मंठा तालुका कृषी कार्यालयाचा मनमानी कारभार उघड कार्यालयीन वेळेपूर्वीच कुलूप; शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला दोषींवर कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शासनाने निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेचे सरळ उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सायंकाळी ५:३० वाजताच बंद आढळून आले. कार्यालयास कुलूप लावलेले होते आणि कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व कृषी विभागाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित असताना, वेळेपूर्वी कार्यालय बंद ठेवणे हा स्पष्ट नियमभंग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे दूरवरून आलेल्या शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वेळ, पैसा व श्रम खर्च करून कार्यालयात आलेल्या नागरिकांची प्रत्यक्ष फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संभाजी ब्रिगेड, मंठा तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले असून, सदर प्रकार हा केवळ निष्काळजीपणा नसून कर्तव्यातील गंभीर कसूर (Dereliction of Duty) असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच हा प्रकार शासकीय कार्यालयीन वेळेचा जाणीवपूर्वक भंग शासकीय सेवकांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, १९७९ चा भंग महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगास पात्र असा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी हे कार्यालयाचे प्रमुख असल्याने कार्यालयीन वेळेचे पालन, कर्मचारी उपस्थिती व कामकाजाची जबाबदारी त्यांचीच असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंग कारवाई, तसेच भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी लेखी आदेश काढण्याची मागणी करण्यात आली आहे. जर ७ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार अहिंसक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, तसेच हे प्रकरण वरिष्ठ व सक्षम प्राधिकरणांकडे मांडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

- मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शासनाने निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेचे सरळ उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सायंकाळी ५:३० वाजताच बंद आढळून आले. कार्यालयास कुलूप लावलेले होते आणि कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व कृषी विभागाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित असताना, वेळेपूर्वी कार्यालय बंद ठेवणे हा स्पष्ट नियमभंग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे दूरवरून आलेल्या शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वेळ, पैसा व श्रम खर्च करून कार्यालयात आलेल्या नागरिकांची प्रत्यक्ष फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संभाजी ब्रिगेड, मंठा तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले असून, सदर प्रकार हा केवळ निष्काळजीपणा नसून कर्तव्यातील गंभीर कसूर (Dereliction of Duty) असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच हा प्रकार शासकीय कार्यालयीन वेळेचा जाणीवपूर्वक भंग शासकीय सेवकांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, १९७९ चा भंग महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगास पात्र असा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी हे कार्यालयाचे प्रमुख असल्याने कार्यालयीन वेळेचे पालन, कर्मचारी उपस्थिती व कामकाजाची जबाबदारी त्यांचीच असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंग कारवाई, तसेच भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी लेखी आदेश काढण्याची मागणी करण्यात आली आहे. जर ७ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार अहिंसक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, तसेच हे प्रकरण वरिष्ठ व सक्षम प्राधिकरणांकडे मांडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.1
- Post by Raghunath Aghao1
- जालना - चालत्या दुचाकीला अचानक आग - दुचाकी जळून खाक ! सुदैवाने जीवितहानी टळली.. प्रवास करत असताना दुचाकीने घेतला अचानक पेट.. घनसावंगी तालुक्यातील घटना..1
- सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती रा.प. पाथरी आगार1
- सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, वसमत रोड खानापूर फाटा येथील भव्य मिरवणुकीसाठी शिवप्रेमींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन1
- *जालना* हिजाब घालून काही परीक्षार्थी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर आल्याने गोंदळ... जालना शहरातील परीक्षा केंद्रावरील प्रकार.. समाज व धर्म पाहून विद्यार्थ्यांवर दबाव तंत्र वापरू नका.. एमआयएम पदाधिकाऱ्याचा बारावी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती..1
- बच्चा चोरीची घटना CCTV कैमऱ्यात कैद1
- छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती; संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती निमित्त रक्तदान शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले रक्तदान हे जीवनदान रक्तदान प्रतिज्ञा वाढवणे जरुरी असून गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे असे प्रतिपादन तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी केले. शिवसेना (शिंदे) गट व शिवमुद्रा प्रतिष्ठान मंठा तालुका वतीने येथील प्रल्हादराव बोराडे कॉम्प्लेक्स येथे दिनांक १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ वी जयंती निमित्ताने आणि संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना बोराडे म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते कारण ते एखाद्याला नवीन जीवन देऊ शकते एका वेळेच्या रक्तदानातून तीन जणांचे प्राण वाचू शकतात.१८ ते ६५ व्ययोगटातील निरोगी व्यक्तीने दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकते ज्यामुळे रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते हृदयविकाराचा धोका कमी होतो रक्तदान हे सुरक्षित असून यातून कोणतेही कायमस्वरूपी नुकसान होत नाही या उलट रक्तदानातून मानवता निर्माण होते असे बोराडे म्हणाले. यावेळी आदर्श ब्लड सेंटरच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले एकुण 96 रक्त दात्यांनी रक्तदान केले.यावेळी रामराव वरकड, योगेश पाटील अवचार,भगवान गायकवाड,दिपक गायकवाड, एडवोकेट राजेश खरात, डॉक्टर संतोष पवार, अक्षय दीप वाघमारे, भीमराव वाघ, दिलीपराव हिवाळे, दत्तात्रय बोराडे, अमोल विरकर, बाळासाहेब देशमुख, माऊली वायाळ, शैलेश मोरे, रतन कळणे, पप्पू बोराडे, गोपीनाथ डेंगळे, विलास बनसोडे, पांडुरंग बोराडे, नाना बोराडे, नाथा दिवटे, विनोद खरात, पिराजी पवळे, सतीश वायाळ, राम वरकुटे, रवी डहाळे, पवन मगर, अलीम कुरेशी, पवन वाघमारे, लिंबाजी बोराडे, भगवान बोराडे, दत्ता खरात, विष्णूपंत मोरे, भरत नरोटे, राम नरोटे उपस्थित होते..1