करवीर तालुक्यातील वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ झाला उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि संघटन कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात येत आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमच्या वतीने वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रोटरीच्या डिस्ट्रीक्ट ३१७० च्या असिस्टंट गर्व्हनर सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्यांनी पदग्रहण केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमच्या वतीने वडणगे मधील देवी पार्वती हायस्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लब सुरू करण्यात आला आहे. या क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पदग्रहण अधिकारी म्हणून डिस्ट्रिक्ट ३१७० च्या असिस्टंट गव्हर्नर सौ. अरूंधती महाडिक उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते नवनियुक्त इंटरॅक्ट क्लब पदाधिकार्यांनी पदाची जबाबदारी स्वीकारली. इंटरॅक्ट प्रेसिडेंट म्हणून स्वरा विनोद पाटील, इंटरॅक्ट सेक्रेटरी म्हणून श्रेया संभाजी कापसे आणि इंटरॅक्ट ट्रेझरर म्हणून विदिशा संदीप बारले यांनी पदभार स्वीकारला. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आणि सक्षम नेतृत्व घडवणारे आधारस्तंभ आहेत. इंटरॅक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेवाभावी विचारांचा अनुभव मिळेल, असे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे अध्यक्ष रोटेरियन प्रदीप भारमल, सचिव रोटेरियन अतुल भालेकर आणि खजिनदार रोटेरियन सचिन नंदगांवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रदीप भारमल यांनी विद्यार्थ्यांना इंटरॅक्ट क्लबची कार्यपद्धती आणि उद्देश याबाबत सविस्तर माहिती दिली. इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची, संघभावनेने काम करण्याची तसेच शाळा आणि समाजाच्या गरजा ओळखून विविध सेवाभावी उपक्रम राबवण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करावी आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, असे त्यांनी सांगितले. इंटरॅक्टच्या माध्यमातून समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या विविध क्षेत्रांत उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी रोटरी क्लबकडून त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाणार आहे. कार्यक्रमाला देवी पार्वती हायस्कूलचे अध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, सचिव विलासराव पवार आणि मुख्याध्यापक राजेश देपणे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे सदस्य सचिन परांजपे, विश्वजीत जाधव, संभाजी जाधव, राहुल राबाडे, प्रसन्न सरदेसाई आणि सिद्धार्थ डुणूंग उपस्थित होते.

- जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे1
- शॉर्टसर्किटचा भडका! बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत आग; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद!1
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे विक्रम शिंदे /भोर दि. 26 राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.1
- मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧 भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧 भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा, वसतिगृह, प्रशिक्षण केंद्रे आणि शहरातील संवेदनशील भागांत गस्त सुरू झाली आहे. हीच अपेक्षा होती — मुलींना सुरक्षित वातावरण, निर्भय शिक्षण आणि सक्षम भविष्य! पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, दामिनी पथक आणि भोकरदन पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार! 🙏 मुली शाळेत जातील… शिकतील… सक्षम होतील! ✊ #प्रा_सौ_अनिता_अंकुश_जाधव1
- सुप्रसिद्ध श्रेया घोषाल पिंपरी चिंचवड मध्ये 29 ऑगस्टला1
- सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र! सरकारकडून माहिती प्रसारित सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र!1
- अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे1
- हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत विषारी दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २२ नागरिकांचे बळी गेले होते, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. गुन्ह्यांची नोंद व पार्श्वभूमी: सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत: हडपसर पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ३७९/२०२६ दापोडी पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ११४/२६, कलम १०५, १२३, १२५ भारतीय न्याय संहिता कारवाई आणि आरोपीला अटक: गुन्ह्यातील पाहिजे असलेला सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) हा शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात येणार असल्याची आणि तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेषांतर करून व रूप बदलून फिरत असल्याबाबतची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून शोध घेतला असता, आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे हा पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावी वेषांतर करून, रूप बदलून आणि आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलून त्या ठिकाणावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याची ओळख पटवून उरूळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. सद्यस्थितीत सदर कारवाई उरूळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी. पुणे यांनी संयुक्तपणे केली असून, आरोपीला पुढील तपासकामी सी.आय.डी. पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी: सदरची संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली: श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) शफकत अमना (पोलीस अधीक्षक, सी.आय.डी. पुणे घटक) श्री. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक) श्री. बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग, पुणे ग्रामीण) तपास पथकातील अधिकारी व अंमलदार: गुन्ह्याची गोपनियता पाळून आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या उरूळी कांचन पोलीस स्टेशनच्या विशेष पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता: विजयमाला पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) पांडुरंग पवार (सहायक पोलीस निरीक्षक) अजिनाथ शिंदे (पोलीस उपनिरीक्षक) रमेश भोसले (सहायक फौजदार) सोमनाथ चितारे (पोलीस हवालदार) सचिन जगताप (पोलीस हवालदार) कमलेश होले (पोलीस हवालदार) अक्षय कामठे (पोलीस शिपाई) ऋषिकेश रासकर (पोलीस शिपाई) संजय दाणे (पोलीस शिपाई) सोमनाथ सुपेकर (पोलीस शिपाई)1