Shuru
Apke Nagar Ki App…
हिंगोली क्षेत्रात शहरकडून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री सुमारे १०:४० वाजता साप दिसून आला आहे.
Rajkumar Kadam
हिंगोली क्षेत्रात शहरकडून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री सुमारे १०:४० वाजता साप दिसून आला आहे.
More news from Hingoli and nearby areas
- हिंगोली क्षेत्रात शहरकडून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री सुमारे १०:४० वाजता साप दिसून आला आहे.2
- दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील अमानुष मारहाण, लाठीचार्ज आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते थेट आमने-सामने आले. या दरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाल्याचे दिसून आले आणि त्यांच्या जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मात्र, घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.1
- पावसाच्या जोरदार हजेरीमुळे सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले आहे. पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्ग पूर्णपणे सुखावला आहे.1
- नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारत सरकारला निवेदन सादर करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. सय्यद मुजीब भाई यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देणाऱ्या सीजेपी (कॉक्रोज जनता पार्टी) च्या भूमिकेलाही मंडळाने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास संविधानाच्या चौकटीत राहून महाराष्ट्रभर राज्यव्यापी जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा मंडळाने दिला आहे. सादर करण्यात आलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांवरील कथित बळाच्या वापराची निष्पक्ष व न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सोनम वांगचूक यांना तात्काळ मुक्त करून त्यांच्या प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, आणि परीक्षा, भरती प्रक्रिया, पेपरफुटी व रोजगारासंदर्भातील प्रश्नांवर वेळबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. सदर निवेदनावर मुजीब भाई मित्र मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, ते जिल्हाधिकारी, नांदेड यांच्यामार्फत मा. राष्ट्रपती, भारत सरकार, मा. पंतप्रधान, मा. केंद्रीय गृहमंत्री, मा. केंद्रीय शिक्षणमंत्री, सीजेपी (कॉक्रोज जनता पार्टी) व प्रसारमाध्यमांकडे पाठविण्यात येणार आहे. लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या या लढ्याला मंडळाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.1
- परभणीमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने आक्रमक एल्गार पुकारत जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले आहे. या आंदोलनादरम्यान सुरेश भुमरे यांनीही अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.1
- मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील टोलनाका लोकलसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.1
- राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने जोरदार हल्लाबोल करत जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून, काँग्रेसविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेत जोरदार निदर्शने केली आहेत.1
- पेपर लीक आणि निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे सरकारला शोभत नाही, अशी टीका करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. निष्पाप विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आपण सातत्याने लढत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा देत राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पेपर लीक तातडीने बंद झाले पाहिजेत, सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशा मागण्या या आंदोलनाद्वारे लावून धरण्यात आल्या आहेत.1