logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लिंबागणेश येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अभिवादन ----- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश येथे अखंड क्रांतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त ग्राम पंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब जाधव होते. या वेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश गायकवाड यांनी केले. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, साहेबराव निर्मळ, ॲड.गणेश वाणी, ग्राम पंचायत सदस्य दामोदर थोरात, रमेश गायकवाड, जीवन मुळे, सुरेश निर्मळ, मोहनराव कोटुळे, महादेव वाणी, ज्ञानेश्वर कुदळे, संजय पावले, खंडू वाणी, श्रीराम तागड, भीमराव बोराटे, सुभाष मुळे, मल्हारी आबदार, पोपट निर्मळ सह आदी उपस्थित होते. --- “महात्मा फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी” :– डॉ.गणेश ढवळे -- या वेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. “विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली...” हा महात्मा फुले यांचा विचार उद्धृत करत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले असून, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजाला नवी दिशा दिली, असे त्यांनी सांगितले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी शाळा सुरू करून शिक्षण सर्वांसाठी खुले केले. अज्ञानाचा अंधार दूर करून समाज सक्षम बनवण्याचा त्यांचा विचार आज ही मार्गदर्शक आहे, असे ही त्यांनी नमूद केले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक विचारातून समाजाला जागृत करत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. धर्माच्या नावाने चालणाऱ्या अनिष्ट रूढी-परंपरांना विरोध करून “माणुसकी हाच खरा धर्म” असल्याचा संदेश त्यांनी दिला. शेतकरी हा देशाचा कणा असून तो अन्याय, कर्जबाजारीपणा व सामाजिक उपेक्षेखाली दबला जात असल्याचे वास्तव ही त्यांनी मांडले, असे डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले. सामाजिक समतेसाठी आयुष्यभर झटणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आज ही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

on 11 April
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
बीड, बीड, महाराष्ट्र•
on 11 April

लिंबागणेश येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अभिवादन ----- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश येथे अखंड क्रांतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त ग्राम पंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब जाधव होते. या वेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश गायकवाड यांनी केले. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, साहेबराव निर्मळ, ॲड.गणेश वाणी, ग्राम पंचायत सदस्य दामोदर थोरात, रमेश गायकवाड, जीवन मुळे, सुरेश निर्मळ, मोहनराव कोटुळे, महादेव वाणी, ज्ञानेश्वर कुदळे, संजय पावले, खंडू वाणी, श्रीराम तागड, भीमराव बोराटे, सुभाष मुळे, मल्हारी आबदार, पोपट निर्मळ सह आदी उपस्थित होते. --- “महात्मा फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी” :– डॉ.गणेश ढवळे -- या वेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. “विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली...” हा महात्मा फुले यांचा विचार उद्धृत करत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले असून, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजाला नवी दिशा दिली, असे त्यांनी सांगितले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी शाळा सुरू करून शिक्षण सर्वांसाठी खुले केले. अज्ञानाचा अंधार दूर करून समाज सक्षम बनवण्याचा त्यांचा विचार आज ही मार्गदर्शक आहे, असे ही त्यांनी नमूद केले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक विचारातून समाजाला जागृत करत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. धर्माच्या नावाने चालणाऱ्या अनिष्ट रूढी-परंपरांना विरोध करून “माणुसकी हाच खरा धर्म” असल्याचा संदेश त्यांनी दिला. शेतकरी हा देशाचा कणा असून तो अन्याय, कर्जबाजारीपणा व सामाजिक उपेक्षेखाली दबला जात असल्याचे वास्तव ही त्यांनी मांडले, असे डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले. सामाजिक समतेसाठी आयुष्यभर झटणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आज ही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ------- पाटोदा (प्रतिनिधी) :- एनसीईआरटी च्या इयत्ता आठवीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज दि.१ मे महाराष्ट्र दिनी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. या वेळी मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा अभ्यासक्रमातून हटविणे म्हणजे मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. तसेच राजस्थानातील विजयाची ऐतिहासिक वस्तुस्थिती नाकारणे चुकीचे असून कोणत्याही दबावाखाली इतिहासात बदल करू नये, अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली. निवेदन लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड यांनी स्विकारले. या संदर्भात जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, बाळकृष्ण थोरात, दामोदर थोरात, सुनिल ढवळे, दादा गायकवाड, सुरेश ढवळे, सर्पमित्र अशोक जाधव, संजय पावले, भगवान मोरे, रमेश वाणी, अंकुश वाणी, सुरेश कुलकर्णी, कचरू निर्मळ सह अनेक नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
    1
    -------
पाटोदा (प्रतिनिधी) :- एनसीईआरटी च्या इयत्ता आठवीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज दि.१ मे महाराष्ट्र दिनी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. या वेळी मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा अभ्यासक्रमातून हटविणे म्हणजे मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. तसेच राजस्थानातील विजयाची ऐतिहासिक वस्तुस्थिती नाकारणे चुकीचे असून कोणत्याही दबावाखाली इतिहासात बदल करू नये, अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली. निवेदन लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड यांनी स्विकारले. या संदर्भात जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, बाळकृष्ण थोरात, दामोदर थोरात, सुनिल ढवळे, दादा गायकवाड, सुरेश ढवळे, सर्पमित्र अशोक जाधव, संजय पावले, भगवान मोरे, रमेश वाणी, अंकुश वाणी, सुरेश कुलकर्णी, कचरू निर्मळ सह अनेक नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पीलीभीत में आज इकरा पब्लिक गर्ल्स इंटर कॉलेज में मेधावी छात्र छात्राओं तथा अभिभावकों का किया गया सम्मान । इकरा पब्लिक गर्ल्स इंटर कॉलेज में कक्षा 10 एवं 12 के मेधावी छात्र छात्राओं तथा उनके अभिभावकों के सम्मान में समारोह का आयोजन बड़े उत्साह और गरिमा के साथ किया गया। कक्षा 10 एवं कक्षा 12 की मेधावी छात्राओं को उनके उत्कृष्ट प्रदर्शन के लिए विद्यालय प्रबंधन की ओर से पुरस्कृत किया गया तथा उनके अभिभावकों को भी सम्मानित किया गया । कक्षा 10 में प्रथम स्थान पर अलीना बी ने 77.5% अंक प्राप्त कर विद्यालय का नाम रोशन किया। कनीज फातिमा ने 75.33% अंक प्राप्त कर द्वितीय तथा इल्मा ने 74.83% अंकों के साथ तृतीय स्थान हासिल किया। इनके अतिरिक्त अलीशा, फैजला अंसारी, गानिया फातिमा, इरम बी और हबीबा और उनके माता पिता को भी सम्मानित किया गया। कक्षा 12 में फारिया 80% इकरा नूर 77% इलमा खान 74.6% ने क्रमशः प्रथम द्वितीय एवं तृतीय स्थान प्राप्त किया । रहनुमा, मुस्कान, सोबिया, तलत और ज़ईमा खान ने भी शानदार प्रदर्शन करते हुए विद्यालय का गौरव बढ़ाया। समारोह की मुख्य अतिथि मदद फाउंडेशन की निदेशक श्रीमती समीना शाहिद ने छात्राओं के अभिभावकों का सम्मान करते हुए कहा कि जिन बच्चों ने विद्यालय का गौरव बढ़ाया है उनके माता पिता तारीफ के काबिल हैं जिन्होंने बच्चों के भविष्य के लिए विद्यालय पर अपना विश्वास दिखाया और बच्चों की शिक्षा के लिए अपना समय और सहयोग प्रदान किया।यही बच्चे कल उनका सहारा बनेंगे। प्रधानाचार्य श्री अखलाक हसन खान ने कहा हम वादा करते हैं कि आगे भी विद्यालय शिक्षा के क्षेत्र में नए कीर्तिमान स्थापित करता रहेगा श्री इकबाल हसन खान ने सभी उत्तीर्ण छात्राओं और उनके अभिभावकों का आभार व्यक्त किया और छात्राओं को जीवन में कुछ बन के अपने माता पिता के सपने सच करने के लिए प्रेरित किया। इस अवसर पर पूर्व वरिष्ट लिपिक एजाज़ हसन खान ने कक्षा 10 एवं कक्षा 12 के प्रथम आने वाली छात्राओं को एक एक हज़ार रूपए का नकद पुरस्कार दिया। समारोह में विद्यालय के शिक्षकों ने सभी छात्राओं के उज्ज्वल भविष्य की कामना की और उन्हें आगे भी इसी तरह मेहनत करने के लिए प्रेरित किया। इस समारोह में बच्चों और उनके अभिभावकों का उत्साह देखते ही बनता था।इस कार्यक्रम में कमाल शम्सी, मोनिस अयाज़, नसीब उद्दीन, सैयद शरिक अली सैयद तारिक अली मुमताज अहमद श्री वसीम उद्दीन खान, श्री नाजिर हुसैन, सैयद सीमा अली, मधु सक्सेना, रजनी सक्सेना, शबाना खान, अफसर हुसैन, मेहविश खान, मुताल हसन खान आदि लोग मौजूद रहे।
