किरमिरी हायवेवर पिकअप चालकाने युवकाला उडवले, अपघातानंतर पळ काढला गोंडपिपरी - घरचे बैल विकण्याकरिता किरमिरी ते दरुर मधील बैलबाजारात जात असताना एका पिकअप वाहनाने पायदळ जाणाऱ्या ३० वर्षीय युवकाला जबर धडक दिली, या धडकेत त्या युवकाचा मृत्यू झाला, अपघात झाल्यावर पिकअप चालक वाहन घेऊन पळून गेला. हि घटना किरमिरी भंगाराम तळोधी हायवे रोडवर १० मे रोजी सायंकाळी ४ वाजेदरम्यान घडली. किरमिरी तालुका गोंडपिपरी मध्ये राहणारे ४८ वर्षीय बाळू गोविंदा आत्राम व त्यांचा पुतण्या ३० वर्षीय गोपाल बंडू आत्राम राहणार किरमिरी हे दोघे १० मे रोजी घरचे २ बैल विकण्यासाठी बैल बाजारात पायदळ निघाले होते. ४ वाजेदरम्यान भंगाराम तळोधी हायवेजवळ बैल पुढे नेत असताना चारचाकी पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनाने भरधाव वेगात मागून गोपाल आत्राम ला जोरदार धडक दिली.या धडकेत गोपाल रस्त्याच्या कडेला पडला, अपघात झाल्यावर पिकअप चालकाने वाहनासह घटनास्थळावरुन पळ काढला, १०८ वर कॉल करीत रुग्णवाहिकेची मदत मागितली, रुग्णवाहिका येताच गोपाल ला गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी बाळू आत्राम यांनी अज्ञात पिकअप वाहन चालक विरोधात गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात वाहन चालक विरोधात मोटारवाहन अधिनियम १९८८ अन्वये कलम १३४, बीएनएस कलम १०६ (१) व २८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे.

- वेंडली येथून जातिनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जनजागृती अभियानाला सुरवात चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आज दिनांक 11 मे ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या वेंडली ता. जिल्हा चंद्रपूर येथून ओबीसींची जनगणना करावी यासाठी जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली, केंद्र सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसोबतच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात यासंदर्भात २२ जानेवारीला राजपत्र जारी केले, १ मे पासून स्व घर गणना सुरुवात झाली आहे. आणि प्रगणक द्वारे मकान सूचीकरण 12 मे पासून सुरवात होत आहे, जनगणनेसंबंधी ३३ प्रश्नावली सूची जाहीर करण्यात आली आहे. बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा स्पष्ट उल्लेख करतानाच इतरांसाठी अन्य शब्दाचा वापर करण्यात आला. मात्र ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आल्याने जातनिहाय जनगणनेवरून प्रश्न निर्माण झाला आहे. देशाच्या विकासात कुणाचे किती योगदान आहे हे जाणून घेण्यासाठी कुणाची संख्या किती आहे ते समोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. ऑक्टोबर २०२६पासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तर उर्वरित भागात फेब्रुवारी -मार्च २०२७पासून प्रत्यक्ष जनगणना सुरू करण्यात येणार असल्याचे १६ जून २०२५ला स्पष्ट करण्यात आले होते. नंतर रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांनी जनगणनेसंबंधी अधिसूचना २२ जानेवारीला जनगणना करण्यासाठी ३३ प्रश्नांची सूची तयार करून राजपत्रात समाविष्ट करण्यात आल्या. या सूचींमध्ये घर क्रमांक, जनगणना घर क्रमांक, सामग्री, घराची स्थिती, कुटुंब क्रमांक, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, त्याचे लिंग, विवाहित दाम्पत्यांची संख्या, घरातील खोल्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत, पेयजलाची उपलब्धता, वीज, शौचालय, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, लॅपटॉप किंवा कम्प्युटर, मोबाइल, कार, मुख्य धान्य अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि जमातीचा उल्लेख करण्यात आला. इतरांसाठी अन्य शब्दाचा प्रयोग करताना ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आला आहे. राजपत्रातील बाराव्या सूचीत अनुसूचित जाती आणि जमातीच्या कुटुंबातील प्रमुखाचा उल्लेख करताना ओबीसीसाठी अन्य शब्द वापरण्यात आला आहे. ओबीसी समाजाचा स्पष्ट उल्लेख कुठेही करण्यात आला नाही म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गावागावात जनजागृती अभियान सुरू केले आहे, या अभियानाची सुरुवात करताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे,संतोष झाडे,गोवर्धन पिंपळशेंडे, शंकर नागपुरे, रविंद्र पिंपळशेंडे ,ज्ञानेश्वर पिंपळशेंडे, दिपक पिंपळशेंडे, प्रकाश चालूरकर निलेश चालूरकर, अविनाश टोंगे, उमेश श्रीरसागर आशिष देवालकर हर्षल टोंगे, चंद्रशेखर देवालकर , शुभम दुरुतकर हिमेश देवालकर हिमांशु टोंगे ,उदय टोंगे, जीवन तुराणकर ,वर्षा मोहितकर सुरेखा पिंपळशेंडे, करिष्मा टोंगे , गिरिजाबाई देवालकर, लक्ष्मीबाई पिंपळशेंडे, सरस्वती पिंपळशेंडे शकुंतलाबाई पिंपळशेंडे, लताबाई टोंगे ,श्वेता टोंगे व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. केंद्र सरकारने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी जनगणना आयुक्तांनी भारत सरकारचे राजपत्र नाही काढल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशन दरम्यान रामलीला मैदान नवी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन करणार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी म्हटले आहे.1
- दुर्गापुर पोलिसांनी हातभट्टी केली उध्वस्त, 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त चंद्रपुरातील दुर्गापूर पोलिसांना मौजा वरवट शेत शिवारातील जंगली नाल्यालागत हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड मारत 1 लाख 15 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत हातभट्टी उध्वस्त केली.1
- मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए। मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।1
- औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur1
- वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे एका महिलेने मोबाईल टॉवरवर चढून परिसरात खळबळ निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली.1
- हजारो लोक वैज्ञानिक जीवनशैलीच्या माध्यमातून टाइप 2 मधुमेह औषधांशिवाय नियंत्रित करत आहेत. यामुळे रक्तातील साखर कमी होते, औषधे टाळता येतात आणि अधिक ऊर्जा मिळते. तुम्हीही या प्रवासात सामील होऊन आरोग्यावर नियंत्रण मिळवू शकता.1
- नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.1
- महाराष्ट्रातील वरोरा तालुक्यातील बेलगावमध्ये पाण्याची तीव्र समस्या असल्याने एका महिलेने थेट तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन पुकारले. लेखी आश्वासन मिळेपर्यंत खाली उतरणार नाही, अशी मागणी करत तिने प्रशासनाची तारांबळ उडवून दिली आहे.1