logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देवळाली प्रवरा येथे ‘लोक कल्याण मेळावा’ उत्साहात संपन्न पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन देवळाली प्रवरा येथे ‘लोक कल्याण मेळावा’ उत्साहात संपन्न पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) : " पथविक्रेत्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज भरून शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा," असे आवाहन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी केले. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील रस्त्यावर फिरून व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांसाठी ‘लोक कल्याण मेळावा’ बुधवार, दि.१६ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला.या मेळाव्यात पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज सुविधा, क्रेडिट कार्ड, घरकुल, एकल महिला सर्वेक्षण, दिव्यांग निधी तसेच विविध शासकीय लोक कल्याणकारी योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.मेळाव्यास देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक दिपक जगरवाल, सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, वसुली विभाग प्रमुख रामदास म्हस्के यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी व पथविक्रेते उपस्थित होते. यावेळी पीएम स्वनिधी योजनेंतर्गत नवीन पथविक्रेत्यांच्या कर्ज मागणी अर्जाची नोंदणी, योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, क्रेडिट कार्ड बाबत माहिती, तसेच घरकुल व इतर शासकीय योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.पथविक्रेत्यांच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी शासनाच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यामुळे शहरातील पथविक्रेत्यांना स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी उपलब्ध असलेल्या कर्ज सुविधा व विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळाली.नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे पथविक्रेत्यांकडून स्वागत करण्यात आले.यावेळी रामदास म्हस्के,सागर सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी समुदाय संघटिका सविता हारदे यांनी आभार मानले.पथविक्रेता समिती सदस्य सागर सोनवणे,शकील तांबोळी,दीपक बर्डे,यास्मिन पठाण,बसंती दहीवाले,विकासवर्धिनी शहरस्तर संघाच्या अध्यक्षा कमल मुसमाडे यांच्या सह मोठ्या संख्येने फेरीवाले व महिला बचत गट सदस्य उपस्थित होते.

1 day ago
user_पत्रकार जालिंदर आल्हाट
पत्रकार जालिंदर आल्हाट
राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र•
1 day ago
3a2fff1c-2b00-450a-a5ed-faace09535b4

देवळाली प्रवरा येथे ‘लोक कल्याण मेळावा’ उत्साहात संपन्न पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन देवळाली प्रवरा येथे ‘लोक कल्याण मेळावा’ उत्साहात संपन्न पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) : " पथविक्रेत्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज भरून शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा," असे आवाहन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी केले. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील रस्त्यावर फिरून व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांसाठी ‘लोक कल्याण मेळावा’ बुधवार, दि.१६ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला.या मेळाव्यात पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज सुविधा, क्रेडिट कार्ड, घरकुल, एकल महिला सर्वेक्षण, दिव्यांग निधी तसेच विविध शासकीय लोक कल्याणकारी योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.मेळाव्यास देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे

34b37f33-90f1-4b3b-8cad-649dbdc5675a

कार्यालयीन अधिक्षक दिपक जगरवाल, सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, वसुली विभाग प्रमुख रामदास म्हस्के यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी व पथविक्रेते उपस्थित होते. यावेळी पीएम स्वनिधी योजनेंतर्गत नवीन पथविक्रेत्यांच्या कर्ज मागणी अर्जाची नोंदणी, योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, क्रेडिट कार्ड बाबत माहिती, तसेच घरकुल व इतर शासकीय योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.पथविक्रेत्यांच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी शासनाच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यामुळे शहरातील पथविक्रेत्यांना स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी उपलब्ध असलेल्या कर्ज सुविधा व विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळाली.नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे पथविक्रेत्यांकडून स्वागत करण्यात आले.यावेळी रामदास म्हस्के,सागर सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी समुदाय संघटिका सविता हारदे यांनी आभार मानले.पथविक्रेता समिती सदस्य सागर सोनवणे,शकील तांबोळी,दीपक बर्डे,यास्मिन पठाण,बसंती दहीवाले,विकासवर्धिनी शहरस्तर संघाच्या अध्यक्षा कमल मुसमाडे यांच्या सह मोठ्या संख्येने फेरीवाले व महिला बचत गट सदस्य उपस्थित होते.