    1
    पीलीभीत में आज  इकरा पब्लिक गर्ल्स इंटर कॉलेज में मेधावी छात्र छात्राओं तथा अभिभावकों का किया  गया  सम्मान ।
इकरा पब्लिक गर्ल्स इंटर कॉलेज में कक्षा 10 एवं 12 के मेधावी छात्र छात्राओं तथा उनके अभिभावकों के  सम्मान में  समारोह का आयोजन बड़े उत्साह और गरिमा के साथ किया गया।  कक्षा 10 एवं कक्षा 12 की मेधावी छात्राओं को उनके उत्कृष्ट प्रदर्शन के लिए विद्यालय प्रबंधन की ओर से पुरस्कृत किया गया तथा उनके अभिभावकों को भी सम्मानित किया गया । 
कक्षा 10 में प्रथम स्थान पर अलीना बी ने 77.5% अंक प्राप्त कर  विद्यालय का नाम रोशन किया। कनीज फातिमा ने 75.33% अंक प्राप्त कर द्वितीय तथा इल्मा ने 74.83% अंकों के साथ तृतीय स्थान हासिल किया। इनके अतिरिक्त  अलीशा, फैजला अंसारी, गानिया फातिमा, इरम बी और हबीबा और उनके माता पिता को भी  सम्मानित किया गया।
कक्षा 12 में फारिया 80% इकरा नूर 77% इलमा खान 74.6% ने क्रमशः प्रथम द्वितीय एवं तृतीय स्थान प्राप्त किया । रहनुमा, मुस्कान, सोबिया, तलत और ज़ईमा खान ने भी शानदार प्रदर्शन करते हुए विद्यालय का गौरव बढ़ाया। समारोह की मुख्य अतिथि मदद फाउंडेशन की निदेशक श्रीमती समीना शाहिद ने छात्राओं के अभिभावकों का सम्मान करते हुए कहा कि जिन बच्चों ने विद्यालय का गौरव बढ़ाया है उनके माता पिता तारीफ के काबिल हैं जिन्होंने बच्चों के भविष्य के लिए  विद्यालय पर अपना विश्वास दिखाया और बच्चों की शिक्षा के लिए अपना समय और सहयोग प्रदान किया।यही बच्चे कल उनका सहारा बनेंगे। प्रधानाचार्य श्री अखलाक हसन खान ने कहा हम वादा करते हैं कि आगे भी विद्यालय शिक्षा के क्षेत्र में नए कीर्तिमान स्थापित करता रहेगा श्री इकबाल हसन खान ने सभी उत्तीर्ण छात्राओं और उनके अभिभावकों का आभार व्यक्त किया और छात्राओं को जीवन में कुछ बन के अपने माता पिता के सपने सच करने के लिए प्रेरित किया। इस अवसर पर पूर्व वरिष्ट लिपिक एजाज़ हसन खान ने कक्षा 10 एवं कक्षा 12 के प्रथम आने वाली छात्राओं को एक एक हज़ार रूपए का नकद पुरस्कार दिया।
समारोह में विद्यालय के  शिक्षकों ने सभी छात्राओं के उज्ज्वल भविष्य की कामना की और उन्हें आगे भी इसी तरह मेहनत करने के लिए प्रेरित किया। इस समारोह में  बच्चों और उनके अभिभावकों का उत्साह देखते ही बनता था।इस कार्यक्रम में कमाल शम्सी, मोनिस अयाज़, नसीब उद्दीन, सैयद शरिक अली सैयद तारिक अली मुमताज अहमद श्री वसीम उद्दीन खान, श्री नाजिर हुसैन, सैयद सीमा अली, मधु सक्सेना, रजनी सक्सेना, शबाना खान, अफसर हुसैन, मेहविश खान, मुताल हसन खान आदि लोग मौजूद रहे।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं असून, त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बातमी: परतूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून काम करताना सुरेशकुमार जेथलिया यांनी एक लोकप्रिय, विकासाभिमुख आणि सर्वसामान्यांशी जोडलेलं नेतृत्व उभं केलं होतं. गावोगावी फिरत, तळागाळातील नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करणारे नेता म्हणून त्यांची ओळख होती. साधेपणा, माणुसकी आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. कोणत्याही सामान्य नागरिकाला सहज भेटणारे, त्यांचे प्रश्न ऐकणारे आणि “आपला माणूस” म्हणून उभे राहणारे नेतृत्व म्हणून जेथलिया यांना विशेष मान मिळत होता. सुरुवातीला काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले जेथलिया यांनी नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळाली होती, त्यामुळे ते “विकासाला चालना देणारे नेतृत्व” म्हणून ओळखले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते, समर्थक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी “आपला नेता गेला” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने केवळ एक नेता नाही, तर लोकांच्या मनात घर केलेला, त्यांच्यासोबत चालणारा आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणारा माणूस हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
    1
    जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं असून, त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बातमी:
परतूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून काम करताना सुरेशकुमार जेथलिया यांनी एक लोकप्रिय, विकासाभिमुख आणि सर्वसामान्यांशी जोडलेलं नेतृत्व उभं केलं होतं. गावोगावी फिरत, तळागाळातील नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करणारे नेता म्हणून त्यांची ओळख होती.
