पाथरी पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व; सुनीता डुकरे सभापती, सचिन अंबुरे उपसभापती पाथरी (प्रतिनिधी) : पाथरी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी (दि.१०) झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत पंचायत समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बाह्य पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता गजेंद्र डुकरे यांची सभापतीपदी तर सचिन लिंबाजी अंबुरे यांची उपसभापतीपदी निवड झाली. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी विविध पक्षांमध्ये हालचाली सुरू होत्या. पाथरी पंचायत समितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तीन सदस्य, काँग्रेसचे दोन सदस्य आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चा एक सदस्य निवडून आला होता. सुरुवातीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिल्याने समीकरणे बदलली. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाले. सभापती व उपसभापती पदाची निवड सहा विरुद्ध चार मतांनी झाली. त्यानुसार सुनीता डुकरे यांची सभापतीपदी तर सचिन अंबुरे यांची उपसभापतीपदी अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. निवड प्रक्रियेचे कामकाज पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांनी पार पाडले. त्यांना तहसीलदार शंकर हांदेश्वर, गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे, नायब तहसीलदार वसंत महाजन तसेच पंचायत समितीच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये आमदार राजेश विटेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. दरम्यान, नवनिर्वाचित सभापती सुनीता डुकरे आणि उपसभापती सचिन अंबुरे यांचे विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. पाथरी तालुक्याच्या विकासासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पाथरी पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व; सुनीता डुकरे सभापती, सचिन अंबुरे उपसभापती पाथरी (प्रतिनिधी) : पाथरी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी (दि.१०) झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत पंचायत समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बाह्य पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता गजेंद्र डुकरे यांची सभापतीपदी तर सचिन लिंबाजी अंबुरे यांची उपसभापतीपदी निवड झाली. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी विविध पक्षांमध्ये हालचाली सुरू होत्या. पाथरी पंचायत समितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तीन सदस्य, काँग्रेसचे दोन सदस्य आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चा एक सदस्य निवडून आला होता. सुरुवातीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिल्याने समीकरणे बदलली. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाले.
सभापती व उपसभापती पदाची निवड सहा विरुद्ध चार मतांनी झाली. त्यानुसार सुनीता डुकरे यांची सभापतीपदी तर सचिन अंबुरे यांची उपसभापतीपदी अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. निवड प्रक्रियेचे कामकाज पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांनी पार पाडले. त्यांना तहसीलदार शंकर हांदेश्वर, गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे, नायब तहसीलदार वसंत महाजन तसेच पंचायत समितीच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये आमदार राजेश विटेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. दरम्यान, नवनिर्वाचित सभापती सुनीता डुकरे आणि उपसभापती सचिन अंबुरे यांचे विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. पाथरी तालुक्याच्या विकासासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
- विलास बारहाते मानवत : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ११ एसटी बसने निघाले जवळपास ५०० विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी या सहली मध्ये होते. प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले. हे पर्यटकांसह अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. ५० हजार वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालतेय. येथील १२ व्या शतकातील प्राचीन मंदिरे, जसे की कमळजा माता मंदिर, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहवयास मिळतोय. लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे. जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना पाहिला. कश्या प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले. हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजलंय. त्यानंतर ही सहल शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९ व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधी स्थळ असून, येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय. मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे. जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते. दर्शन व प्रसाद घेतल्या नंतर सहल मानवत च्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा दिड च्या सुमारास सुखद सहलीचा अनुभव घेत पोहोचली.1
- Post by Ramesh Mulgir1
- सोनपेठ पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या निकिता अवचारे यांची निवड : उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख1
- यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता. अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध नोंदवला. यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.1
- महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार हिकमत उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जोरदार मागणी केली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. नदीजोड प्रकल्पांतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील वाढीव पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. मात्र असे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक लघु सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “२५-३० वर्षांपूर्वी उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (KT Weirs) आज जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पाणी साठत नाही. या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जायकवाडी धरणातून वाहून जाणारे पाणी अडवले, तर परिसरातील ३० ते ३५ गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हतवन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. रस्त्यांच्या विषयावर बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबईसारख्या शहरांना माेठ्या प्रमाणात निधी तर ग्रामीण भागासाठी तुलनेने कमी निधी मिळत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागातील ओडीआर (ODR) व एमडीआर (MDR) रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरीव निधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले; मात्र यासाठी करण्यात आलेली साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना आमदार उढाण यांनी साखर कारखान्यांवरील २५ किलोमीटर हवाई अंतराच्या नियमावर जोरदार टीका केली. “जगात असा कोणताही उद्योग नसेल जिथे नवीन युनिट सुरू करण्यासाठी इतके कडक निर्बंध असतील. या नियमामुळे ज्या भागात ऊस उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांची कोंडी होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा २५ किमीचा नियम रद्द करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच ऊस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांवरील काटामारी रोखण्यासाठी सरकारने डिजिटल काटे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सभागृहात व्यापक चर्चा झाली1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- अंबलटेक गावाचा विकास आणखीन नाही.चांगला रस्ता होता ते खंदून टाकला आहे. नवीन रस्ता करतो म्हणून आणखीन केला नाही जिथे रस्ता चांगला आहे तिथेच रस्ता करीत आहेत .दारासमोर गोट्यात सरपंचाच्या आणि सदस्याच्या गोट्यामध्ये काँक्रीट टाकून काम चालू आहे मंदिर पाशी आणि वरी आणखीन रस्ता नाही?2
- महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद1