केज पोलिसांची दमदार कामगिरी; ६ लाखांचे गंठण चोरणारी महिला मालेगावातून जेरबंद, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त गौतम बचुटे/केज:- शहरातील हनुमान ज्वेलर्स या सराफी दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या बुरखाधारी तीन महिलांनी ५ लाख ९९ हजार ९९५ रुपये किमतीचे, ४७ ग्रॅम वजनाचे चार सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना १ जुलै २०२६ रोजी घडली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने आणि अमिरोद्दीन इनामदार यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यात संशयित कार क्रमांक एमएच ०५ / एएक्स ७६८५ निष्पन्न झाली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या परवानगीने पथकाने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव गाठले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने विजय नगर भागातून रिजवाना जाकीर शेख (वय ३५) हिला ताब्यात घेण्यात आले.पोलिसी खाक्या दाखवताच तिने साथीदारांची नावे सांगितली. तिच्या साथीदार अन्नू उर्फ साजीदा बशीर खान (वय ३६, रा. कमालपुरा, मालेगाव) आणि मन्नू उर्फ मनसजाखान (रा. विजय नगर, मालेगाव) यांचा शोध सुरू आहे.ज्ञपोलिसांनी रिजवाना हिच्याकडून ३१ ग्रॅम वजनाचे तीन मिनी गंठण आणि ५९ सोन्याचे मणी असा एकूण ४ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत रिजवाना ही सराईत चोर असल्याचे निष्पन्न झाले असून तिच्यावर मुंबईतील नागपाडा, कुर्ला आणि धुळे जिल्ह्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने तिला १४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कामगिरीबद्दल केज पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद1
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी सोनपेठ (दर्शन) :- तब्बल 35000 कोटी रुपयांचा खर्च सहा पदरी ग्रीन फील एक्सप्रेस वे आणि माळशिरस घाटात तब्बल आठ किलोमीटरचा भव्य असा बोगदा मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे कल्याण परिसराला मराठवाड्याची जोडणाऱ्या कल्याण ते लातूर जनकल्याण एक्सप्रेस वेला राज्य सरकारची मंजुरी दिलेली आहे सध्या लातूर ते कल्याण प्रवासासाठी 12 तास वेळ लागतो तू वेळ हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर चार तासाचा होणार आहे.1
- महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.1
- सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त1
- पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी जंतर- मंतर येथील देशव्यापी आंदोलनात सहभागी व्हा - अमरजान पठाण बीड(प्रतिनिधी):अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला.बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्यासोबतच पत्रकारांवरील हल्ले, धमक्या, दबाव तसेच खोटे गुन्हे दाखल करून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असताना देशभरात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर १ डिसेंबरपासून आयोजित देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पठाण अमरजान यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सक्षम कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक असून, देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू होईपर्यंत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या! राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन. भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या! राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन. सोनपेठ (दर्शन) :- छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आपले सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय द्यावेत. दि.१८ सप्टेंबर २०२६ ⏰ सकाळी १० ते सायंकाळी ६ 📍 आठही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष 🏛️ २१ सप्टेंबर २०२६ | सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात उच्चस्तरीय समिती नागरिक व संबंधित घटकांशी थेट चर्चा करणार. 📧 प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास लेखी अभिप्राय पाठवा आपला अभिप्राय — अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती परीक्षेकडे एक महत्त्वाचे पाऊल!1
- लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ1