मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कमळाबाई अनाजी वळवी (६५) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्यांच्या मुलावरच संशयाची सुई असून, गंगापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा संशय आहे. सकाळी परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची कार्यवाही केली. या प्रकरणात मुलगा तानाजी अनाजी वळवी (४०) याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. घटना घडली त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली दरम्यान, कमळाबाई वळवी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यांच्यावर हल्ला झाला होता का, तसेच या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास गंगापूर पोलीस करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुलावरच आईच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने या घटनेने हनुमान नगर परिसरात खळबळ उडाली असून, सून आणि मुलाच्या झालेल्या वादा नंतरच ही घटना घडल्याचे देखील बोलले जात आहे दरम्यान पोलिसांच्या तपासानंतर या संशयास्पद मृत्यूमागचे नेमके सत्य समोर येणार आहे.
मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कमळाबाई अनाजी वळवी (६५) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्यांच्या मुलावरच संशयाची सुई असून, गंगापूर पोलिसांनी त्याला ताब्यात
घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा संशय आहे. सकाळी परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची कार्यवाही केली. या प्रकरणात मुलगा तानाजी अनाजी वळवी (४०) याच्यावर संशय व्यक्त करण्यात
येत असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. घटना घडली त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली दरम्यान, कमळाबाई वळवी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यांच्यावर हल्ला झाला होता का, तसेच या घटनेमागील नेमके कारण काय,
याचा तपास गंगापूर पोलीस करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुलावरच आईच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने या घटनेने हनुमान नगर परिसरात खळबळ उडाली असून, सून आणि मुलाच्या झालेल्या वादा नंतरच ही घटना घडल्याचे देखील बोलले जात आहे दरम्यान पोलिसांच्या तपासानंतर या संशयास्पद मृत्यूमागचे नेमके सत्य समोर येणार आहे.
- NASHIK : गॅस सिलिंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक. चोरीच्या सिलिंडर टाक्यांसह तब्बल 1 लाख 56 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ कडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या टाक्यांसह तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. NASHIK : गॅस सिलिंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक. चोरीच्या सिलिंडर टाक्यांसह तब्बल 1 लाख 56 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ कडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या टाक्यांसह तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..1
- आईच्या आरोग्यासाठी १२ ज्योतिर्लिंग धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वर मध्ये उत्स्फूर्त स्वागत त्र्यंबकेश्वर :- आपल्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत देशातील १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प केलेला बिहारमधील धावपटू मोनू सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. मोनूने आतापर्यंत पायांनी तब्बल ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला असून, त्याने आतापर्यंत ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले आहे. आपल्या या प्रेरणादायी प्रवासादरम्यान मोनूचे आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यावेळी त्याचे उत्स्फूर्त आणि जोरदार स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी मोनूचे स्वागत करून त्याच्या या अनोख्या संकल्पाला शुभेच्छा दिल्या. यानंतर मोनूने Sapkal Knowledge Hub येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी देशभरात विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेले विविध प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता तसेच MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या यावरही त्याने भाष्य केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोनूने मेहनत, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले. मोनूचा हा प्रवास केवळ धार्मिक यात्रा नसून आईच्या आरोग्यासाठी केलेला संकल्प, श्रद्धा, जिद्द, शारीरिक क्षमता आणि देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे. महाराष्ट्रात मोनू चर्चेचा विषय आईच्या आरोग्यासाठी नवस करून १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन निघालेला बिहारचा मोनू सध्या महाराष्ट्रात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास आणि ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून त्याची ही प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.1
- ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .1
- सुरगाणा तालुक्यातील दुमी वरंबा रस्त्याची दुरवस्था झाली आहे1
