logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी वनपरिक्षेत्रातील वडधामणा परिसरात पाण्यासाठी गावात आलेल्या एका चितळावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात चितळ गंभीर जखमी झाले असून, यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जंगलात पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने तहानलेले चितळ गावच्या दिशेने आले आणि ते कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले, यातून वन्यजीव संरक्षणाचे दावे किती पोकळ आहेत हे उघड झाल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, जर वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी जंगलात पुरेसे पाणवठे, जलसाठे आणि संरक्षणात्मक उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. वन्यप्राण्यांना जंगल सोडून गावात यावे लागण्याची वेळ का आली, जंगलातील जलस्रोत कोरडे पडले होते का, याची जबाबदारी कोण घेणार, असे संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आकाश मेश्राम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची दखल घेतली. मात्र, इतकी गंभीर घटना घडूनही हिंगणा वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण नेहमीप्रमाणे दडपण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. नागरिकांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा वन्यजीव संरक्षणाचे सर्व दावे केवळ कागदोपत्रीच राहतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

2 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago

हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी वनपरिक्षेत्रातील वडधामणा परिसरात पाण्यासाठी गावात आलेल्या एका चितळावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात चितळ गंभीर जखमी झाले असून, यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जंगलात पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने तहानलेले चितळ गावच्या दिशेने आले आणि ते कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले, यातून वन्यजीव संरक्षणाचे दावे किती पोकळ आहेत हे उघड झाल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, जर वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी जंगलात पुरेसे पाणवठे, जलसाठे आणि संरक्षणात्मक उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. वन्यप्राण्यांना जंगल सोडून गावात यावे लागण्याची वेळ का आली, जंगलातील जलस्रोत कोरडे पडले होते का, याची जबाबदारी कोण घेणार, असे संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आकाश मेश्राम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची दखल घेतली. मात्र, इतकी गंभीर घटना घडूनही हिंगणा वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण नेहमीप्रमाणे दडपण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. नागरिकांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा वन्यजीव संरक्षणाचे सर्व दावे केवळ कागदोपत्रीच राहतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • श्री. सतीश एम. भालेराव यांनी १३ जून २०२६ या दिवसासाठी 'आजचे प्रेरणा' संदेश दिला आहे.
    1
    श्री. सतीश एम. भालेराव यांनी १३ जून २०२६ या दिवसासाठी 'आजचे प्रेरणा' संदेश दिला आहे.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • alert..,.................,.......,.,,,..........,,........ alert,.....
    1
    alert..,.................,.......,.,,,..........,,........
alert,.....
    user_Pranay Meshram
    Pranay Meshram
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • चंद्रपूर जिल्ह्यातील सावली गाव परिसरात सोमवारी नागरिकांना एक दुर्मिळ आणि मनमोहक दृश्य पाहायला मिळाले, जेव्हा रानटी हत्तींच्या कळपाने एका तलावात शिरकाव केला. उन्हाच्या कडाक्यात दिलासा मिळवण्यासाठी हा हत्तींचा कळप तलावाच्या थंड पाण्यात उतरला. तेथे त्यांनी बराच वेळ मनसोक्त जलक्रीडा केली; हत्ती आराम करताना, एकमेकांवर सोंडेने पाणी उडवताना तसेच पाण्यात विहार करताना दिसले. हत्तींच्या या नैसर्गिक वर्तनाने परिसरातील नागरिक आणि निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेतले, अनेकांनी सुरक्षित अंतर राखून या अनोख्या दृश्याचा आनंद घेतला, तर काहींनी आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात रानटी हत्तींची वर्दळ वाढलेली दिसून येत आहे. जंगल परिसरातून अन्न व पाण्याच्या शोधात हे हत्ती मानवी वस्तीच्या जवळील भागात येत आहेत. सुदैवाने, या घटनेदरम्यान कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. वन विभागाने नागरिकांना हत्तींच्या जवळ न जाण्याचे किंवा त्यांना त्रास न देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशा प्रसंगी सुरक्षित अंतर राखून तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
