पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट-०६ च्या पथकाने एका मोठ्या कोम्बिंग आणि राऊंड अप ऑपरेशनदरम्यान, २०१७ मधील अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील सुमारे ९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी अमर बबन घाडगे (वय २९ वर्षे, रा. दीपकनगर, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, हडपसर, पुणे) याला अटक केली आहे. दिनांक ३०/०५/२०२६ रोजी गुन्हे शाखेकडून कोम्बिंग आणि राऊंड अप ऑपरेशन राबवले जात असताना, युनिट-०६ चे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड यांच्या निर्देशानुसार, पथक पाहिजे/फरारी आरोपी आणि अवैध अग्निशस्त्र तस्करीबाबत गोपनीय माहिती काढत होते. याच दरम्यान, हडपसर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार समीर पांडुळे व गणेश माने यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ९८९/२०१७ (भा.द.वि.क. ३०७, ३६४, ३४१, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८) मधील पाहिजे असलेला आरोपी अमर घाडगे हा लक्ष्मी कॉलनी भागात उभा आहे. बातमीदाराने त्याचे वर्णनही दिले होते—त्याने फिक्कट क्रीम रंगाचा हाफ बाह्यांचा टी-शर्ट, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट घातली असून, त्याच्या उजव्या हातावर 'Payal' असे नाव गोंदलेले आहे. माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ लक्ष्मी कॉलनी परिसरात धाव घेतली. वर्णनावरून शोध घेत असताना, आरोपी लक्ष्मी कॉलनी कॅनॉलच्या अलीकडे, सोलापूर-पुणे हायवे रोडवर (हडपसर, पुणे) उभा असलेला दिसून आला. पथकाने अत्यंत शिताफीने त्याला घेरून पकडले. चौकशी केली असता त्याने आपले नाव अमर बबन घाडगे असे कबूल केले. संबंधित गुन्ह्याबाबत अधिक चौकशीत, आरोपीने हा गुन्हा त्याचे इतर साथीदार आणि पूर्वीच अटक झालेले आरोपी अमोल आडेगावर, मारुती गवळी व इतर साथीदारांसह मिळून केला असल्याची कबुली दिली. आरोपी अमर घाडगे याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्विनी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा युनिट-०६) श्री. सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, सतिश वनवे, समीर पांडुळे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, उमेश शेलार आणि अनिल जामगे या पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

- पिंपरी चिंचवडमधील म्हाळुंगे सावरदरी येथील 'टाईने रिबेल' या नव्याने स्थापन होत असलेल्या बीअर कंपनीतून ३६ लाख रुपये किमतीच्या १० बीअर स्टोअरेज टँकची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांनी यशस्वीरित्या छडा लावला असून, या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, कंपनीच्या एका विश्वासू माजी कामगारानेच या चोरीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. फिर्यादी विवेक खैरे यांना सुमारे ४० दिवसांनंतर या चोरीची माहिती मिळाल्याने पोलिसांना तपासासाठी कोणताही थेट दुवा उपलब्ध नव्हता. मात्र, पोलीस पथकाने परिसरातील जवळपास ३० ते ३५ कंपन्यांचे ६०० GB पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे संशयित क्रेन आणि ट्रकची ओळख पटवण्यात आली. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी कंपनीचा माजी कामगार प्रसाद विनोद राजळे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात मुख्य सूत्रधार प्रसाद राजळे याच्यासह चोरीला मदत करणारे आणि मुद्देमाल खरेदी करणारे चंदन अर्जुन सिंग, अली अहमद चौधरी, फिरोज असगर अली खान, किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता आणि नियाज मोहम्मद इसराईल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून कुदळवाडी, चिखली आणि मुंब्रा येथून चोरीला गेलेल्या ३६ लाख रुपये किमतीच्या सर्व १० स्टील टाक्या यशस्वीरित्या जप्त केल्या आहेत.1
- ८९ टक्के दिव्यांग असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला घराघरांत जाऊन जनगणनेचे काम करण्याचे आदेश देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी सामाजिक संघटनांनी प्रशासनाला जाब विचारला असून त्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.1
- पुणे विधान परिषद निवडणुकीत होणारी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी नसेल. या निवडणुकीत मुख्य सामना महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच पाहायला मिळेल.1
- केशव सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या वीज समस्येमुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत.1
- पिंपरी-चिंचवड येथील भोसरी परिसरातून तृतीयपंथी समाजसेविका सोनी बाबू वाघमारे यांनी काही व्यक्तींविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी खंडणीची मागणी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, बदनामी आणि मानसिक छळ अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींकडून वाघमारे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असून, ती पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, तक्रारदार, त्यांच्या कुटुंबीयांना आणि शिष्यांना त्रास देणे, त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाघमारे यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करत त्यांच्याकडून संघटित पद्धतीने छळ केला जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगत, सोनी बाबू वाघमारे यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.1
- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सारोळा परिसरात एका भीषण अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. कॉलेजमध्ये प्रवेशाची स्वप्ने उराशी बाळगून घराबाहेर पडलेले हे तरुण घरी परतलेच नाहीत. अवघ्या तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या नव्या दुचाकीवरून कॉलेजचे ॲडमिशन करून परत येत असताना, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या दोन मित्रांना आपला जीव गमवावा लागला. सारोळा येथील या भीषण अपघातामुळे नायगाव आणि शिरवळ परिसरात शोककळा पसरली आहे.1
- शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबार आणि हल्ल्यात शिरूर येथील विशाल काळे (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, केदार झाडगे जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा-न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल काळे, उमेश अनिल जगदाळे (वय २६) आणि केदार झाडगे हे तिघे जण टोयोटा टायझर (एमएच १२ एक्सक्यू ५१०४) या कारमधून न्हावऱ्याकडून शिरूरकडे जात होते. त्यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (एमएच १४ एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी टोयोटा कारच्या पुढील काचेवर चार राउंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर तिघेही कारमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मृतदेहाजवळ दोन रिकामी काडतुसे आणि काही मोठे दगड आढळले आहेत. केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर आरोपी किया सोनेट कार आणि मोटारसायकलवरून पसार झाले. शिरूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपी सनी यादव आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विशाल काळे तसेच संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे. या निर्घृण हत्येमुळे शिरूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हल्ल्यामागील सूत्रधार आणि अन्य सहभागी आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.2
- पिंपरी-चिंचवड शहरात विषारी गावठी दारूमुळे १४ जणांचा मृत्यू होऊनही अवैध दारूचा सुळसुळाट थांबलेला नाही. शहराच्या विविध झोपडपट्ट्यांमध्ये तब्बल ५८ हातभट्ट्या आणि ६ ताडीचे अड्डे अजूनही राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. निगडी, पिंपरी, भाटनगरसह अनेक भागांत खुलेआम दारू विक्री सुरू असल्याने कामगार आणि तरुण वर्ग व्यसनाच्या विळख्यात अडकत असून अनेक कुटुंबे यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. दरम्यान, नागरिकांच्या वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाकडून केवळ दिखाऊ कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवैध दारूच्या या जाळ्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अवैध दारूचे हे जाळे मुळासकट नष्ट करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. येत्या काही दिवसांत प्रभावी कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.2