एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत आरोग्य सुविधांबाबत आढावा अक्कलकोट पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य व्यवस्था, नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा तसेच ग्रामीण भागातील आरोग्यविषयक विविध प्रश्नांबाबत आढावा घेऊन चर्चा केली. तसेच आरोग्य विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्काराचा स्वीकार केला. अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांना अधिक गती देणे, आवश्यक त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणे आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी सोडविण्यासाठी प्रभावीपणे काम करणे आवश्यक असल्याचेही यावेळी नमूद केले. यावेळी तहसीलदार श्री. विनायक मगर, गटविकास अधिकारी श्री. शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. अमोल मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, उपसभापती श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य श्री. सिद्धाराम शिवमूर्ती, श्री. विकास बुळ्ळा व श्री. विजय तानवडे, पंचायत समिती सदस्य सौ. विमल गव्हाणे, श्री. विनोद मोरे, श्री. अप्पासाहेब किवडे, श्री. उत्तम वाघमारे व श्री. शिवराज म्हेत्रे, विस्तार अधिकारी श्री. महेश भोरे तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत आरोग्य सुविधांबाबत आढावा अक्कलकोट पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य व्यवस्था, नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा तसेच ग्रामीण भागातील आरोग्यविषयक विविध प्रश्नांबाबत आढावा घेऊन चर्चा केली. तसेच आरोग्य विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्काराचा स्वीकार केला. अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांना अधिक गती देणे, आवश्यक त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणे आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी सोडविण्यासाठी प्रभावीपणे काम करणे आवश्यक असल्याचेही यावेळी नमूद केले. यावेळी तहसीलदार श्री. विनायक मगर, गटविकास अधिकारी श्री. शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. अमोल मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, उपसभापती श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य श्री. सिद्धाराम शिवमूर्ती, श्री. विकास बुळ्ळा व श्री. विजय तानवडे, पंचायत समिती सदस्य सौ. विमल गव्हाणे, श्री. विनोद मोरे, श्री. अप्पासाहेब किवडे, श्री. उत्तम वाघमारे व श्री. शिवराज म्हेत्रे, विस्तार अधिकारी श्री. महेश भोरे तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
- DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. या व्हिडिओमध्ये धाराशिव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, गुन्हेगारी, विकासकामे, स्थानिक समस्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. 📍 धाराशिव | उस्मानाबाद व परिसर 🗓️ दिनांक : २७ ऑगस्ट २०२६ अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी झुंजार SC 37 NEWS OSMANABAD चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा. 📞 संपर्क : 08805974164 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share ↗️ करा आणि तुमचे मत Comment मध्ये नक्की कळवा.1
- धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* *धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबई येथे आपल्या भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री आदिती ताई तटकरे तसेच पुणे येथे सौ. प्रमिलाताई पुरुषोत्तम केंद्रे यांच्या कडून राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले आहे. तीनही बहिणींकडून राखी बांधून तिघींच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा तसेच कायम जनतेची सेवा घडावी, अशा शुभेच्छा धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणींना दिल्या. पंकजाताई मुंडे, प्रमिलाताई केंद्रे तसेच आपल्या सर्व बहिणी यांच्याबरोबरच आदितीताई तटकरे यांच्या समवेत धनंजय मुंडे हे दरवर्षी न चुकता रक्षा बंधन साजरे करतात, ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे.2
- बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .1
- ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठान येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर भेटलेल्या बालपणीच्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आणि सोनेरी आठवणींना उजाळा दिला. संसाराच्या व्यापातून स्वतःसाठी एक दिवस सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे (कळसकर) यांच्या विशेष पुढाकाराने या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर संसाराच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना एक दिवस स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगता यावा, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. यासाठी कुमशी, घोसापुरी आणि नामलगाव परिसरातील १९९०-९१ या बॅचच्या (इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी) माजी विद्यार्थिनींना एकत्र आणण्यात आले. खेळ, शिदोरी आणि मनमोकळ्या गप्पा तब्बल साडेतीन दशकांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या सर्वजणींनी संपूर्ण दिवस एकमेकींना गजरे लावून, सुख-दुःखाच्या गप्पा मारत आणि मनमोकळेपणाने संवाद साधत (शेअरिंग करून) बालपणातील ते दिवस पुन्हा अनुभवले. या मेळाव्यातील काही खास क्षण: पारंपरिक खेळ: या वयातही महिलांनी शाळेच्या मैदानावर खेळले जाणारे खो-खो, आंधळी कोशिंबीर आणि पायदोड यांसारखे पारंपरिक खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. सहभोजन: प्रत्येकीने घरून आणलेली 'शिदोरी' एकत्र करून सर्वजणींनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. रक्षाबंधन व स्नेहभेट: मैत्रिणींनी एकमेकींना राखी बांधून मैत्रीचे हे अतूट नाते अधिक घट्ट केले आणि एकमेकींना स्नेहभेटही दिली. या आनंददायी आणि भावपूर्ण मेळाव्याला मीरा बांड, शिवकन्या बांड, शारदा शेळके, किस्किनदा बांड, मंगल करपे, कांता शिंदे, उषा जाधव, शालिनी नेरे, दैवशाला डोळस आणि रुक्मिणी नागापुरे आदी माजी विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती. ३५ वर्षांनंतरचा हा मेळावा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.2
- खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खड्डेमय रस्ता, धोकादायक वळणे अन् वाढती वाहतूक; PWD विभागाने तातडीने दुरुस्ती करावी खेड बु!! | वार : शुक्रवार | दिनांक : २८/८/२०२६ खंडाळा–लोणंद मार्गावरील तुळशी वृंदावन येथे एमएच ११ ए.डब्ल्यू. ६०२३ आणि एमएच ०४ के.यू. १०९६ या दोन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा रेस्क्यू टीमने तत्काळ मदतकार्य केले, तर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व गर्दी नियंत्रणात आणली. खेड बुद्रुक–लोणंद रस्ता प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेला असून रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व्हॉइस ऑफ मीडिया खंडाळा तालुका संपर्क प्रमुख सुनिल रासकर यांनी यापूर्वीही सातत्याने आवाज उठविला असून साथ प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला आहे. अपघातावेळी सुनिल रासकर व आर.पी.आय. खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्या सतर्कतेमुळे पुढील मदत मिळण्यास मदत झाली. “अजून किती जीव गेल्यावर PWD जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. जीवितहानी टळली; मात्र धोका कायम! PWD ने आता तरी जागे व्हावे.1
- महिला आयोगाच्या माजी अयोग्य अध्यक्ष रुपाली चाकणकर आता पब् बार रेस्टॉरंट च्या व्यवसायात. नाही म्हणले तरी साठ ते सत्तर कोटी ची लागत.ताई एवढे पैसे आले कुठून. महिला आयोगाच्या माजी अयोग्य अध्यक्ष रुपाली चाकणकर आता पब् बार रेस्टॉरंट च्या व्यवसायात. नाही म्हणले तरी साठ ते सत्तर कोटी ची लागत.ताई एवढे पैसे आले कुठून.असे कॉग्रेसच्या नेत्या मनीषा तिवारी यांनी म्हंटले आहे, ते मुंबई महेश शेट्टी Dance Bar वाले,under world चा कोणी मुजावर हे त्यात काय आहेत.त्या खरात भोंदू ने बायका खराब केल्या आता तुमचे पुत्र रत्न सोहम पुण्याची तरुण पिढी नासवणार,बरबाद करणार का? बाई जरा आवारा. पुण्याचे आमदार बंधू ह्यानी तुम्हाला लीज नी जागा दिली.आपण 6 पार्टनर घेतले असे ऐकिवात आहे तुमच्या सोहम बाळा बरोबर. एवढे पैसे तुमच्या कडे येण्याचे स्तोत्र काय आहे.1
- बारामतीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन; वृक्षाला राखी बांधून अजितदादांच्या आठवणींना उजाळा1
- विद्यार्थिनींनी चालक-वाहकांना बांधल्या राख्या; भावनिक क्षणी चालकांच्या डोळ्यात अश्रू ! विद्यार्थिनींनी चालक-वाहकांना बांधल्या राख्या; भावनिक क्षणी चालकांच्या डोळ्यात अश्रू ! आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील नाझरे येथे रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबवला. महामार्गावर प्रवास करणाऱ्या चालक आणि वाहकांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या प्रेमळ कृतीने चालक भारावून गेले आणि काही चालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. नातं रक्ताचं नसतं, तर ते माणुसकीच्या धाग्यानेही जुळतं...1