"त्या" मोर्चानंतर जोतिबा यात्रेवर तणावाचे सावट; प्रशासनासमोर मोठे आव्हान कोल्हापूर, ता. ३१ सिटी न्यूज नेटवर्क वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर परिसरात घडलेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ ३० मार्च रोजी परिते ग्रामस्थांनी काढलेल्या आक्रमक मोर्चानंतर आगामी जोतिबा यात्रेवर तणावाचे सावट निर्माण झाले आहे. यात्रेला अवघे काही दिवस उरले असताना झालेल्या या मोर्चामुळे वातावरण चिघळल्याचे दिसत आहे. “पुजारी हटाव, जोतिबा मंदिर बचाव” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेमुळे यात्रेदरम्यान वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी लाखो भाविक जोतिबा यात्रेसाठी येथे येतात. मात्र, यंदा मोर्चानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे. भाविकांची सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि मंदिर परिसरातील शिस्त राखणे ही मोठी जबाबदारी प्रशासनासमोर उभी राहिली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी ही कारवाई यात्रेपूर्वी होणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रामस्थांनी पुजाऱ्यांवर गंभीर आरोप करत शासकीय पुजारी नेमण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे यात्रेच्या काळात पुजारी आणि ग्रामस्थ यांच्यातील वाद पुन्हा उफाळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थिती लक्षात घेता, यात्रेदरम्यान कडक पोलीस बंदोबस्त, मध्यस्थी आणि नियंत्रण यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे. भाविकांमध्येही संभ्रमाचे वातावरण असून, यात्रा शांततेत पार पडावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. आता प्रशासन योग्य वेळी ठोस निर्णय घेते का, यावरच यंदाची जोतिबा यात्रा निर्विघ्न पार पडणार की तणावात, हे ठरणार आहे.
"त्या" मोर्चानंतर जोतिबा यात्रेवर तणावाचे सावट; प्रशासनासमोर मोठे आव्हान कोल्हापूर, ता. ३१ सिटी न्यूज नेटवर्क वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर परिसरात घडलेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ ३० मार्च रोजी परिते ग्रामस्थांनी काढलेल्या आक्रमक मोर्चानंतर आगामी जोतिबा यात्रेवर तणावाचे सावट निर्माण झाले आहे. यात्रेला अवघे काही दिवस उरले असताना झालेल्या या मोर्चामुळे वातावरण चिघळल्याचे दिसत आहे. “पुजारी हटाव, जोतिबा मंदिर बचाव” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, ग्रामस्थांच्या संतप्त भूमिकेमुळे यात्रेदरम्यान वाद
वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी लाखो भाविक जोतिबा यात्रेसाठी येथे येतात. मात्र, यंदा मोर्चानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे. भाविकांची सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि मंदिर परिसरातील शिस्त राखणे ही मोठी जबाबदारी प्रशासनासमोर उभी राहिली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी ही कारवाई यात्रेपूर्वी होणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रामस्थांनी पुजाऱ्यांवर गंभीर आरोप करत शासकीय पुजारी नेमण्याची
मागणी लावून धरली आहे. त्यामुळे यात्रेच्या काळात पुजारी आणि ग्रामस्थ यांच्यातील वाद पुन्हा उफाळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थिती लक्षात घेता, यात्रेदरम्यान कडक पोलीस बंदोबस्त, मध्यस्थी आणि नियंत्रण यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे. भाविकांमध्येही संभ्रमाचे वातावरण असून, यात्रा शांततेत पार पडावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. आता प्रशासन योग्य वेळी ठोस निर्णय घेते का, यावरच यंदाची जोतिबा यात्रा निर्विघ्न पार पडणार की तणावात, हे ठरणार आहे.
- शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित २१ व्या शिव महोत्सवात कागल येथील डी. आर. माने कॉलेजच्या ग्रुपने 'देवीचा जागर' हा कार्यक्रम सादर केला. या ऊर्जावान सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या व्हिडिओमध्ये पहा: कागलच्या कलाकारांचा हाय-एनर्जी परफॉर्मन्स. लोककलेचा वारसा जपणारा 'देवीचा जागर'. कोरिओग्राफर शुभम सोनुले यांचे विशेष दिग्दर्शन. योगिता खाडे मॅम आणि हसीना मालदार मॅम यांचे मार्गदर्शन. सहभागी कलाकार: विश्वजित वाघमारे, सूरज कुऱ्हाडे, स्वरंगी सारंगले, रसिका आवळे, आदिका भोसले, तनुजा जाधव, रूपाली भोसले, श्रुतिका पाटील आणि स्मिता कुऱ्हाडे.1
- हुपरी येथील अॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.1
- सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.1
- विक्रम शिंदे /दि.३१ भोर-महाड मार्गावर शिरगाव गावाच्या हद्दीत टेम्पो सुमारे २० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोमधील ९ जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील किवत गावचे १५ ते २० नागरिक एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी टेम्पोने महाडकडे जात होते. दरम्यान शिरगाव परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना दरीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी भोर पोलीस पुढील तपास करत आहेत.2
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- पिंपरी चिंचवड : - सामान्य नागरिकांना जप्तीच्या नोटिसा, मग सत्ताधाऱ्यांना अभय का ? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.... पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला थकबाकीवरून नोटीस बजावल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप कार्यालयाची तब्बल ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून, अभय योजनेचा लाभ देऊनही अद्याप कराचा भरणा झालेला नसल्याचे समोर आले आहे. शहर भाजप कार्यालयाचा एकूण ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांचा कर थकीत आहे, तर अभय योजनेअंतर्गत १ लाख ६४ हजार रुपयांची सवलत देखील देण्यात आली. मात्र सवलत वजा जाता ५ लाख ९२ हजार ९८५ रुपये अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.त्यांनी सन २०२२ पासून या मालमत्तेचा कर भरलेला नाही. सामान्य नागरिकांनी किरकोळ कर थकवला तरी महापालिका प्रशासन तातडीने घरांना सील ठोकणे किंवा दुकानांची जप्ती करणे अशी कठोर कारवाई करते. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाबाबत प्रशासन उदार असल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य करदात्यांसाठी एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा, अशा दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या मुख्य कार्यालयावरील या मोठ्या थकबाकीबाबत विचारले असता, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. त्यामुळे महापालिकेने ही प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच पार पाडली की काय, असा संशय बळावला आहे.... #पिंपरीचिंचवड #पीसीएमसी #भाजपकार्यालय #करथकबाकी #महापालिका #करवसुली #राजकारण #सत्ताधारीपक्ष #प्रशासनप्रश्नचिन्ह #दुटप्पीनिती #नागरिकआक्रोश #मालमत्ताकर #अभययोजना #स्थानिकबातम्या #PimpriChinchwad #PCMC #BJP #BJPOffice #PropertyTax #TaxDues #MunicipalCorporation #LocalPolitics #CivicIssues #TaxRecovery #Governance #DoubleStandards #PublicOutrage #MaharashtraNews1
- Post by Vruttshakti Digital News1
- विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे नागरिकांचे म्हणणे. वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .1