logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

काळी दौलत येथे वीजचोरीवर महावितरणची धडक मोहीम; २५ जणांवर कारवाई, ५ लाखांचा दंड महागाव तालुक्यातील काळी दौलत येथे वीजचोरी प्रकरणी महावितरण विभागाने धडक कारवाई करत अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. महावितरणच्या विशेष तपासणी मोहिमेत डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत आतापर्यंत २५ जणांवर दंडात्मक कारवाई केली असून जवळपास ५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गावात तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान काही ठिकाणी थेट लाईन टाकून वीज वापर, मीटरमध्ये छेडछाड तसेच अनधिकृत वीजजोडणी करून वीज वापर केल्याचे आढळून आले. वीजचोरीमुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याने संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वीजचोरीमुळे वीजपुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येतो तसेच नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरणकडून वेळोवेळी तपासणी मोहीम राबवली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी अनधिकृत वीजजोडणी टाळून नियमांनुसार वीज वापर करावा तसेच परिसरात कुठेही वीजचोरी आढळल्यास महावितरणला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा कनिष्ठ अभियंता विश्वजीत कदम यांनी दिला आहे.

16 hrs ago
user_Taha Mirza
Taha Mirza
Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
16 hrs ago
412cf268-37cd-4e16-92fa-375cacc1a569

काळी दौलत येथे वीजचोरीवर महावितरणची धडक मोहीम; २५ जणांवर कारवाई, ५ लाखांचा दंड महागाव तालुक्यातील काळी दौलत येथे वीजचोरी प्रकरणी महावितरण विभागाने धडक कारवाई करत अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. महावितरणच्या विशेष तपासणी मोहिमेत डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत आतापर्यंत २५ जणांवर दंडात्मक कारवाई केली असून जवळपास ५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गावात तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान काही ठिकाणी थेट लाईन टाकून वीज वापर, मीटरमध्ये छेडछाड तसेच अनधिकृत वीजजोडणी करून वीज वापर केल्याचे आढळून आले. वीजचोरीमुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याने संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वीजचोरीमुळे वीजपुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येतो तसेच नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरणकडून वेळोवेळी तपासणी मोहीम राबवली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी अनधिकृत वीजजोडणी टाळून नियमांनुसार वीज वापर करावा तसेच परिसरात कुठेही वीजचोरी आढळल्यास महावितरणला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा कनिष्ठ अभियंता विश्वजीत कदम यांनी दिला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महागाव तालुक्यातील व पुसद विधानसभा मतदारसंघातील वाकान कोणदरी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था अतिशय दैनीय झाली असून या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी कोणदरी येथील राहुल भिकाजी राठोड यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.‌ सन-२४-२५ मध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाकान व कोणदरी पोखरी ते माळहिवरा मार्गे जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दोन्हीपुलाची दुरावस्था झाली असून केंव्हा पुल कोसळून अपघात होईल याचा काही नेम सांगता येणार नाही. त्यामुळे पावसाळा लागन्या पुर्वी या दोन्ही पुलाचे बांधकाम न झाल्यास ते वाहुन जान्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दोन्ही पुलाच्या बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील दिली होती. मात्र अद्यापही या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्याने दोन्ही ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर आहे.
