सोयगांव कुंभारीजवळ पुलावरून एसटी बस घसरली; विद्यार्थी, शिक्षिका आणि प्रवासी थोडक्यात बचावले सोयगाव सोयगाव आगाराची फर्दापूर–सावळदबारा मार्गावरील एसटी बस शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास कुंभारी गावाजवळील पुलावर घसरल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील विद्यार्थी, शिक्षिका व इतर प्रवासी थोडक्यात बचावले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-20 बीएल 2253 क्रमांकाची बस फर्दापूरहून सावळदबारा येथे जात असताना पुलावरील भरावामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस घसरली. बस पुलावरच अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. बस पलटी झाली असती तर गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच पुलांवरील भराव योग्य प्रकारे दाबला जात नसल्याने या ठिकाणी मोटारसायकलींसह जड वाहनेही वारंवार घसरत आहेत. यापूर्वीही या परिसरात अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागल्याची माहिती नागरिकांनी दिली. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून पुलावरील भराव सुरक्षित करावा आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी, चालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

- जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *"एसी सुरू असताना १,४०० रुपये बिल, आता एसी बंद असूनही ७,००० रुपये बिल" – नागरिकांचा संताप; बिलांची चौकशी करण्याची मागणी* जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, या मीटरमुळे वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी घरांमध्ये साधे वीज मीटर असताना उन्हाळ्यात एसीचा नियमित वापर करूनही मासिक वीजबिल सुमारे १,४०० रुपयांच्या आसपास येत होते. मात्र आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पावसाळ्यात एसीचा वापर बंद असतानाही मासिक तब्बल ७,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, वीजबिलाची गणना आणि मीटर रीडिंगबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे का?" असा सवाल अनेक नागरिक करत असून, वाढीव वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून, शासन आणि वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने खुलासा करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- आज सड़क निर्माण में हुई लापरवाही के कारण मेरे खेत में पानी भर गया है, जिससे फसल को नुकसान होने की आशंका है। इस संबंध में मैंने वीडियो भी रिकॉर्ड किया है। संबंधित विभाग से निवेदन है कि जल्द से जल्द मौके का निरीक्षण कर उचित कार्रवाई करें और समस्या का स्थायी समाधान करें।1
- सिल्लोड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहा मध्ये संपन्न झाले आहे सदरील कार्यक्रमाला सिल्लोड शहरातील विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती1
- नशिराबाद जवळील बोगद्यात पाणी... नागरिक आक्रमक टोलवसुली बंद! जळगाव शहरापासून नशिराबादजवळील पोलीस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करून टोलवसुली सुरूच ठेवण्यात आल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नशिराबाद टोल नाका गाठत काही काळासाठी टोलवसुली बंद पाडली. आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरता पुढे सोडण्यात आले. बोगद्यातील पाणी तातडीने काढून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. टोल कंपनी नियमित शुल्क आकारते, मात्र पावसाळ्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. काही काळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, "प्रथम सुरक्षित रस्ता आणि नंतर टोल" अशी भूमिका नागरिकांनी स्पष्ट करत हायवे प्रशासनाला इशारा दिला.1
- भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून1
- संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।1
- भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण1
- सावखेड़ा रोड तालुका पाचोरा सड़क निर्माण की वजह से मेरे खेत में पानी भर गया है। कृपया संबंधित विभाग इस समस्या पर तुरंत ध्यान दे और उचित कार्रवाई करे। आज सड़क निर्माण में हुई लापरवाही के कारण मेरे खेत में पानी भर गया है, जिससे फसल को नुकसान होने की आशंका है। इस संबंध में मैंने वीडियो भी रिकॉर्ड किया है। संबंधित विभाग से निवेदन है कि जल्द से जल्द मौके का निरीक्षण कर उचित कार्रवाई करें और समस्या का स्थायी समाधान करें।1