व्हाट्स अप वरील रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद राजेश भोरे यांनी केले रक्तदान कधी कधी एखाद्या कुटुंबासाठी मदत म्हणजे मोठी आर्थिक रक्कम नसते, तर संकटाच्या काळात योग्य वेळी पुढे आलेला मदतीचा हात असतो. याच माणुसकीचा प्रत्यय जव्हार तालुक्यातील भोतडपाड येथील राजेश हिरु भोरे यांनी दिला आहे. राधानगरी, ता. जव्हार येथील तेजस हनुमंत दिघा यांना AB+ रक्ताची आवश्यकता असल्याचा संदेश व्हॉट्सअॅपवरून प्रसारित झाला होता. हा संदेश मिळताच भोतडपाड येथील राजेश हिरु भोरे यांनी कोणताही विचार न करता रक्तदानासाठी पुढाकार घेतला. गरजेच्या वेळी रक्तदान करून त्यांनी रुग्णाला मदतीचा हात दिला. रक्तदानाचा हा प्रसंग केवळ रक्त देण्यापुरता मर्यादित न राहता, संकटाच्या काळात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा संदेश देणारा ठरला. अनोळखी रुग्णासाठी वेळेत रक्तदान केल्याने संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, “आपण एकटे नाही” हा विश्वास निर्माण झाला. रक्तदान हे जीवनदानासमान मानले जाते. त्यामुळे रक्ताची गरज असताना सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत पुढे येणाऱ्या रक्तदात्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. राजेश भोरे यांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक होत आहे. “तुमचं रक्त कदाचित एका रुग्णाच्या शरीरात गेलं असेल; पण तुमची माणुसकी अनेकांच्या मनात पोहोचली आहे,” अशा शब्दांत राजेश भोरे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
व्हाट्स अप वरील रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद राजेश भोरे यांनी केले रक्तदान कधी कधी एखाद्या कुटुंबासाठी मदत म्हणजे मोठी आर्थिक रक्कम नसते, तर संकटाच्या काळात योग्य वेळी पुढे आलेला मदतीचा हात असतो. याच माणुसकीचा प्रत्यय जव्हार तालुक्यातील भोतडपाड येथील राजेश हिरु भोरे यांनी दिला आहे. राधानगरी, ता. जव्हार येथील तेजस हनुमंत दिघा यांना AB+ रक्ताची आवश्यकता असल्याचा संदेश व्हॉट्सअॅपवरून प्रसारित झाला होता. हा संदेश मिळताच भोतडपाड येथील राजेश हिरु भोरे यांनी कोणताही विचार न करता रक्तदानासाठी पुढाकार घेतला. गरजेच्या वेळी रक्तदान करून त्यांनी रुग्णाला मदतीचा हात दिला. रक्तदानाचा हा प्रसंग केवळ रक्त देण्यापुरता मर्यादित न राहता, संकटाच्या काळात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा संदेश देणारा ठरला. अनोळखी रुग्णासाठी वेळेत रक्तदान केल्याने संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, “आपण एकटे नाही” हा विश्वास निर्माण झाला. रक्तदान हे जीवनदानासमान मानले जाते. त्यामुळे रक्ताची गरज असताना सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत पुढे येणाऱ्या रक्तदात्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. राजेश भोरे यांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक होत आहे. “तुमचं रक्त कदाचित एका रुग्णाच्या शरीरात गेलं असेल; पण तुमची माणुसकी अनेकांच्या मनात पोहोचली आहे,” अशा शब्दांत राजेश भोरे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
- कुडूस नाका अतिक्रमणमुक्तीसाठी संघर्ष समिती आक्रमक; विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथील अतिक्रमण आणि रस्त्याच्या प्रश्नावर आता ५२ गाव अतिक्रमणमुक्त बाजारपेठ संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ५२ गाव अतिक्रमणमुक्त बाजारपेठ संघर्ष समितीच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. कुडूस नाका परिसरातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या ४५ मीटर मार्किंगप्रमाणे खुला करण्यात यावा, ही समितीची प्रमुख मागणी आहे. यासोबतच कुडूस येथे नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच कुडूस येथील ब्रिटिशकालीन धर्मशाळा सार्वजनिक वापरासाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी संघर्ष समितीने प्रशासनाकडे केली आहे. कुडूस नाका परिसरातील अतिक्रमण, रस्त्याची रुंदी, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेचा वापर यासंदर्भातील अनेक मुद्दे निवेदनातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. दरम्यान, या मागण्यांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक आणि ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर कुडूस नाका येथे संघर्ष समितीच्या माध्यमातून भव्य जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन कुडूस नाका परिसरातील प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे ५२ गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. कुडूस नाका अतिक्रमणमुक्त होणार का? ४५ मीटर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार का? आणि संघर्ष समितीच्या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.2