साधेपणा, माणुसकी आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. कोणत्याही सामान्य नागरिकाला सहज भेटणारे, त्यांचे प्रश्न ऐकणारे आणि “आपला माणूस” म्हणून उभे राहणारे नेतृत्व म्हणून जेथलिया यांना विशेष मान मिळत होता.
सुरुवातीला काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले जेथलिया यांनी नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळाली होती, त्यामुळे ते “विकासाला चालना देणारे नेतृत्व” म्हणून ओळखले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते, समर्थक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी “आपला नेता गेला” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने केवळ एक नेता नाही, तर लोकांच्या मनात घर केलेला, त्यांच्यासोबत चालणारा आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणारा माणूस हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
    user_जालना आंदोलन
    जालना आंदोलन
    मुख्य संपादक - जालना आंदोलन जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जालना (प्रतिनिधी) – जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रॅगिंगचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या नावाने महाविद्यालयाच्या अधिकृत ई-मेलवरून निनावी तक्रार करण्यात आली असून, या तक्रारीत दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ १३ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सध्या समितीकडून संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, सखोल चौकशीनंतर प्रकरणाची सत्यता स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    जालना (प्रतिनिधी) – जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रॅगिंगचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या नावाने महाविद्यालयाच्या अधिकृत ई-मेलवरून निनावी तक्रार करण्यात आली असून, या तक्रारीत दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ १३ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सध्या समितीकडून संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, सखोल चौकशीनंतर प्रकरणाची सत्यता स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहिती मिळत आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जालना महानगरपालिका चे सोचतावर दुर लक्ष वाड क्रमांक 10 वर दीड महिना झाला आहे चेंबर काढून आजुन पण कोणी कचरा उचलला नाही आले वारंवार तक्रार करूनही या वर कोणी या कोणत्याही कर्मचारी यांनी लक्ष नाही दिले यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो सोचता वीभागाला व जेष्ठ अधिकारी यांना विनंती करतो एक नागरिक म्हणून प्रशासनाने या गोष्टी कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी मागणी करतोय मी एक नागरिक म्हणून 🙏🇮🇳 जय हिंन्द जय भारत जय महाराष्ट्र 🙏🙏....
    1
    जालना महानगरपालिका चे सोचतावर दुर लक्ष वाड क्रमांक 10 वर दीड महिना झाला आहे चेंबर काढून आजुन पण कोणी कचरा उचलला नाही आले वारंवार तक्रार करूनही या वर कोणी या कोणत्याही कर्मचारी यांनी लक्ष नाही दिले यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो सोचता वीभागाला व जेष्ठ अधिकारी यांना विनंती करतो एक नागरिक म्हणून प्रशासनाने या गोष्टी कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी मागणी करतोय मी एक नागरिक म्हणून 🙏🇮🇳 जय हिंन्द जय भारत जय महाराष्ट्र 🙏🙏....
    user_संभाजी कीसन राव नागे पाटील
    संभाजी कीसन राव नागे पाटील
    Engraver जालना, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • महाराणा प्रताप नगरचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कायापालट सुरू -आमदार अमित देशमुख, तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती. ₹१.६० कोटींच्या 16 विविध विकासकामांचा शुभारंभ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 01 एप्रिल 2026. लातूर शहरालगतच्या नव्या वस्त्या व गावांना शहरासारख्याच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत अंतर्गत येथे ₹१ कोटी ६० लाखांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार निधीतून एकत्रितपणे विविध मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असून, एकाच गावात अनेक कामे केल्यास त्यांचा दर्जा सुधारतो आणि नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळतो, असे देशमुख यांनी सांगितले. हद्दवाढीतील तांत्रिक अडचणींमुळे ‘झालर क्षेत्रा’तील नागरिकांना सुविधा मिळण्यात अडथळे येतात, ही समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, रस्ते, सिटीबस सेवा आणि इतर सोयी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या भागासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार १६ विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून काही कामे खासदार निधीतूनही राबवली जाणार आहेत. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
    1
    महाराणा प्रताप नगरचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कायापालट सुरू -आमदार अमित देशमुख, 
तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती.