More news from Pune and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना पाटोदा येथे त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण दीर्घकाळ सुरू होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अशक्तपणा आणि निर्जलीकरणाचा त्रास झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून विविध वैद्यकीय तपासण्या पुन्हा करण्यात येणार आहेत. सध्या जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती तपासली जात आहे. त्यांची सध्याची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीकडे मराठा समाजासह समर्थकांचे लक्ष लागले आहे.
    4
    छत्रपती संभाजीनगर 

उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष
छत्रपती संभाजीनगर 
उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना पाटोदा येथे त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण दीर्घकाळ सुरू होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अशक्तपणा आणि निर्जलीकरणाचा त्रास झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून विविध वैद्यकीय तपासण्या पुन्हा करण्यात येणार आहेत.
सध्या जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती तपासली जात आहे. त्यांची सध्याची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीकडे मराठा समाजासह समर्थकांचे लक्ष लागले आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    7 hrs ago
  • मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी निघाले गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर.
    1
    मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी निघाले गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!
    1
    कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार नाशिक गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
    1
    नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार

नाशिक 
गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज आप लोगों bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती
    1
    ब्रेकिंग न्यूज आप लोगों  bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show
देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती
    user_Harish Kumar Gautam
    Harish Kumar Gautam
    Voice of people नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत देशभक्तीपर वातावरणात हुतात्म्यांना अभिवादन फुलंब्री प्रतिनिधी : भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा तब्बल १३ महिने निजामाच्या जुलमी राजवटीखाली होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील मुक्ती चळवळ, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर भूमिकेमुळे आणि भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन पोलो' लष्करी कारवाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाड्याची निजामाच्या राजवटीतून मुक्तता झाली. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ रिधोरा येथे मराठवाडा मुक्तीदिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुट्टी वर आलेले सैनिक यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी सैनिक अर्जुन कोलते व संतोष शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच अश्विनी कोलते, ग्रामपंचायत सदस्य शरद कोलते , बाळू घागरे, अनिल देशमुख, अंगणवाडी सेविका व कर्मचारी , आशा सेविका, शिक्षक खरात सर, कासार मॅडम , पोलीस पाटील गजानन कोलते,कय्युम पठाण,राजू बंडूगे, रमेश कोलते, भाऊसाहेब शिंदे, सुनील शिंदे, बद्रीनाथ कोलते,विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या कार्याचे स्मरण करून देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात पार पडला.
    4
    ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत देशभक्तीपर वातावरणात हुतात्म्यांना अभिवादन
फुलंब्री प्रतिनिधी : भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा तब्बल १३ महिने निजामाच्या जुलमी राजवटीखाली होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील मुक्ती चळवळ, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर भूमिकेमुळे आणि भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन पोलो' लष्करी कारवाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाड्याची निजामाच्या राजवटीतून मुक्तता झाली. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ रिधोरा येथे मराठवाडा मुक्तीदिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुट्टी वर आलेले सैनिक यांच्या हस्ते 
ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी सैनिक अर्जुन कोलते व संतोष शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच अश्विनी कोलते,  ग्रामपंचायत सदस्य शरद कोलते , बाळू घागरे, अनिल देशमुख, अंगणवाडी सेविका व कर्मचारी , आशा सेविका, शिक्षक खरात सर, कासार मॅडम , पोलीस पाटील गजानन कोलते,कय्युम पठाण,राजू बंडूगे, रमेश कोलते, भाऊसाहेब शिंदे, सुनील शिंदे, बद्रीनाथ कोलते,विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या कार्याचे स्मरण करून देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात पार पडला.
