शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews
शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews
- १० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हा जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद रफीख नांदेड : गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत अंदाजे १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने तत्काळ छापा टाकला. या कारवाईत अंदाजे ५ ब्रास रेती (सुमारे २५ हजार रुपये), एक जेसीबी मशीन (३ लाख रुपये) आणि एक ट्रॅक्टर (७ लाख ५० हजार रुपये) असा एकूण १०,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी धर्मपाल ज्ञानोबा कांबळे (वय ३४, व्यवसाय पोलीस, नांदेड ग्रामीण) यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी केशवराव लमदाडे, बापुराव शीरसागर, मदन येवले (सर्व रा. मार्कंड) व इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०३(२), ३०३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसानी प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस कर्मचारी विठ्ठल शिंदे, आरिफ, जमीर सरवे आदींचा सहभाग होता. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.2
- शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews1
- Post by Today One Live1
- गोदावरी नदी पात्रामध्ये कचरा तथा नाले व गटारीचे दूषित पाणी साचल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध पसरत असून गोदावरी नदीपात्रातील जलजीव धोक्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुद्धा थोडक्यात येत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. गोदावरी नदी शुद्धीकरणा साठी करोडो निधी रुपये येऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे योग्य ती उपाययोजना स्थानिक प्रशासनाच्या वतीने होत नसताना दिसत असल्याचे सुद्धा नागरिकांच्या भावनातून व्यक्त होत आहे. शिक बांधवांचे हिंदू बांधवांचे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या ठिकाणी अनेक भाविक भक्त गुरुद्वारा इतर देवस्थानास दर्शनासाठी अनेक राज्यातून या ठिकाणी येतात . त्याच ठिकाणी अशा प्रकारे घाणीचे साम्राज्य बघून. आश्चर्यचकित होत आहेत. एवढा मोठा पवित्र स्थान आणि ऐतिहासिक स्थान असून सुद्धा कुठल्याही प्रकारे योग्य त्या सोयी सुविधा स्थानिक प्रशासनाच्या वतीने दिसत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. सध्या परिस्थितीत गोदावरी नदी पात्रात अनेक सर्व जसे की अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करण्याचे महत्त्व असून सुद्धा अंघोळ करणे कठीण झाले आहे. तरीसुद्धा कुठलीही हालचाल स्थानिक प्रशासनाच्या वतीने होत असताना दिसत नाही. याकरिता आज रोजी जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते तेजपाल सिंघ खेड व त्यांच्या सहकार्याच्या वतीने. तक्रार देखील करण्यात आली आहे. लवकरात लवकर प्रदूषित होत असलेली गोदावरी नदी त्वरित गांभीर्याने दखल घेऊन स्वच्छ करण्याच्या मार्गे शासनाने लागावे अशी मागणी केली आहे.4
- वसंत स्मृती येथील बैठकीत कडक इशारा..! नायगाव पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पद मिळवणे पुरेसे नाही तर गावपातळीवर जाऊन गोरगरीब जनतेची कामे करणे आवश्यक आहे पद घेऊन घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही कामात कसूर करणाऱ्यांना तातडीने पदावरून कमी करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असा स्पष्ट इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला नायगाव येथील वसंत स्मृती मेमोरियल मध्ये आयोजित नांदेड दक्षिण काँग्रेस'च्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- मुस्लिम महापौर केला तर विरोधकांचं पोट दुखतं, तुम्ही केलं तर ठीक आम्ही केलं तर बाईट - आमदार डॉ राहुल पाटील2
- Post by Mohammad Rafikh1