₹१.६० कोटींच्या 16 विविध विकासकामांचा शुभारंभ.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर.
शुक्रवार दिनांक 01 एप्रिल 2026. 
लातूर शहरालगतच्या नव्या वस्त्या व गावांना शहरासारख्याच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत अंतर्गत येथे ₹१ कोटी ६० लाखांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार निधीतून एकत्रितपणे विविध मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असून, एकाच गावात अनेक कामे केल्यास त्यांचा दर्जा सुधारतो आणि नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळतो, असे देशमुख यांनी सांगितले. हद्दवाढीतील तांत्रिक अडचणींमुळे ‘झालर क्षेत्रा’तील नागरिकांना सुविधा मिळण्यात अडथळे येतात, ही समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, रस्ते, सिटीबस सेवा आणि इतर सोयी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या भागासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार १६ विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून काही कामे खासदार निधीतूनही राबवली जाणार आहेत.
कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    10 min ago
  • 💥 *बड़ी खबर*💥 *हिमाचल के ऊना में हवा में उछलकर 650 फीट गहरी खाई में गिरी कार, 2 की मौत* हिमांचल प्रदेश के ऊना जिले में तेज रफ्तार का कहर। टायर फटते ही ड्राइवर ने खोया नियंत्रण, कार हवा में उछली और करीब 200 मीटर (650 फीट) गहरी खाई में जा गिरी। हादसे में पंजाब के दो श्रद्धालुओं की मौके पर मौत। पूरी घटना CCTV में कैद, वीडियो देख रोंगटे खड़े हो रहे हैं।
    1
    💥 *बड़ी खबर*💥
*हिमाचल के ऊना में हवा में उछलकर 650 फीट गहरी खाई में गिरी कार, 2 की मौत* 
हिमांचल प्रदेश के ऊना जिले में तेज रफ्तार का कहर। टायर फटते ही ड्राइवर ने खोया नियंत्रण, कार हवा में उछली और करीब 200 मीटर (650 फीट) गहरी खाई में जा गिरी। हादसे में पंजाब के दो श्रद्धालुओं की मौके पर मौत। पूरी घटना CCTV में कैद, वीडियो देख रोंगटे खड़े हो रहे हैं।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • महाराष्ट्र दिनी लातूर पोलिसांचा रक्तदानाचा अभिनव उपक्रम. खाकी’तील माणुसकीचा स्पर्श! रक्तदात्यांना हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट; सहा केंद्रांवर उत्स्फूर्त सहभाग. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक 01 मे 2026. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘खाकी’तील माणुसकीचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाअंतर्गत शहरातील पत्रकार प्रकाश कंकाळ यांच्यासह विविध स्तरातील नागरिकांनी रक्तदान करून सहा विविध केंद्रांवर रक्तसंकलन करण्यात आले. सकाळपासूनच रक्तदात्यांची गर्दी दिसून आली. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही या शिबिरात उत्साहाने भाग घेतला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास पोलिसांकडून हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट देण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे रक्तदानासोबतच रस्ते सुरक्षा जनजागृतीचाही संदेश देण्यात आला. लातूर पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘सेवा आणि सुरक्षा’ या ब्रीदवाक्याला साजेसा उपक्रम ठरला आहे.
    3
    महाराष्ट्र दिनी लातूर पोलिसांचा रक्तदानाचा अभिनव उपक्रम.
खाकी’तील माणुसकीचा स्पर्श!
रक्तदात्यांना हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट; सहा केंद्रांवर उत्स्फूर्त सहभाग.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
शुक्रवार दिनांक 01 मे 2026. 
महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘खाकी’तील माणुसकीचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमाअंतर्गत शहरातील पत्रकार प्रकाश कंकाळ यांच्यासह विविध स्तरातील नागरिकांनी रक्तदान करून सहा विविध केंद्रांवर रक्तसंकलन करण्यात आले. सकाळपासूनच रक्तदात्यांची गर्दी दिसून आली. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही या शिबिरात उत्साहाने भाग घेतला.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास पोलिसांकडून हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट देण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे रक्तदानासोबतच रस्ते सुरक्षा जनजागृतीचाही संदेश देण्यात आला.
लातूर पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘सेवा आणि सुरक्षा’ या ब्रीदवाक्याला साजेसा उपक्रम ठरला आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    26 min ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.