- आईच्या आरोग्यासाठी १२ ज्योतिर्लिंग धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वर मध्ये उत्स्फूर्त स्वागत त्र्यंबकेश्वर :- आपल्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत देशातील १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प केलेला बिहारमधील धावपटू मोनू सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. मोनूने आतापर्यंत पायांनी तब्बल ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला असून, त्याने आतापर्यंत ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले आहे. आपल्या या प्रेरणादायी प्रवासादरम्यान मोनूचे आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यावेळी त्याचे उत्स्फूर्त आणि जोरदार स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी मोनूचे स्वागत करून त्याच्या या अनोख्या संकल्पाला शुभेच्छा दिल्या. यानंतर मोनूने Sapkal Knowledge Hub येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी देशभरात विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेले विविध प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता तसेच MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या यावरही त्याने भाष्य केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोनूने मेहनत, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले. मोनूचा हा प्रवास केवळ धार्मिक यात्रा नसून आईच्या आरोग्यासाठी केलेला संकल्प, श्रद्धा, जिद्द, शारीरिक क्षमता आणि देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे. महाराष्ट्रात मोनू चर्चेचा विषय आईच्या आरोग्यासाठी नवस करून १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन निघालेला बिहारचा मोनू सध्या महाराष्ट्रात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास आणि ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून त्याची ही प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.1
- मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना जरांगे पाटील यांच्या मोर्चा मध्ये बहु संख्येने मराठा बांधव मोर्चा मध्ये सामील मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना1
- EMI नहीं भरी तो युवक को बनाया बंधक, खून निकलवाने का आरोप! लखनऊ के निगोहां में EMI न भरने पर युवक को करीब 5 दिन तक बंधक बनाकर रखने और मारपीट का आरोप लगा है। पीड़ित का दावा है कि उसे ब्लड बैंक ले जाकर खून भी निकलवाया गया। मामले में DCP के आदेश पर गंभीर धाराओं में केस दर्ज कर पुलिस जांच कर रही है। #Lucknow #EMI #CrimeNews #UPNews #BreakingNews #HindiNews #Shorts1
- ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .1
- NASHIK : गॅस सिलिंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक. चोरीच्या सिलिंडर टाक्यांसह तब्बल 1 लाख 56 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ कडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या टाक्यांसह तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. NASHIK : गॅस सिलिंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक. चोरीच्या सिलिंडर टाक्यांसह तब्बल 1 लाख 56 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ कडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या टाक्यांसह तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..1
- इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए1
- मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कमळाबाई अनाजी वळवी (६५) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्यांच्या मुलावरच संशयाची सुई असून, गंगापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा संशय आहे. सकाळी परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची कार्यवाही केली. या प्रकरणात मुलगा तानाजी अनाजी वळवी (४०) याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. घटना घडली त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली दरम्यान, कमळाबाई वळवी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यांच्यावर हल्ला झाला होता का, तसेच या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास गंगापूर पोलीस करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुलावरच आईच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने या घटनेने हनुमान नगर परिसरात खळबळ उडाली असून, सून आणि मुलाच्या झालेल्या वादा नंतरच ही घटना घडल्याचे देखील बोलले जात आहे दरम्यान पोलिसांच्या तपासानंतर या संशयास्पद मृत्यूमागचे नेमके सत्य समोर येणार आहे.4