    1
    चंद्रपूर जिल्ह्यातील सावली गाव परिसरात सोमवारी नागरिकांना एक दुर्मिळ आणि मनमोहक दृश्य पाहायला मिळाले, जेव्हा रानटी हत्तींच्या कळपाने एका तलावात शिरकाव केला. उन्हाच्या कडाक्यात दिलासा मिळवण्यासाठी हा हत्तींचा कळप तलावाच्या थंड पाण्यात उतरला. तेथे त्यांनी बराच वेळ मनसोक्त जलक्रीडा केली; हत्ती आराम करताना, एकमेकांवर सोंडेने पाणी उडवताना तसेच पाण्यात विहार करताना दिसले. हत्तींच्या या नैसर्गिक वर्तनाने परिसरातील नागरिक आणि निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेतले, अनेकांनी सुरक्षित अंतर राखून या अनोख्या दृश्याचा आनंद घेतला, तर काहींनी आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात रानटी हत्तींची वर्दळ वाढलेली दिसून येत आहे. जंगल परिसरातून अन्न व पाण्याच्या शोधात हे हत्ती मानवी वस्तीच्या जवळील भागात येत आहेत. सुदैवाने, या घटनेदरम्यान कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. वन विभागाने नागरिकांना हत्तींच्या जवळ न जाण्याचे किंवा त्यांना त्रास न देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशा प्रसंगी सुरक्षित अंतर राखून तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
    user_Deonath Gandate
    Deonath Gandate
    Web Designer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • संगीतमय आणि भक्तीमय वातावरणात श्रध्दालूंनी स्वतःला पूर्णपणे देवभक्तीत लीन करून घेतले. या भक्तीमय संगीताच्या तालावर, उपस्थित भाविक पूर्ण श्रद्धेने देवचरणी मंग्न झाले.
    4
    संगीतमय आणि भक्तीमय वातावरणात श्रध्दालूंनी स्वतःला पूर्णपणे देवभक्तीत लीन करून घेतले. या भक्तीमय संगीताच्या तालावर, उपस्थित भाविक पूर्ण श्रद्धेने देवचरणी मंग्न झाले.
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी वनपरिक्षेत्रातील वडधामणा परिसरात पाण्यासाठी गावात आलेल्या एका चितळावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात चितळ गंभीर जखमी झाले असून, यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जंगलात पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने तहानलेले चितळ गावच्या दिशेने आले आणि ते कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले, यातून वन्यजीव संरक्षणाचे दावे किती पोकळ आहेत हे उघड झाल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, जर वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी जंगलात पुरेसे पाणवठे, जलसाठे आणि संरक्षणात्मक उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. वन्यप्राण्यांना जंगल सोडून गावात यावे लागण्याची वेळ का आली, जंगलातील जलस्रोत कोरडे पडले होते का, याची जबाबदारी कोण घेणार, असे संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आकाश मेश्राम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची दखल घेतली. मात्र, इतकी गंभीर घटना घडूनही हिंगणा वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण नेहमीप्रमाणे दडपण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. नागरिकांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा वन्यजीव संरक्षणाचे सर्व दावे केवळ कागदोपत्रीच राहतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
    1
    हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी वनपरिक्षेत्रातील वडधामणा परिसरात पाण्यासाठी गावात आलेल्या एका चितळावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात चितळ गंभीर जखमी झाले असून, यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जंगलात पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने तहानलेले चितळ गावच्या दिशेने आले आणि ते कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले, यातून वन्यजीव संरक्षणाचे दावे किती पोकळ आहेत हे उघड झाल्याचे म्हटले जात आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, जर वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी जंगलात पुरेसे पाणवठे, जलसाठे आणि संरक्षणात्मक उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. वन्यप्राण्यांना जंगल सोडून गावात यावे लागण्याची वेळ का आली, जंगलातील जलस्रोत कोरडे पडले होते का, याची जबाबदारी कोण घेणार, असे संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आकाश मेश्राम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची दखल घेतली. मात्र, इतकी गंभीर घटना घडूनही हिंगणा वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण नेहमीप्रमाणे दडपण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. नागरिकांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा वन्यजीव संरक्षणाचे सर्व दावे केवळ कागदोपत्रीच राहतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.