logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेतकऱ्यांसाठी संशोधन अधिक गतिमान करा – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे "फुले कृषी महोत्सव-२०२६" शेतपीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ अहिल्यानगर, दि. १८ - राज्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे आणि शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे या त्रिसूत्रीवर शासनाचा भर आहे. कृषी विद्यापीठांनी संशोधन अधिक गतिमान करून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सुधारित वाण, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आणि पीक संरक्षण उपाय अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी विद्यापीठ, कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) व आत्मा (अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमेद अभियान, जिल्हा परिषद अहिल्यानगर, महाबीज, नाबार्ड, पाणी फाऊंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात 'फुले कृषी तंत्रज्ञान घरोघरी, समृद्धी येईल गावोगावी' या उपक्रमांतर्गत 'फुले कृषी महोत्सव-२०२६', थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषीमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष तुषार पवार, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषी परिषदेच्या महासंचालक श्रीमती वर्षा लढ्ढा-उंटवाल, पुणे येथील विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब जठार व बाळासाहेब आढाव उपस्थित होते. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, "शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. पेरणीपासून ते विपणनापर्यंत शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर मदत कशी करता येईल, यावर शासनाचा भर आहे. साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या मोटारीचे देयक शासनाने माफ केले आहे. यासाठी शासनाने ३१ हजार कोटी रुपये निधी दिला आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना, नवनवीन तंत्रज्ञान हे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला असून याचा अधिकाधिक उपयोग करून शेतीमध्ये अधिक उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत." केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत असून त्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले, "विद्यापीठाची पुढील वाटचाल शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून करणार आहोत. शेतीवर परिणाम करणाऱ्या हवामान बदलावर मात करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विद्यापीठाचा भर राहणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विद्यापीठाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचे दालन सुरू करण्यात येणार असून, फुले कृषी महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांवर आयोजित पीक प्रात्यक्षिकांना शेतकऱ्यांनी भेटी द्याव्यात." कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषीदर्शनी व दिनदर्शिका २०२६ या प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. तसेच 'फुले कृषी वाहिनी ९०.८ एफ.एम.' युट्युब चॅनल, 'फुले अमृतकाळ' व 'फुले डेअरी ॲप'चे लोकार्पण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाचे औचित्य साधून सौ. सविता नालकर व सौ. स्वाती शिंगाडे या प्रगतशील महिला शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन कृषीमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच, अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन योजनेला उत्कृष्ट संशोधन प्रकल्पाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील व योजनेच्या प्रमुख डॉ. सुमती दिघे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचा आराखडा तयार करणारे आर्किटेक्ट रोहन मांडे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, विद्यापीठ परिसरामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषीमंत्र्यांनी विद्यापीठाचे विविध तंत्रज्ञान व उत्पादने दर्शविणारे स्टॉल्स, महाबीज आणि कृषी विभागाच्या स्टॉल्सला तसेच भाजीपाला प्रकल्पाच्या थेट पीक प्रात्यक्षिकांना भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमास विविध भागांतील प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी, कृषी अधिकारी, विद्यार्थी व कृषी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #PhuleKrishiMahotsav #MPKV #Rahuri #AgricultureExhibition #DattatrayBharne #DigitalAgriculture #FarmerSuccess #Ahilyanagar #KrishiVigyan #अहिल्यानगर #राहुरी #कृषीमहोत्सव #शेतकरी #महात्माफुलेकृषीविद्यापीठ #आधुनिकशेती

1 hr ago
user_राविराज शिंदे
राविराज शिंदे
Farmer Nagar, Ahmednagar•
1 hr ago
9fe3c049-8227-4aab-bafd-a1ba5c24e413

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले. या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर, आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.
    1
    झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता
अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. 
हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष
नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले.
या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर,
आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.
    user_Deepak Vijay Kaswa
    Deepak Vijay Kaswa
    अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by AMINIYA COURIER
    1
    Post by AMINIYA COURIER
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पुणे अहिल्यानगर‌ महामार्ग वाघोली मध्ये सतत वाहतूक कोंडी होत असते, आज देखील वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाले, वाहतूक कोंडीतून मार्ग काढत नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडी थांबावे लागते.
    1
    पुणे अहिल्यानगर‌ महामार्ग वाघोली मध्ये सतत वाहतूक कोंडी होत असते, आज देखील वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाले, वाहतूक कोंडीतून मार्ग काढत नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडी थांबावे लागते.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    20 hrs ago
  • Post by शहादेव काशिनाथ वैद्य
    3
    Post by शहादेव काशिनाथ वैद्य
    user_शहादेव काशिनाथ वैद्य
    शहादेव काशिनाथ वैद्य
    शेवगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शेवगाव (लक्ष्मण मडके) सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
    4
    शेवगाव (लक्ष्मण मडके)
सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
    user_Press Reporter Laxman Madake ज
    Press Reporter Laxman Madake ज
    Lawyer शेवगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. #AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo
    1
    BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. 
#AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या माळेगाव कारखान्याच्या पदाकरिता आज सुनेत्रा अजित पवार यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
    1
    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या माळेगाव कारखान्याच्या  पदाकरिता आज सुनेत्रा अजित पवार यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • डंपरचे चाक महिलेच्या पायावरून... बोल्हेगावात थरारक अपघात... अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी थरारक अपघात झाला. वीटाने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा पाय गंभीर जखमी झाला आहे. वारंवार अपघात होणाऱ्या या ठिकाणी गतीरोधक नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी पावणे दहा ते दहाच्या सुमारास वीटाने भरलेल्या डंपरच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. डंपरचे चाक थेट महिलेच्या पायावरून गेल्याने तिचा पाय निकामी झाला आहे.या परिसरात रस्ता वारंवार खचत असल्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, गतीरोधक नसल्याने येथे सातत्याने अपघात घडत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.अपघात होताच नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. याच वेळी सनफार्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र धस यांनी परिस्थिती हाताळत जखमी महिलेला रिक्षातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या परिसरात तातडीने गतीरोधक बसवावेत; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे."या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. प्रशासनाने गतीरोधक बसवले नाहीत, तर आम्ही आंदोलन करू." असा इशारा नागरिकांनी दिला आहे.बोल्हेगाव फाटा परिसरात वारंवार होणारे अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.
    1
    डंपरचे चाक महिलेच्या पायावरून...
बोल्हेगावात थरारक अपघात...
अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी थरारक अपघात झाला. वीटाने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा पाय गंभीर जखमी झाला आहे. वारंवार अपघात होणाऱ्या या ठिकाणी गतीरोधक नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी पावणे दहा ते दहाच्या सुमारास वीटाने भरलेल्या डंपरच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. डंपरचे चाक थेट महिलेच्या पायावरून गेल्याने तिचा पाय निकामी झाला आहे.या परिसरात रस्ता वारंवार खचत असल्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, गतीरोधक नसल्याने येथे सातत्याने अपघात घडत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.अपघात होताच नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. याच वेळी सनफार्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र धस यांनी परिस्थिती हाताळत जखमी महिलेला रिक्षातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या परिसरात तातडीने गतीरोधक बसवावेत; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे."या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. प्रशासनाने गतीरोधक बसवले नाहीत, तर आम्ही आंदोलन करू." असा इशारा नागरिकांनी दिला आहे.बोल्हेगाव फाटा परिसरात वारंवार होणारे अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.
    user_Deepak Vijay Kaswa
    Deepak Vijay Kaswa
    अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.