logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिरूर अनंतपाळ ,देवणी नगरपंचायतीच्या निवडणुका शिवसेना स्वतंत्र ,स्वबळावर लढविणार :: सोमनाथ स्वामी डिगोळकर लातूर- सामान्याच्या विकासाचे सरकार साकारसाठी व सामान्य माणसाचा विकासाचा विचार तसेच मराठी माणसाला प्रत्येक ठिकाणी न्याय देण्यासाठी व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची जोपासना करण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने महायुती शासनामार्फत लोक उपयोगी विविध योजना मोठ्या प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करीत असून गोरगरिबांच्या जीवनात नव संजीवनी निर्माण करण्यासाठी शिवसेना पक्ष हा शासन स्तरावर आग्रही असून पक्षाचे मुख्य नेते व राज्याच्या महायुतीचे शिल्पकार, कर्तबगार उपमुख्यमंत्री मा ना एकनाथराव शिंदे साहेब हे यासाठी शासन व प्रशासन स्तरावर गतीने पावले उचलत आहेत, त्यातच त्यांच्याकडे नगर विकास खात्याची प्रमुख जबाबदारी असल्यामुळे प्रत्येक महानगर व ग्रामीण भागातील शहराचा कायापालट करण्यासाठी ते करोडो रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी युद्ध पातळीवर ते काम करीत असल्याने ,आगामी काही महिन्यात राज्यात व काही जिल्ह्यात होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या तसेच लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ व देवणी येथील निवडणुकीत त्याचा निश्चितच फायदा होणार असून या निवडणुकीची तयारी शिवसेनेच्या वतीने पूर्ण करण्यात आलेले असून सदर नेमणुका या पक्षाचे लोकसभा संपर्कप्रमुख मा आमदार मंगेशजी कुडाळकर साहेब व कर्तबगार जिल्हाप्रमुख मा शिवाजीराव माने साहेब यांच्या नेतृत्वाखालीच पार पडणार असल्याची माहिती निलंगा विधानसभा प्रमुख /प्रभारी उपजिल्हाप्रमुख ,सोमनाथ स्वामी डिगोळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.. पुढे बोलताना श्री डिगोळकर म्हणाले की शिवसेना पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असला तरीही भाजपा जर स्थानिक पातळीवरील नेते,आमदार, खासदार व सत्ता केंद्रस्थानी असलेले भाजपाचे पदाधिकारी जर शासन व प्रशासन स्तरावरील विकास कामात व निर्णय प्रक्रियेत शिवसेनेला दिलेल्या 20% सहभाग व वाट्या प्रमाणे विचारात घेत नसतील तर.. व त्या सोबतच ते पदाधिकारी यांना सन्मानाची वागणूक देत नसतील तर..शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी हे स्वातंत्र्य व स्वबळावर स्थानिक स्तरावरील निवडणुका लढवू इच्छितात, असा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असल्याने त्यासोबतचं पक्ष वाढविणे व पक्षीय जनमत घडविणे हा प्रत्येक पक्षाला असलेल्या स्वतंत्र अधिकार असून निलंगा विधानसभा मतदारसंघातील संभाव्य भाजपाचे आमदार हे गत अनेक वर्षांपासूनच महायुतीचा प्रमुख मित्रपक्ष, घटकपक्ष असलेल्या शिवसेनेलाच विकास व निर्णय प्रक्रियेत व प्रशासन व्यवस्थित विश्वासात घेत नसून ते दुय्यमपणाची वागणूक पदाधिकारी यांना देत असल्यामुळे सदर शिवसेना पक्ष हा महायुती मार्फत केंद्र व राज्यातील सत्तास्थानी सामील असतानाही त्यांच्या नियोजित हक्काच्या 20% सहभागाची वणवा होत असल्याने व ते मुद्दाम सहभागी करून घेत नसल्यामुळे काही महिन्यात होणाऱ्या आगामी शिरूर अनंतपाळ व देवणी नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष हा स्वतंत्र व स्वबळावर ,ताकदीने नगरपंचायत निवडणुका लढविणार असून नगर व जनविकासाचे व्हिजन व दृष्टिकोन ठेवून, ''वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विचारमंच '' या पॅनेलच्या माध्यमातून निवडणूकीस सामोरे जाणार असल्याचे नियोजित करण्यात आले आहे. ‌‌शिरूर अनंतपाळ व देवणी येथील या निवडणुकीची तयारी सध्या पूर्ण झालेली असून प्रत्येक वार्ड ,प्रभागातील उमेदवारही निश्चित करण्यात आलेले आहेत व त्यांच्या संभाव्य विजयाच्या तालीमसाठी दोन आढावा बैठकाही घेण्यात आलेल्या असून वार्डनिहाय, जनतेची प्रश्न सामाजिक विकासाची समस्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे.. त्यासोबत दैनंदिन जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी पक्षाचे संभाव्य उमेदवारही गतीने प्रयत्न करीत असून त्यांच्यासोबत पक्षाचे तालुका व शहर स्तरावरील पदाधिकारी या कामात सक्रियपणे सहभागी आहेत. तसेच या दोन्हीही नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठीचा खंबीर मनोदय सर्व प्रभागातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त करून ते युद्ध पातळीवर काम करीत असल्याचे चित्र आहे...

22 hrs ago
user_Sunil Gawali
Sunil Gawali
शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
22 hrs ago
2d7f2b5d-2fef-4e7b-947e-33d068d43d4c

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम
    1
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    1
    मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले.  या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    2
    ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न

मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. 
या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. ​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    1
    नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले.
​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.
    1
    हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर)
३१ जुलै :
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर)
३१ जुलै :
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे.
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०१ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०२ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०३ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०४ ऑगस्ट :
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण)
रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता.
दृश्यमानता कमी होण्याची शक्यता.
कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान.
असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान.
स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना.
विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे:
नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता.
सर्वसाधारण सूचना
जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात:
प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी.
प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे.
पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे.
धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे.
मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात:
मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे.
झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये.
विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत.
हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम
बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे.
भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे.
नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे.
सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे.
भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे.
वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे.
कृषी सल्ला
उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा.
खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी.
मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी.
भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
    1
    चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती.
चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026.
लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. 
या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे.
शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.