logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली* मुंबई,दि. २१: वैद्यकीय सेवा, शिक्षण क्षेत्रातील निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला आहे. अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक, ज्येष्ठ बालरोगतज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'डॉ गोपाळराव पाटील यांना आपल्या परिसराविषयी मोठी तळमळ होती. ते व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ होते पण ग्रामीण भागात चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी भरीव असे योगदान दिले. बालरोग तज्ज्ञांच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. या क्षेत्रातील नवनवीन संशोधन, ज्ञान तंत्रज्ञानाचा रुग्णांना लाभ व्हावा यासाठी ते प्रयत्नशील राहिले. लातूरला शिवछत्रपती शिक्षण संस्था स्थापन करून, त्याअंतर्गत त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले. या संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने डॉ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेच्या जोरावर देशभरात ओळख निर्माण केली. डॉ पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यसभा सदस्यत्वाची संधी मिळाली. राज्यसभेच्या माध्यमातून त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे या महत्त्वाच्या विषय समित्यांवर काम केले. डॉ पाटील यांनी महाराष्ट्राच्या समाजकारण - राजकारणात निस्पृहपणे कार्य करण्याचा मानदंड निर्माण केला. त्या अर्थाने ते निरंतर सेवाव्रती होते. डॉ पाटील यांच्या निधनाने राज्याच्या वैद्यकीय सेवा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची हानी झाली आहे. पाटील कुटुंबीयांसह, त्यांच्या कार्यात सहभागी कार्यकर्त्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

1 hr ago
user_बाळकृष्ण प्रकाश कदम
बाळकृष्ण प्रकाश कदम
Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
1 hr ago
1d33a5b0-f660-4777-9611-092619c10a31

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली* मुंबई,दि. २१: वैद्यकीय सेवा, शिक्षण क्षेत्रातील निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला आहे. अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक, ज्येष्ठ बालरोगतज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'डॉ गोपाळराव पाटील यांना आपल्या परिसराविषयी मोठी तळमळ होती. ते व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ होते पण ग्रामीण भागात चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी भरीव असे योगदान दिले. बालरोग तज्ज्ञांच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. या क्षेत्रातील नवनवीन संशोधन, ज्ञान तंत्रज्ञानाचा रुग्णांना लाभ व्हावा यासाठी ते प्रयत्नशील राहिले. लातूरला शिवछत्रपती शिक्षण संस्था स्थापन करून, त्याअंतर्गत त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले. या संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने डॉ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेच्या जोरावर देशभरात ओळख निर्माण केली. डॉ पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यसभा सदस्यत्वाची संधी मिळाली. राज्यसभेच्या माध्यमातून त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे या महत्त्वाच्या विषय समित्यांवर काम केले. डॉ पाटील यांनी महाराष्ट्राच्या समाजकारण - राजकारणात निस्पृहपणे कार्य करण्याचा मानदंड निर्माण केला. त्या अर्थाने ते निरंतर सेवाव्रती होते. डॉ पाटील यांच्या निधनाने राज्याच्या वैद्यकीय सेवा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची हानी झाली आहे. पाटील कुटुंबीयांसह, त्यांच्या कार्यात सहभागी कार्यकर्त्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे. लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.
    1
    माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026.
लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले.
डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली.
परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.
    1
    सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    22 hrs ago
  • माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध....  उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात  आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने  राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व  दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी  आंदोलनकर्ते  म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील  असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    3
    माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... 
उदगीर (प्रतिनिधी)
लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात  आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने  राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व  दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी  आंदोलनकर्ते  म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली .
सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील  असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मुखेडच्या लेकीचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत गौरव मुखेड दि. १५ एप्रिल रोजी नागपूर येथे अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने पार पडलेल्या द्वितीय दिक्षांत समारोहात मुखेडची लेक डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांचा महामहीम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुरमु व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांनी AIIMS, Nagpur येथून सन. २०२० च्या बॕचमध्ये MBBS आॕब्स्टेट्रिक्स व गायनेकाॕलाॕजी या विषयात प्रथम व जनरल मेडिसीन या विषयात द्वितीय आल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. तसेच १२ वी नीट-२०२० मध्ये ७२० पैकी ६६७ गुण घेऊन देशात १४५० वा क्रमांक मिळविला. डॉ. ऋतुजा ही AIIMS ला मुखेड आणि परिसरातून जाणारी एकमेव विद्यार्थीनी होती. तिच्या या यशामध्ये तिचे वडिल डॉ. अशोक कौरवार व आई डॉ. रचिता कौरवार यांचे अथक परिश्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत. डॉ. ऋतुजाला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुखेडकरांची छाती गर्वाने फुलली असून परिसरात तीच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
    7
    मुखेडच्या लेकीचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत गौरव
मुखेड दि.
१५ एप्रिल रोजी नागपूर येथे अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने पार पडलेल्या द्वितीय दिक्षांत समारोहात मुखेडची लेक डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांचा महामहीम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुरमु व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.  
डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांनी AIIMS, Nagpur येथून सन. २०२० च्या बॕचमध्ये MBBS आॕब्स्टेट्रिक्स व गायनेकाॕलाॕजी  या विषयात प्रथम व जनरल मेडिसीन या विषयात द्वितीय आल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले.  तसेच १२ वी नीट-२०२० मध्ये ७२० पैकी ६६७ गुण घेऊन देशात १४५० वा क्रमांक मिळविला.  डॉ. ऋतुजा ही AIIMS ला मुखेड आणि परिसरातून जाणारी एकमेव विद्यार्थीनी होती.
तिच्या या यशामध्ये तिचे वडिल डॉ. अशोक कौरवार व आई डॉ. रचिता कौरवार यांचे अथक परिश्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत.  डॉ. ऋतुजाला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुखेडकरांची छाती गर्वाने फुलली असून परिसरात तीच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
    1
    नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले.
जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • LIVE “श्री. अशोकराव गोंगे यांच्या जयगुरुदेव ॲग्रो एजन्सीचा भव्य शुभारंभ समारंभ संपन्न.” #maxparbhani #parbhani #pathri #maharashtra MAX PARBHANI LIVE 1
    1
    LIVE “श्री. अशोकराव गोंगे यांच्या जयगुरुदेव ॲग्रो एजन्सीचा भव्य शुभारंभ समारंभ संपन्न.” #maxparbhani #parbhani #pathri #maharashtra  MAX PARBHANI LIVE 1
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 📍औसा तालुक्यातील खरोसा येथे हृदयद्रावक घटना: आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
    1
    📍औसा तालुक्यातील खरोसा येथे हृदयद्रावक घटना: आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    5 hrs ago
  • प स कार्यालय तुळजापूर कामानिमित्त आलेल्या माणसांसाठी पंखे होतात बंद, ज्या विभागात माणसंच नाहीत त्या विभागाचे पंखे होतात चालू
    1
    प स कार्यालय तुळजापूर कामानिमित्त आलेल्या माणसांसाठी पंखे होतात बंद,                                   ज्या विभागात माणसंच नाहीत त्या विभागाचे पंखे होतात चालू
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    23 hrs ago
  • क्षितिज पुरम” की GRAND OPENING : Skyline Builders & Developers का भव्य प्रोजेक्ट लॉन्च
    1
    क्षितिज पुरम” की GRAND OPENING : Skyline Builders & Developers का भव्य प्रोजेक्ट लॉन्च
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.