    user_Amol patil  phulambri
    Amol patil phulambri
    फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • तुमसे ना हो पयेगा मराठवाडाभर आंदोलन केले,हे सरकार नामर्दाच यांच्याकडून काही होऊ शकत नाही अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचे पॉइंटर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा स्मारक आणि स्मृतीस्तंभाला अभिवादन. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला, तर भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतरही मराठवाड्याचा अपेक्षित विकास झालेला नाही, असा आरोप. मराठवाडा सातत्याने विकासापासून वंचित राहिला असल्याचे दानवे यांचे मत. मागील दहा वर्षांत सरकारने केलेल्या 780 घोषणांची यादी असल्याचा दावा. सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये मराठवाडा मागे असल्याचे वक्तव्य. सरकारच्या घोषणांच्या तुलनेत कामाची प्रगती केवळ दीड टक्के असल्याचा आरोप. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने आंदोलन केले असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे धरणे आंदोलन करण्यात येणार. या आंदोलनात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान सरकारला मराठवाड्याच्या विकासाबाबत जाब विचारणार असल्याचे वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना उद्या निवेदन देणार नसून स्वतंत्र वेळ मागितल्याचे दानवे यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा. मराठवाड्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आता आवाज उठवण्याची गरज असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
    1
    तुमसे ना हो पयेगा मराठवाडाभर आंदोलन केले,हे सरकार नामर्दाच यांच्याकडून काही होऊ शकत नाही
अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचे पॉइंटर
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा स्मारक आणि स्मृतीस्तंभाला अभिवादन.
17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला, तर भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.
स्वातंत्र्यानंतरही मराठवाड्याचा अपेक्षित विकास झालेला नाही, असा आरोप.
मराठवाडा सातत्याने विकासापासून वंचित राहिला असल्याचे दानवे यांचे मत.
मागील दहा वर्षांत सरकारने केलेल्या 780 घोषणांची यादी असल्याचा दावा.
सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये मराठवाडा मागे असल्याचे वक्तव्य.
सरकारच्या घोषणांच्या तुलनेत कामाची प्रगती केवळ दीड टक्के असल्याचा आरोप.
मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने आंदोलन केले असल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे धरणे आंदोलन करण्यात येणार.
या आंदोलनात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान सरकारला मराठवाड्याच्या विकासाबाबत जाब विचारणार असल्याचे वक्तव्य.
मुख्यमंत्र्यांना उद्या निवेदन देणार नसून स्वतंत्र वेळ मागितल्याचे दानवे यांनी सांगितले.
गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा.
मराठवाड्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले.
मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आता आवाज उठवण्याची गरज असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    19 hrs ago
  • नारेगांव में अनधिकृत प्लॉटिंग पर महानगर पालिका की कार्रवाई! नारेगांव परिसर में अनधिकृत प्लॉटिंग के खिलाफ महानगर पालिका की ओर से कार्रवाई की गई है। इस कार्रवाई की जानकारी देते हुए अतिक्रमण विभाग के वरिष्ठ अधिकारी संतोष वाहुले सर ने महत्वपूर्ण जानकारी साझा की। अनधिकृत प्लॉटिंग और महानगर पालिका की कार्रवाई से जुड़ी पूरी जानकारी आप इस वीडियो में देख सकते हैं।
    1
    नारेगांव में अनधिकृत प्लॉटिंग पर महानगर पालिका की कार्रवाई!

नारेगांव परिसर में अनधिकृत प्लॉटिंग के खिलाफ महानगर पालिका की ओर से कार्रवाई की गई है। इस कार्रवाई की जानकारी देते हुए अतिक्रमण विभाग के वरिष्ठ अधिकारी संतोष वाहुले सर ने महत्वपूर्ण जानकारी साझा की।

अनधिकृत प्लॉटिंग और महानगर पालिका की कार्रवाई से जुड़ी पूरी जानकारी आप इस वीडियो में देख सकते हैं।
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीजेचा कहर सिल्लोड-कन्नड तालुक्यात दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; चार जण गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वीज पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पावसादरम्यान वीज कोसळल्याने या घटना घडल्या असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीजेचा कहर सिल्लोड-कन्नड तालुक्यात दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; चार जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वीज पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पावसादरम्यान वीज कोसळल्याने या घटना घडल्या असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडून घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    54 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.