    2
    महागाव तालुक्यातील व पुसद विधानसभा मतदारसंघातील वाकान कोणदरी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाची अवस्था अतिशय दैनीय झाली असून या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी कोणदरी येथील राहुल भिकाजी राठोड यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.‌ सन-२४-२५ मध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाकान व कोणदरी पोखरी ते माळहिवरा मार्गे जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दोन्हीपुलाची दुरावस्था झाली असून केंव्हा पुल कोसळून अपघात होईल याचा काही नेम सांगता येणार नाही. त्यामुळे पावसाळा लागन्या पुर्वी या दोन्ही पुलाचे बांधकाम न झाल्यास ते वाहुन जान्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दोन्ही पुलाच्या बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील दिली होती. मात्र अद्यापही या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्याने दोन्ही ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर आहे.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल... चूक नेमकी कोणाची?? भंडारा : शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. नंतर भांडणाचे रूपांतरभंडारा येथील 11वर्ष हाणामारीत झाले. रागाच्या भरात एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने फलकावर काहीतरी अभद्र वाक्य लिहिली. शिक्षकांनी ती वाचताच पालकांना बोलवण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर मात्र विद्यार्थ्याला धडकी भरली. यावर मार्ग विचारण्यासाठी विद्यार्थ्याने 'एआय'ला काय करायचे असे विचारले असता 'एआय'ने त्याला चुकीची कबुली देण्यास सांगितले. मात्र आपण चूक कबूल केली तर बाबा मारतील जब भीतीने या अल्पवयीन विद्यार्थ्याने दुसरा मार्ग शोधला. त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. विद्यार्थ्याने भीतीपोटी अपहरणाचा असा बनाव रचल्याचे उघड होताच पालकही चकित झाले. मात्र या प्रकारामुळे मोबाईलचा अतिवापर आणि विद्यार्थ्यांचा एकलकोंडेपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. पालकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीचे परिणाम आता मुलांच्या मानसिकतेवर होऊ लागले आहेत. नोकरीसाठी दिवसभर घराबाहेर राहणारे, पैसा कमावण्याच्या स्पर्धेत धावणारे आई-वडील आणि घरात एकाकी पडलेली मुले. घरात या मुलांशी संवाद साधण्यासाठी कोणीही नसल्याने ती एकलकोंडी होतात. त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे कुतूहल असते, मात्र त्यांच्या प्रश्नांना योग्य दिशा देणार कोणीही नसतं. हळूहळू मोबाईल सारखे यंत्र त्यांचे सवंगडी होतात. मुले मोबाईलच्या आहारी गेल्याची ओरड केली जाते मात्र त्याला जबाबदार कोण ? याचा विचार होताना दिसत नाही. मोबाईल आणि चित्रपटांच्या आहारी जाऊन सिनेमातल्या कथानकाप्रमाणे कथा रचू लागतात. सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील अकरा वर्षीय विद्यार्थ्याने केवळ शिक्षक आणि पालकांच्या भीतीने स्वतःच्या अपहरणाचा ड्रामा रचला. हा प्रकार उघडकीस येताच चर्चेला उधाण आले आहे. "११ वर्षाचा एक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी स्कूल बसची वाट पाहत उभा होता. तोच एका व्यक्तीने तिथे येऊन त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि चाकूच्या धाकावर त्या विद्यार्थ्याचे अपहरण केले. ट्रॅव्हल्समधून उतरलेल्या एका व्यक्तीने या विद्यार्थ्याच्या नाकावर रुमाल ठेवताच तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला नागपूरच्या दिशेने नेत असताना उमरेडच्या पुढे त्याच्या परिचित असलेल्या एका मंदिराजवळ गाडी थांबताच त्याला अचानक शुद्ध आली, त्याने आरडाओरडा करताच अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांने घरी आईला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. थोड्याच वेळात जवळच राहत असलेले त्याचे मामा तेथे पोहोचले आणि ते त्याला सुखरूप घरी घेऊन आले. " ही सारी आपबीती एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याने रडत रडत त्याच्या पालकांसमोर बोलून दाखवली. त्याचे बोलणे ऐकून आईचेही डोळे पाणावले आणि लेक सुखरूप घरी परतल्याचे समाधानही तिच्या डोळ्यात तरळू लागले. पालकांनी त्याला याबाबत आणखीन विचारणा करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले मात्र त्यात असे काहीही घडल्याचे निष्पन्न झाले नाही त्यामुळे पालकांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. विद्यार्थ्याला याबाबत आणखी प्रश्न विचारून त्याच्याकडून सत्य वदविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्याचा खोटेपणा फार काळ टिकू शकला नाही. व त्याने ढसाढसा रडत रडत आपण अपहरणाचा बनाव रचला असल्याचे पालकांसमोर कबूल केले. शाळेतील शिक्षकांच्या आणि पालकांकडून आपल्याला शिक्षा होईल किंवा मार बसेल या भीतीने आपण हा सर्व प्रकार केल्याचे त्याने सांगितले. घडलेला सर्व प्रकार थक्क करून देणारा असला तरी यात नेमकी चूक कोणाची हा प्रश्न उपस्थित होतो. अकरा वर्षाच्या एखाद्या मुलाने युट्युबवर बघून असा बनाव करणे, तेही अत्यंत शुल्लक कारणासाठी. त्या चिमुकल्याच्या मनात असलेली भीती आणि एकटेपणा तर या सर्वांना जबाबदार नाही ? पालकांनी मुलांना वेळ देणे, त्यांना समजून घेणे आणि त्यांच्या एकटेपणाला दूर करणे ही जाता काळाची गरज असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. अन्यथा मोबाईलच्या आहारी गेलेले हे चिमुकले पब्जी आणि कोरियन गेम सारख्या ऑनलाइन गेमिंगचे बळी पडतील. मुलांनी केलेल्या कृतीसाठी त्यांना दोष देत बसण्यापेक्षा पालकांनी वेळेचं सावध होणे आता गरजेचे आहे.
    1
    ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल... 
चूक नेमकी कोणाची?? 
भंडारा : शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. नंतर भांडणाचे रूपांतरभंडारा येथील 11वर्ष हाणामारीत झाले. रागाच्या भरात एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने फलकावर काहीतरी अभद्र वाक्य लिहिली. शिक्षकांनी ती वाचताच पालकांना बोलवण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर मात्र विद्यार्थ्याला धडकी भरली. यावर मार्ग विचारण्यासाठी विद्यार्थ्याने 'एआय'ला काय करायचे असे विचारले असता 'एआय'ने त्याला चुकीची कबुली देण्यास सांगितले. मात्र  आपण चूक कबूल केली तर बाबा मारतील जब भीतीने या अल्पवयीन विद्यार्थ्याने दुसरा मार्ग शोधला. त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. विद्यार्थ्याने भीतीपोटी अपहरणाचा असा बनाव रचल्याचे उघड होताच पालकही चकित झाले. मात्र या प्रकारामुळे मोबाईलचा अतिवापर आणि विद्यार्थ्यांचा एकलकोंडेपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. पालकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.
आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीचे परिणाम आता मुलांच्या मानसिकतेवर होऊ लागले आहेत. नोकरीसाठी दिवसभर घराबाहेर राहणारे, पैसा कमावण्याच्या स्पर्धेत धावणारे आई-वडील आणि घरात एकाकी पडलेली मुले. घरात या मुलांशी संवाद साधण्यासाठी कोणीही नसल्याने ती एकलकोंडी होतात. त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे कुतूहल असते, मात्र त्यांच्या  प्रश्नांना योग्य दिशा देणार कोणीही नसतं. हळूहळू मोबाईल सारखे यंत्र त्यांचे सवंगडी होतात. मुले मोबाईलच्या आहारी गेल्याची ओरड केली जाते मात्र त्याला जबाबदार कोण ? याचा विचार होताना दिसत नाही. मोबाईल आणि चित्रपटांच्या आहारी जाऊन सिनेमातल्या कथानकाप्रमाणे कथा रचू लागतात. सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील अकरा वर्षीय विद्यार्थ्याने केवळ शिक्षक आणि पालकांच्या भीतीने स्वतःच्या अपहरणाचा  ड्रामा रचला. हा प्रकार उघडकीस येताच चर्चेला उधाण आले आहे. 
"११ वर्षाचा एक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी स्कूल बसची वाट पाहत उभा होता. तोच एका व्यक्तीने तिथे येऊन त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि चाकूच्या धाकावर त्या विद्यार्थ्याचे अपहरण केले. ट्रॅव्हल्समधून उतरलेल्या एका व्यक्तीने या विद्यार्थ्याच्या नाकावर रुमाल ठेवताच तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला नागपूरच्या दिशेने नेत असताना उमरेडच्या पुढे त्याच्या परिचित असलेल्या एका मंदिराजवळ गाडी थांबताच त्याला अचानक शुद्ध आली, त्याने आरडाओरडा करताच अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांने घरी आईला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. थोड्याच वेळात जवळच राहत असलेले त्याचे मामा तेथे पोहोचले आणि ते त्याला सुखरूप घरी घेऊन आले. "
ही सारी आपबीती एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याने रडत रडत त्याच्या पालकांसमोर बोलून दाखवली.  त्याचे बोलणे ऐकून आईचेही डोळे पाणावले आणि लेक सुखरूप घरी परतल्याचे समाधानही तिच्या डोळ्यात तरळू लागले. 
