुन धिंड काढण्यात यावे. आरटीओ कार्यालयातून कोणी त्रास देत असेल तर स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, फोन नंबर - 8888184444, 8055088888 वर संपर्क साधावा. वाहान चालकास मी विनंती करणार आहे, RTO ऑफिस मधील कोणाही इन्स्पेक्टर अन्य कर्मचाऱ्यांना एकरी भाषेचा वापर करु नका, त्यांना व्यक्तिगत भांडण करु नका आपण कायदेशीर तक्रार देवू असे सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात आले.1
- 📍लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली येथील एका ७५ वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी व्यक्त केला संशय...उष्माघाताने जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन जणांचा झालाय मृत्यू1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई4
- जाहीर अवाहन... जाहीर अवाहन... उदगीर शहरातील सर्व नागरिकांना, आपल्या शहराच्या आणि देशाच्या नियोजित विकासासाठी 'जनगणना २०२७' हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या जनगणनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा 'स्व-गणना' (Self-Enumeration) दिनांक १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविला जात आहे. माझे आपणास नम्र आवाहन आहे की, आपल्या कुटुंबाची माहिती डिजिटल पोर्टल/ॲपद्वारे स्वतःहून नोंदवावी. या राष्ट्रीय कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे. अचूक माहिती देऊन शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान द्यावे. चला, डिजिटल जनगणनेचा भाग बनूया आणि उदगीरच्या विकासाला गती देऊया! आपले नम्र सौ. स्वातीताई सचिन हुडे नगराध्यक्षा, उदगीर नगरपरिषद हेडलाइन1