महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन ... "भोले सरकार" भक्त परिवाराचे आगळेवेगळे आयोजन... धरणगाव -- येथील "भोले सरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या" वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्री निमित्त निघालेल्या पालखी मिरवणुक व शाही बारात च्या माध्यमातून गावातील शिव भक्तांना बैलगाड्यांवर १२ ज्योतिर्लिंग दर्शन यांसह महाकाली माता - भोलेनाथ - बाहुबली हनुमान, नंदीवर स्वार महादेव, राधा - कृष्ण, राम - लक्ष्मण, देव - दानव - मानव तसेच भुतों की बारात असं भव्य दिव्य आयोजन धरणगावकरांनी अनुभवलं. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील नऊ वर्षांपासून सातत्याने "भोले सरकार" भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी देखील अगदी उत्साहाने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त स. ४.३० वा. महाभस्म आरती, स. १०.०० वाजेपासून फराळ वाटप, सायं. ५.०० वा.भव्य पालखी सोहळा व बारात मिरवणूक, रात्री सामुदायिक रूद्राष्टकम्, लिंगाष्टकम्, शिवस्तुती, कालभैरव अष्टक, नटराज स्तुती, व्दादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, सामूहिक पठन, शिव तांडव नृत्य, सांस्कृतिक नाट्यकथा, भजन गायन शिवस्तुती महिला मंडळाच्या वतीने संपन्न झाले. सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक, शाही बारात व १२ ज्योतिर्लिंग दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाशिवरात्री निमित्त निघालेल्या पालखी मिरवणुक व शाही बारात च्या माध्यमातून गावातील शिव भक्तांना बैलगाड्यांवर १२ ज्योतिर्लिंग दर्शन यांसह महाकाली माता - भोलेनाथ - बाहुबली हनुमान, नंदीवर स्वार महादेव, राधा - कृष्ण, राम - लक्ष्मण, देव - दानव - मानव तसेच भुतों की बारात असं भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते. गावातील रामदेवजी बाबा नगर येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष लिलाबाई सुरेश चौधरी यांच्या हस्ते आरती संपन्न झाल्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. सर्वात आधी वाद्याच्या तालावर थिरकणारे युवा भक्त, पाठोपाठ विविध झाँक्या, त्यानंतर बैलगाड्यांवर १२ ज्योतिर्लिंग दर्शन, महिला - पुरुष - अबालवृद्ध व सर्वात शेवटी बाबा भोलेनाथ यांची सुंदर सजावट असलेली पालखी असा क्रम लावण्यात आला होता. भोले सरकार भक्त परिवाराचे शिस्तबद्ध नियोजन, विद्युत रोषणाई, पारंपरिक वाद्य, भोलेबाबांचा जयघोष अशी कितीतरी वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवली. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांचा उत्साह बघून धरणगाव शहराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भव्यदिव्य मिरवणुकीचा मार्ग रामदेवजी बाबा नगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक - छत्रपती शिवराय स्मारक - परिहार चौक - लांडगे गल्ली - लालबहादूर शास्त्री स्मारक - कोट बाजार - तात्यासाहेब महात्मा फुले स्मारक (धरणी चौक) - डेलची - बजरंग चौक - हनुमान नगर - पारोळा नाका - सार्जेश्वर महादेव मंदिर असा होता. बारात व मिरवणुकीत उज्जैन येथून विशेष उपस्थिती देण्यासाठी आलेल्या सर्व कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करून लोकांची मने जिंकून घेतली. सार्जेश्वर महादेव मंदिराच्या पावन परिसरात मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी सर्व कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या दैदीप्यमान कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने "भोले सरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या" वतीने आयोजित कार्यक्रमाला गावातील तसेच बाहेर गावातील महिला - पुरुष - युवक - अबालवृद्ध नागरिकांची प्रचंड उपस्थिती व प्रेम लाभले. गावातील कोणाकडूनही एक नया पैसा न घेता एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित करता येतो याचे उदाहरण धरणगावकरांनी अनुभले. या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या आयोजनात तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी "भोले सरकार" भक्त परिवाराच्या प्रत्येक सदस्याने घरचे कार्य समजून जबाबदारी स्वीकारून काम केले. या सर्व युवकांना गावातील जनतेचे व महादेव भक्तांचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभले.
महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन ... "भोले सरकार" भक्त परिवाराचे आगळेवेगळे आयोजन... धरणगाव -- येथील "भोले सरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या" वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्री निमित्त निघालेल्या पालखी मिरवणुक व शाही बारात च्या माध्यमातून गावातील शिव भक्तांना बैलगाड्यांवर १२ ज्योतिर्लिंग दर्शन यांसह महाकाली माता - भोलेनाथ - बाहुबली हनुमान, नंदीवर स्वार महादेव, राधा - कृष्ण, राम - लक्ष्मण, देव - दानव - मानव तसेच भुतों की बारात असं भव्य दिव्य आयोजन धरणगावकरांनी अनुभवलं. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील नऊ वर्षांपासून सातत्याने "भोले सरकार" भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी देखील अगदी उत्साहाने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त स. ४.३० वा. महाभस्म आरती, स. १०.०० वाजेपासून फराळ वाटप, सायं. ५.०० वा.भव्य पालखी सोहळा व बारात मिरवणूक,
रात्री सामुदायिक रूद्राष्टकम्, लिंगाष्टकम्, शिवस्तुती, कालभैरव अष्टक, नटराज स्तुती, व्दादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, सामूहिक पठन, शिव तांडव नृत्य, सांस्कृतिक नाट्यकथा, भजन गायन शिवस्तुती महिला मंडळाच्या वतीने संपन्न झाले. सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक, शाही बारात व १२ ज्योतिर्लिंग दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाशिवरात्री निमित्त निघालेल्या पालखी मिरवणुक व शाही बारात च्या माध्यमातून गावातील शिव भक्तांना बैलगाड्यांवर १२ ज्योतिर्लिंग दर्शन यांसह महाकाली माता - भोलेनाथ - बाहुबली हनुमान, नंदीवर स्वार महादेव, राधा - कृष्ण, राम - लक्ष्मण, देव - दानव - मानव तसेच भुतों की बारात असं भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते. गावातील रामदेवजी बाबा नगर येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष लिलाबाई सुरेश चौधरी यांच्या हस्ते आरती संपन्न झाल्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. सर्वात आधी वाद्याच्या तालावर थिरकणारे युवा भक्त, पाठोपाठ विविध झाँक्या,
त्यानंतर बैलगाड्यांवर १२ ज्योतिर्लिंग दर्शन, महिला - पुरुष - अबालवृद्ध व सर्वात शेवटी बाबा भोलेनाथ यांची सुंदर सजावट असलेली पालखी असा क्रम लावण्यात आला होता. भोले सरकार भक्त परिवाराचे शिस्तबद्ध नियोजन, विद्युत रोषणाई, पारंपरिक वाद्य, भोलेबाबांचा जयघोष अशी कितीतरी वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवली. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांचा उत्साह बघून धरणगाव शहराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भव्यदिव्य मिरवणुकीचा मार्ग रामदेवजी बाबा नगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक - छत्रपती शिवराय स्मारक - परिहार चौक - लांडगे गल्ली - लालबहादूर शास्त्री स्मारक - कोट बाजार - तात्यासाहेब महात्मा फुले स्मारक (धरणी चौक) - डेलची - बजरंग चौक - हनुमान नगर - पारोळा नाका - सार्जेश्वर महादेव मंदिर असा होता. बारात व मिरवणुकीत उज्जैन येथून विशेष उपस्थिती देण्यासाठी आलेल्या सर्व कलाकारांनी आपल्या
कलेचे सादरीकरण करून लोकांची मने जिंकून घेतली. सार्जेश्वर महादेव मंदिराच्या पावन परिसरात मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी सर्व कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या दैदीप्यमान कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने "भोले सरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या" वतीने आयोजित कार्यक्रमाला गावातील तसेच बाहेर गावातील महिला - पुरुष - युवक - अबालवृद्ध नागरिकांची प्रचंड उपस्थिती व प्रेम लाभले. गावातील कोणाकडूनही एक नया पैसा न घेता एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित करता येतो याचे उदाहरण धरणगावकरांनी अनुभले. या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या आयोजनात तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी "भोले सरकार" भक्त परिवाराच्या प्रत्येक सदस्याने घरचे कार्य समजून जबाबदारी स्वीकारून काम केले. या सर्व युवकांना गावातील जनतेचे व महादेव भक्तांचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभले.
- Post by SamirQureash Quresh1
- Post by महेंद्र रघुनाथ महाजन बक्षीपुर9
- Post by Ayaz patel Ayaz patel1
- सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....2
- Khanapur1
- धाडमध्ये व्यवसायिकांना हप्ता मागणारी गॅंगची पोलिसांनी काढली धिंड गुंडांची धिंड काढल्याने धाड पोलिसांचे होत आहे कौतुक धाड परिसरात गुंडगिरी करून सामान्य नागरिकांच्या मनात आपली भीती निर्माण करणारे काही टवाळखोरांनी एका मेडिकल संचालकास मारहाण करत हप्ता मागितलं होतं. याच हप्तेखोर गॅंगमधील 3 आरोपींची धाड पोलिसांनी धिंड काढून जनतेच्या मनात निर्माण झालेली धास्ती मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा तालुक्यातील दुधा येथील रहिवासी पवन राजेंद्र सोनुने (वय ३०) याचे धाड येथे गुरांच्या औषधीचे मेडिकल आहे.मागील 6 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनुने आपल्या मेडिकलकडे जात असतांना 4 जणांनी त्यांना धाड येथील जगदंबा स्वीट मार्ट समोर अडवून धाड मध्ये व्यवसाय करायचं असेल तर आम्हाला हप्ता द्यावं लागेल असे म्हणत मारहाण केली होती. या प्रकरणी धाड ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.दरम्यान, याच गुन्ह्यातील काही आरोपींनी आणखी दोन हॉटेलमध्ये जाऊन धमकावत हप्त्याची मागणी केल्याची चर्चा रंगत आहे.या हप्ताखोर गॅंगमधील आरोपींची दहशत वाढत चालल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. धाडचे ठाणेदार प्रताप भोस यांनी तपास चक्रे फिरवून त्यांनी आरोपींना अटक केली. तसेच ग्रामस्थांच्या मनात बसलेली भीती दूर करण्यासाठी त्यांनी हप्ताखोर गॅंग मधील 3 आरोपी अक्षय जीवनलाल बिलांगे,रौशन गणेश शिंदे आणि राहुल दळवी यांची गावातून धिंड काढली. धाड मध्ये दहशत पसरवणारी या हप्ताखोर गॅंगची गावातील मुख्य बाजारपेठेत धिंड काढल्यामुळे ग्रामस्थांचे मनोबल वाढले असून पोलिसांचे देखील कौतुक होत आहे.1
- बुलढाण्यात जनआक्रोश! हद्दवाढीविरोधात ५ गावांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा.*1
- Post by SamirQureash Quresh2