आंबेडकरी चळवळीतील सचिन नवगिरे वैभव लोखंडे यांचा आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षात जाहीर पक्षप्रवेश नवगिरे , लोखंडे यांच्यावर सोपवली महत्त्वपूर्ण जबाबदारी* * *छत्रपती संभाजीनगर: रविवारी, १० मे रोजी जवाहर कॉलनी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. पक्ष प्रमुख राजुभाई साबळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सचिन नवगिरे आणि वैभव लोखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला* *यावेळी त्यांच्यासोबत फईम शेख फकरीचंद सदाशिव, विजय सोनवणे,गणेश बोर्डे, देवराज सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे राजकुमार साळवे शांतीलाल गायकवाड संघपाल खंडागळे आदींनी जाहीर प्रवेश केला.तसेच याप्रसंगी मराठवाडा कार्याध्यक्ष सचिन नवगिरे राज्य सहसचिव वैभव लोखंडे शहर सरचिटणीस फईम शेख यांची निवड करण्यात आली*. *या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा प्रमुख दिनेश गवळे यांनी केले तर आभार जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती यांनी मानले याप्रसंगी पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, शहर अध्यक्ष रणजीत मनोरे, जिल्हा सरचिटणीस रवि मोरे आणि ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे आनंद तायडे सुनील वाहूळ यांची प्रमुख उपस्थिती होती*.
आंबेडकरी चळवळीतील सचिन नवगिरे वैभव लोखंडे यांचा आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षात जाहीर पक्षप्रवेश नवगिरे , लोखंडे यांच्यावर सोपवली महत्त्वपूर्ण जबाबदारी* * *छत्रपती संभाजीनगर: रविवारी, १० मे रोजी जवाहर कॉलनी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र
पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. पक्ष प्रमुख राजुभाई साबळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सचिन नवगिरे आणि वैभव लोखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला* *यावेळी त्यांच्यासोबत फईम शेख फकरीचंद सदाशिव, विजय सोनवणे,गणेश बोर्डे, देवराज सोनवणे,
पृथ्वीराज सोनवणे राजकुमार साळवे शांतीलाल गायकवाड संघपाल खंडागळे आदींनी जाहीर प्रवेश केला.तसेच याप्रसंगी मराठवाडा कार्याध्यक्ष सचिन नवगिरे राज्य सहसचिव वैभव लोखंडे शहर सरचिटणीस फईम शेख यांची निवड करण्यात आली*. *या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा प्रमुख दिनेश गवळे यांनी
केले तर आभार जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती यांनी मानले याप्रसंगी पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, शहर अध्यक्ष रणजीत मनोरे, जिल्हा सरचिटणीस रवि मोरे आणि ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे आनंद तायडे सुनील वाहूळ यांची प्रमुख उपस्थिती होती*.
- १२६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात कवडी नाही; उलट अडत्यालाच द्यावा लागला १ रुपया छत्रपती संभाजीनगर पैठण: लाखो रुपये खर्च करून, उसनेवारी आणि कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांनी तब्बल तीन महिने मेहनत घेऊन तयार केलेला १२६२ किलो कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. मात्र बाजारात कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे हमाली, तोलाई आणि गोणी खर्च वजा जाता त्यांच्या हातात एकही रुपया उरला नाही. उलट अडत्याला १ रुपया द्यावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी सातबारावर कर्ज काढले, तर काहींनी उसनेवारी करून पैसे उभे केले होते. मात्र बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारी अधिकारी पंचनामे करून फोटो काढून गेले, पण प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.1
- महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.1
- न्यू मुंबई चायनीज बिडकीन बस स्टॅन्ड समोर आहे. मुंबई चायनीज दुसरी शाखा फारोळा. मुंबई चायनीज मालक इमरान शहा यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .1
- पुण्यात वाहतूक नियंत्रित करताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संयम सुटला. त्यांनी एका ट्रक चालकावर थेट दगड उगारला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.1
- जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- पुण्यात प्रवचनकार विकास लवांडे यांच्यावर हल्ल्याचा आरोप; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निषेध आळंदी मातोबाची, ता. हवेली जि. पुणे येथे प्रवचन संपवून परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा वारकरी प्रवचनकार विकास लवांडे यांच्या गाडीला अडवून काही जणांनी शाई फेकत धक्काबुक्की व हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.1