logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सेनगाव तालुक्यात घरकुल अनुदान रखडले पंचायत समितीत थेट सवालांचा भडका ! सेनगाव तालुका प्रतिनिधी सेनगाव पंचायत समिती कार्यालयात प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास विभाग नामदेव केंद्रे यांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित अनुदानाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते हिंमत राठोड यांनी तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वेळेवर जमा न होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. “घर बांधकाम पूर्ण होऊनही लाभार्थी आर्थिक अडचणीत का?” असा थेट सवाल करत राठोड यांनी सालेगाव, केलसुला व साखरा येथील लाभार्थ्यांच्या व्यथा मांडल्या. कागदोपत्री योजना यशस्वी दाखवली जाते; मात्र प्रत्यक्षात लाभार्थी बँकांच्या फेऱ्या मारत आहेत, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनीही आपले अनुभव मांडत अनुदान विलंबामुळे कामे ठप्प झाल्याची कैफियत मांडली. या बैठकीस लाभार्थी विनोद खणके, ज्ञानेश्वर थोरवे, विनोद चव्हाण, सुधाकर महाराज, संतोष थोरवे, आदी उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. घरकुल केवळ योजनेचा आकडा न राहता लाभार्थ्यांच्या छताचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. दरम्यान प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री केंद्रे यांनी येत्या पंधरा दिवसांत लाभार्थ्यांना अनुदान मिळेल असे आश्वासन दिले

3 hrs ago
user_Balu Vitthal Jadhav
Balu Vitthal Jadhav
पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
3 hrs ago
0fdd4fa8-ec68-4322-90de-f0ec05c5a7ef

सेनगाव तालुक्यात घरकुल अनुदान रखडले पंचायत समितीत थेट सवालांचा भडका ! सेनगाव तालुका प्रतिनिधी सेनगाव पंचायत समिती कार्यालयात प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास विभाग नामदेव केंद्रे यांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित अनुदानाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते हिंमत राठोड यांनी तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वेळेवर जमा न होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. “घर बांधकाम पूर्ण होऊनही लाभार्थी आर्थिक अडचणीत का?” असा थेट सवाल करत राठोड यांनी सालेगाव, केलसुला व साखरा येथील लाभार्थ्यांच्या व्यथा मांडल्या. कागदोपत्री योजना यशस्वी दाखवली जाते; मात्र प्रत्यक्षात लाभार्थी बँकांच्या फेऱ्या मारत आहेत, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनीही आपले अनुभव मांडत अनुदान विलंबामुळे कामे ठप्प झाल्याची कैफियत मांडली. या बैठकीस लाभार्थी विनोद खणके, ज्ञानेश्वर थोरवे, विनोद चव्हाण, सुधाकर महाराज, संतोष थोरवे, आदी उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. घरकुल केवळ योजनेचा आकडा न राहता लाभार्थ्यांच्या छताचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. दरम्यान प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री केंद्रे यांनी येत्या पंधरा दिवसांत लाभार्थ्यांना अनुदान मिळेल असे आश्वासन दिले

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”* - जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात! उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या आमरण उपोषणात रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत त्यांनी जि.प. कार्यालयासमोर “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला. *धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर* उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. *जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका* जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. *तक्रारींनंतरही कारवाई नाही* १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    1
    *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”*
-  जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात!
उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे.
पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा 
या आमरण उपोषणात  रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत  त्यांनी जि.प. कार्यालयासमोर  “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला.
*धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर*
उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार,
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप,
सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष
यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
*जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका*
जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी
अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
*तक्रारींनंतरही कारवाई नाही*
१७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • *जन्म मृत्यू प्रमाणपत्रा साठी अडवणूक करू नका जन्म मृत्यू कार्यालयात महापौर सय्यद इकबाल यांच्या कडक सूचना*
    2
    *जन्म मृत्यू प्रमाणपत्रा साठी अडवणूक करू नका जन्म मृत्यू कार्यालयात महापौर सय्यद इकबाल यांच्या कडक सूचना*
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by गंगाधर जक्कुलवार
    1
    Post by गंगाधर जक्कुलवार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Actor माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    8 hrs ago
  • शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews
    1
    शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨
हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच!
#हिमायतनगर
#शिवपुतळा
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड
#आमरणउपोषण
#शिवप्रेमी
#महाराष्ट्र
#लोकशाही
#नगरपंचायत
#BreakingNews
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    22 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.