पालकांनी त्याला याबाबत आणखीन विचारणा करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले मात्र त्यात असे काहीही घडल्याचे निष्पन्न झाले नाही त्यामुळे पालकांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. विद्यार्थ्याला याबाबत आणखी प्रश्न विचारून त्याच्याकडून सत्य वदविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्याचा खोटेपणा फार काळ टिकू शकला नाही. व त्याने ढसाढसा रडत रडत आपण अपहरणाचा बनाव रचला असल्याचे पालकांसमोर कबूल केले. 
शाळेतील शिक्षकांच्या आणि पालकांकडून आपल्याला शिक्षा होईल किंवा मार बसेल या भीतीने आपण हा सर्व प्रकार केल्याचे त्याने सांगितले.
घडलेला सर्व प्रकार थक्क करून देणारा असला तरी यात नेमकी चूक कोणाची हा प्रश्न उपस्थित होतो. अकरा वर्षाच्या एखाद्या मुलाने युट्युबवर बघून असा बनाव करणे, तेही अत्यंत शुल्लक कारणासाठी. त्या चिमुकल्याच्या मनात असलेली भीती आणि एकटेपणा तर या सर्वांना जबाबदार नाही ? पालकांनी मुलांना वेळ देणे, त्यांना समजून घेणे आणि त्यांच्या एकटेपणाला दूर करणे ही जाता काळाची गरज असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. अन्यथा मोबाईलच्या आहारी गेलेले हे चिमुकले पब्जी आणि कोरियन गेम सारख्या ऑनलाइन गेमिंगचे बळी पडतील. मुलांनी केलेल्या कृतीसाठी त्यांना दोष देत बसण्यापेक्षा पालकांनी वेळेचं सावध होणे आता गरजेचे आहे.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    पत्रकार साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    19 min ago
  • नागपूर -नागपूरमधील महिलांना ड्रोन बनवण्याचे प्रशिक्षण महिला सक्षमीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमातून 30 महिलांना ड्रोन असेंब्लीचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणात मोटर, सेन्सर आणि फ्लाइट कंट्रोलर यावर प्रत्यक्ष काम शिकवण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्यांना टेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते
    1
    नागपूर -नागपूरमधील महिलांना ड्रोन बनवण्याचे प्रशिक्षण
महिला सक्षमीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमातून 30 महिलांना ड्रोन असेंब्लीचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणात मोटर, सेन्सर आणि फ्लाइट कंट्रोलर यावर प्रत्यक्ष काम शिकवण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्यांना टेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi
    1
    औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?"
#Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • चंद्रपूर - लोहारडोंगरी खाण प्रकल्पविरोधात अन्नत्याग आंदोलन करीत असलेल्या पर्यावरण प्रेमी बंडू धोतरे यांच्या प्रशासनाने दडपशाहीचा वापर करीत रात्री त्यांना जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न केला, या व्हिडीओ मध्ये धोतरे हे पोलिसांना सांगत आहे मी येतो आपण जबरदस्ती करू नका मात्र पोलीस प्रशासन त्यांना धक्कामुक्की करीत नेण्याचा प्रयत्न करीत आहे. शांततेच्या मार्गावर सुरू असलेल्या आंदोलनावर महाराष्ट्र शासन किती गंभीर आहे हे आपण बघू शकता.
    1
    चंद्रपूर - लोहारडोंगरी खाण प्रकल्पविरोधात अन्नत्याग आंदोलन करीत असलेल्या पर्यावरण प्रेमी बंडू धोतरे यांच्या प्रशासनाने दडपशाहीचा वापर करीत रात्री त्यांना जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न केला, या व्हिडीओ मध्ये धोतरे हे पोलिसांना सांगत आहे मी येतो आपण जबरदस्ती करू नका मात्र पोलीस प्रशासन त्यांना धक्कामुक्की करीत नेण्याचा प्रयत्न करीत आहे. शांततेच्या मार्गावर सुरू असलेल्या आंदोलनावर महाराष्ट्र शासन किती गंभीर आहे हे आपण बघू शकता.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    4
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.
    1
    मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • कुही- मांढळ येथे नारीशक्ती चा जागर, जागतिक महिला दिन उत्साहात, सामाजिक कार्यकर्त्या व कर्तबगार महीलांचा सत्कार करण्यात आला
    1
    कुही- मांढळ येथे नारीशक्ती चा जागर, जागतिक महिला दिन उत्साहात, सामाजिक कार्यकर्त्या व कर्तबगार महीलांचा सत्कार करण्यात आला
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    1 day ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.