‘सखी वन स्टॉप सेंटर’ : संकटग्रस्त महिलांसाठी आधार, न्याय आणि नव्या आयुष्याची दिशा १,०७३ महिलांना मिळाला दिलासा परभणी, दि. २० : महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांविरोधात ठामपणे उभे राहत, त्यांना तातडीची मदत आणि न्याय मिळवून देणारे परभणीतील ‘सखी वन स्टॉप सेंटर’ हे केंद्र महिलांसाठी खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे. केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या पुढाकारातून २८ डिसेंबर २०१८ पासून सुरू झालेल्या या केंद्राने आतापर्यंत १,०७३ पीडित महिलांना विविध प्रकारची मदत देत न्याय मिळवून देण्यास हातभार लावला आहे. या केंद्रात पीडित महिलांना पोलीस मदत, कायदेशीर मार्गदर्शन, तसेच मानसिक समुपदेशन अशा सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. अनुभवी वकिलांमार्फत कायदेशीर प्रक्रियेचे मार्गदर्शन केले जाते, तर मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलांना पुन्हा उभारी देण्यासाठी समुपदेशनाची सुविधा दिली जाते. गरजू महिलांसाठी पाच दिवसांपर्यंत सुरक्षित निवासाची सोय देखील येथे उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती एम. एस. रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र प्रभावीपणे कार्यरत आहे. परभणीतील नानलपेठ येथील पशुसंवर्धन कार्यालय, पोलीस मुख्यालयासमोर हे केंद्र सुरू आहे. एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, अॅसिड हल्ला किंवा सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेल्या महिलांना वेगवेगळ्या कार्यालयांत जाण्याची गरज भासू नये, यासाठी या केंद्रामार्फत एकाच छताखाली सहा प्रकारच्या सेवा २४ तास विनामूल्य पुरवल्या जातात. मदतीसाठी पुढे या केंद्राच्या प्रशासक तेजस्विनी कांबळे यांनी महिलांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या छळाला बळी पडल्यास घाबरू नये आणि तात्काळ मदत घ्यावी. यासाठी शासनाचा १८१ हेल्पलाईन क्रमांक तसेच ०२४५२-२२५५०५ किंवा ७८७५७८७५४० या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. ‘सखी वन स्टॉप सेंटर’ हे केवळ सेवा देणारे केंद्र नसून, संकटात सापडलेल्या महिलांना संरक्षण, न्याय आणि नव्या आयुष्याची नवी उमेद देणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरत आहे.

- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- तेलंगाना के बोर्ड के अध्यक्ष परभणी जिले के केंद्र निरीक्षक अजमतउल्लाह हुसैनी के नेतृत्व में जिंतूर शहर संगठन सूजन अभियान5
- शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी ना मुख्यालयी वास्तव्यास आहेत, ना स्वतःच्या ग्रामपंचायतीत वेळेवर हजर असतात. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अंबुलगे यांच्याकडे मंगरूळ व वांजुळा पुनर्वसन अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता त्या रजेवरही नसल्याचे समोर आले. म्हणजेच रजेवर नाहीत, ग्रामपंचायतीत नाहीत, मुख्यालयी वास्तव्यास नाहीत, मग नेमके अधिकारी कुठे आहेत? ग्रामपंचायतचे दप्तर गावात नसून तालुक्याच्या ठिकाणी ठेवले जाते, ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नाही, आणि प्रशासन कागदोपत्रीच चालते हीच आजची खरी परिस्थिती आहे. संभाजी ब्रिगेड मंठा याचा तीव्र निषेध करते आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी, पगार कपात, शिस्तभंग कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची ठाम मागणी करते. गावकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल. संभाजी ब्रिगेड अन्याय सहन करणार नाही. जय जिजाऊ! जय शिवराय! जय संविधान! प्रयत्न आज करण्यात आला. शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी ना मुख्यालयी वास्तव्यास आहेत, ना स्वतःच्या ग्रामपंचायतीत वेळेवर हजर असतात. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अंबुलगे यांच्याकडे मंगरूळ व वांजुळा पुनर्वसन अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता त्या रजेवरही नसल्याचे समोर आले. म्हणजेच रजेवर नाहीत, ग्रामपंचायतीत नाहीत, मुख्यालयी वास्तव्यास नाहीत, मग नेमके अधिकारी कुठे आहेत? ग्रामपंचायतचे दप्तर गावात नसून तालुक्याच्या ठिकाणी ठेवले जाते, ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नाही, आणि प्रशासन कागदोपत्रीच चालते हीच आजची खरी परिस्थिती आहे. संभाजी ब्रिगेड मंठा याचा तीव्र निषेध करते आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी, पगार कपात, शिस्तभंग कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची ठाम मागणी करते. गावकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल. संभाजी ब्रिगेड अन्याय सहन करणार नाही. जय जिजाऊ! जय शिवराय! जय संविधान!1
- Post by Today One Live1
- Post by Karan1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2