- चांदवडला आगमन मिरवणूकांनी गणरायाची वाजतगाजत प्रतिष्ठापना; ‘वरचे गावचा राजा’ची लक्षवेधी मिरवणूकीने स्थापना; ‘महाकाल अघोरी तांडव’चा सजीव देखावा पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी चांदवड शहरातील विविध गणेश मंडळांनी आगमन मिरवणूका काढून आपल्या गणरायाची उत्साहात, वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. गणेश मंडळांच्या सुमारे १५ फुटी भव्य गणेशमूर्तींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील वरचे गाव येथील छत्रपती संभाजी महाराज फेंड सर्कलच्या ‘वरचे गावचा राजा’चा मुखदर्शन व आगमन सोहळा लक्षवेधी ठरला. या मंडळाच्या मिरवणूकीचे विशेष आकर्षण असलेला महाकाल अघोरी तांडव नृत्य प्रयोग हा सजीव देखावा पाहण्यासाठी अबालवृद्ध, बाळगोपाळांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी (दि. १२) पहाटे तीन वाजता नंदुरबार येथून निघालेल्या ‘वरचे गावचा राजा’च्या सुमारे १५ फूर्टी भव्य गणेशमूर्तीचे सुमारे १५ तासानंतर शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चांदवड शहरात आगमन झाले. रविवारी (दि. १३) सायंकाळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ‘वरचे गावच्या राजा’च्या आगमन मिरवणूकीस प्रारंभ झाला. मिरवणूकीत डीजे पथक, महाबली हनुमान देखावा, बालाजी देखावा, भगवान शिवशंकराचे रुप, ढोल-ताशांच्या तालावर अघोरी नृत्य करणारे साधू, महाकाली देखावा यासह नाशिक येथील सुमारे १०० सदस्यांचे ढोलताशा पथक सहभागी झाले होते. मिरवणूकीचे विशेष आकर्षण असलेल्या हरियाणा येथील महाकाल अघोरी पथकाचा शिवतांडव, अग्नीतांडव नृत्य प्रयोग हा सजीव देखावा पाहण्यासाठी अबालवृद्ध, बालगोपाळांसह महिला व नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. महाकाल यांचा तिसरा डोळा उघडल्यानंतरचे आक्रमक रुप, कांतारा, कालिकादेवी, महाकाली, शिवपार्वती व अघोरींचे नृत्य चांदवडकरांनी अनुभवले. पथकाने सादर केलेली अग्नी व भस्माच्या चित्तथरारक कसरती पाहण्यासाठी शहरातील रस्ते नागरीकांच्या गर्दीने भरले होते. या मिरवणूकीत तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांच्या प्रदर्शनानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी फटायांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. आठवडे बाजार तळ, सोमवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम रोड, शिवनेरी चौक, शिंपी गल्ली मार्गे सुमारे पाच तासानंतर मिरवणूकीची वरचे गाव येथे सांगता झाली. यावेळी गणेशाच्या मुखदर्शनप्रसंगी फटायांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. मिरवणूक यशस्वीतेसाठी छत्रपती संभाजी महाराज फेंड सर्कलच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ---- गणेश मंडळांकडून भव्य गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना- संभाजी महाराज फ्रेंड सर्कलच्या मंडळासह शहरातील त्रिलोक गणेश मित्र मंडळ, संत गाडगेबाबा चौक गणेश मित्र मंडळ, हिंदुराजा गणेश मित्र मंडळ, राजमुद्रा फ्रेंड सर्कल आदी विविध मंडळांचाही गणेश आगमन सोहळा वाजतगाजत, डीजे च्या निनादात पार पडला. या मंडळांनीही भव्य गणेशमूतींची वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळून निघालेल्या गणेश आगमन मिरवणूकांची मंडळांच्या गणेश प्रतिष्ठापनास्थळी सांगता झाली.4
- वाहेगाव साळ येथे नव्याने हनुमान चौक मित्र मंडाळाची स्थापना सामाजिक व धामी॔क उपक्रमांची सुरुवा तरुण मुले एकत्र येवुन हनुमान चौक मंत्र मंडाळाची स्थापना करुन वष॔ पहीले गणपती बाप्पाची मुती॔ बसुन मित्र मंडळ व पोलीस पाटिल उपस्थतीत गणपती बाप्पाची पहीली आरती घेण्यात आली दरवषी॔ मोठ्या उत्साहात करणार2
- धोकादायक ठिकाणी झेंडे अथवा सजावट करताना जीव धोक्यात घालू नका; उच्चदाबाच्या विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर राखा, असे आवाहन करण्यात येत आहे. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने सातपूर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असतानाच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जेपी नगर येथे दुर्दैवी दुर्घटनेने या आनंदावर विरजण पडले. हनुमान मंदिरावर गणेशोत्सवाच्या स्थापनेनिमित्त भगवा झेंडा लावत असताना दोन मुलांना उच्चदाबाच्या विद्युत तारांचा जोरदार धक्का बसल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयुष शंकर मिरेकर (१५) आणि आदित्य अशोक मिरेकर हे दोघे हनुमान मंदिरावर भगवा झेंडा लावण्यासाठी चढले होते. मात्र, झेंड्याला असलेल्या लोखंडी रॉडचा जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत तारांशी संपर्क आल्याने क्षणार्धात मोठा विद्युत अपघात झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने आयुष खाली कोसळला, तर आदित्यलाही गंभीर स्वरूपाचा विजेचा धक्का बसला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी आयुषला तातडीने सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर आदित्यला कराड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे एपीआय भडांगे आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगरसेवक नितीन निगळ आणि सामाजिक कार्यकर्ते रवी काळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने जेपी नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उत्सव साजरा करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याची गंभीर जाणीव या घटनेने करून दिली आहे. विशेषतः उच्चदाबाच्या विद्युत तारांजवळ झेंडे, पताका किंवा लोखंडी साहित्य हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.3
- मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कमळाबाई अनाजी वळवी (६५) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्यांच्या मुलावरच संशयाची सुई असून, गंगापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा संशय आहे. सकाळी परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची कार्यवाही केली. या प्रकरणात मुलगा तानाजी अनाजी वळवी (४०) याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. घटना घडली त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली दरम्यान, कमळाबाई वळवी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यांच्यावर हल्ला झाला होता का, तसेच या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास गंगापूर पोलीस करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुलावरच आईच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने या घटनेने हनुमान नगर परिसरात खळबळ उडाली असून, सून आणि मुलाच्या झालेल्या वादा नंतरच ही घटना घडल्याचे देखील बोलले जात आहे दरम्यान पोलिसांच्या तपासानंतर या संशयास्पद मृत्यूमागचे नेमके सत्य समोर येणार आहे.4