लातूर. NEET प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी; आरसीसी क्लासेस बंद करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी NEET प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी; आरसीसी क्लासेस बंद करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लातूर | प्रतिनिधी NEET पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचा आरोप असलेल्या मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासेसवर तात्काळ बंदी घालून त्यांच्यासह संबंधित आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश राजेंद्र करंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान झाले आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून लातूरच्या नावाजलेल्या "लातूर पॅटर्न"लाही मोठा धक्का बसला आहे. करंडे यांनी आरोप केला आहे की, या प्रकरणातील प्रमुख आरोपींमध्ये मोटेगावकर, कुलकर्णी आणि डॉ. शिरोरे यांचा समावेश असून, त्यांनी आर्थिक स्वार्थासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले. त्यामुळे आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, आरसीसी क्लासेस तात्काळ बंद करण्यात यावेत, विद्यार्थ्यांनी भरलेली फी परत करण्यात यावी तसेच डॉ. शिरोरे यांचे रुग्णालयही सील करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच, प्रशासनाने पुढील आठ दिवसांत ठोस कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, लातूरचे पोलीस अधीक्षक आणि शिक्षणाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.2
- नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.3
- चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.1