कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील शिवसम्राट हॉटेलजवळून टाटा ४०७ वाहनातून सुमारे ३ लाख रुपयांचे ठिबक पाईप चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात कर्जत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचे ठिबक पाईप आणि गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने असा एकूण १९ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आळकुटी (ता. पारनेर) येथील प्रकाश किसन वाघुले यांनी फिर्याद दिली होती की, ७ जून रोजी त्यांच्या ताब्यातील टाटा ४०७ वाहनातून २ लाख ९९ हजार २४९ रुपये किमतीचे १६ आणि २० एमएमचे २४२ ठिबक पाईपचे बंडल अज्ञात इसमांनी चोरून नेले होते. या घटनेप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्जत पोलिसांनी तांत्रिक बाबींची पडताळणी तसेच सीसीटीव्ही फुटेजची सखोल पाहणी केली. या तपासामुळे गुन्ह्यातील सहा आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी ऋतुराज रणजित सोनवणे (वय २२, रा. सणसर भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे), अमोल तान्हाजी साळुंखे (वय २३, रा. राऊतनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि आकाश अशोक हदिमनी (वय २०, रा. कन्हेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर जनार्धन विलास लोखंडे (रा. यशवंत नगर अकलूज), अक्षय किसन सोनवणे (रा. सणसर, जि. पुणे) आणि विजू शिंदे हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी करून पोलिसांनी १ लाख ४६ हजार रुपये किमतीचे १६ व २० एमएमचे एकूण १२२ ठिबक पाईपचे बंडल, ८ लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची फ्रॉन्स चारचाकी आणि १० लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा विटकरी रंगाचा आयशर टेम्पो असा एकूण १९ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा आणि चोरीला गेलेल्या उर्वरित मालाचा शोध घेत असून, कर्जत पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीझ मुलाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसावे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक, महिला पोलीस हवालदार मिनाक्षी कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रताप देवकाते, विशाल क्षिरसागर, प्रकाश दंदाडे, अमोल रायकर, किरण बोऱ्हाडे, किरण जाधव, सचिन थोरात, नानासाहेब वाघमारे, वैभव गांगर्डे तसेच मोबाईल सेल विभागाचे राहुल गुंडू व अरुण सांगळे यांच्या पथकाने ही धडक कामगिरी पार पाडली.

- बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी देशातील सर्व विक्रम मोडीत काढत एक ऐतिहासिक विजय संपादन केला. या अभूतपूर्व जनादेशानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पदाची शपथ घेतली. यावेळी सभागृहात उपस्थित आमदारांनी मोठ्या उत्साहात “एकच वादा... वहिनी आणि दादा!” अशा घोषणा देत त्यांचे जोरदार स्वागत केले. या घोषणांनी सभागृहातील वातावरण उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय झाले होते. बारामतीकरांनी दिलेल्या विक्रमी पाठिंब्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आली असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या कटिबद्ध असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यकर्ते आणि समर्थकांनी विश्वास व्यक्त केला की, सुनेत्रा पवार यांच्या या शपथविधीमुळे बारामतीच्या जनतेच्या प्रतिनिधित्वाला एक नवी दिशा मिळेल, तसेच राज्याच्या विकासातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.1
- एकनाथ शिंदे यांनी सहा खासदारांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये प्रवेश केला आहे. या महत्त्वपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिंदे यांनी म्हटले की, 'शिवसेना महाराष्ट्रातील दुसरी सर्वात मोठी पार्टी आहे आणि हा दिवस आमच्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे'.1
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत कुणबी दाखल्यांना आव्हान देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त झाला आहे. या पत्रकार परिषदेत हाके यांनी कुणबी दाखले रद्द करण्याची आणि चुकीचे कुणबी दाखले देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीनंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काळकुटे यांनी म्हटले आहे की, लक्ष्मण हाके यांना मानसोपचार तज्ञाची गरज असून, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. हाकेंना मराठा द्वेशाचा 'कावीळ' झाला असून, त्यांनी बीडमधील बागलाने व मोगले यांची भेट घेऊन उपचार घेतला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याची त्यांना नितांत गरज असल्याचेही काळकुटे यांनी ठामपणे सांगितले. हाके यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही रस्त्यावरची तसेच संवैधानिक लढाई लढायलाही तयार आहोत, असे गंगाधर काळकुटे यांनी स्पष्ट केले.1
- विद्याधरने तबल्याच्या तिन्ही परीक्षा यशस्वीरीत्या दिल्या असून, आता त्याच्या तिसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत त्याने पहिला क्रमांक पटकावून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, त्याला यापूर्वीच्या दोन्ही परीक्षांमध्येही प्रथम स्थान मिळाले होते, त्यामुळे त्याने तबल्याच्या परीक्षेत सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळवले आहे. तबला वाजवण्याची त्याला खूप आवड असून, त्याची ही परीक्षा बीडमध्ये पार पडली होती.1
- मराठीपत्रने सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांनी एका कार्यालयात केलेल्या ग्राउंड रिपोर्टनुसार, गटशिक्षण अधिकारी तिथे अनुपस्थित आढळले. केवळ अधिकारीच नव्हे, तर कार्यालयाचे रजिस्टरही गायब असल्याचे समोर आले. या घटनेमुळे कार्यालयाच्या संपूर्ण कामकाजावर आणि कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- पुण्यातील बिबवेवाडी येथे अनिकेत सोसायटीजवळ PMPML बसचा एक्सल तुटून त्याचे चाक बाहेर आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे PMPML प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संतप्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून बसकडे लक्ष दिले जात नसल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे. प्रवाशांना चांगली सुविधा आणि योग्य सेवा का मिळत नाही, तसेच त्यांच्या जीवाशी खेळ का केला जात आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर या प्रकारामुळे प्रवाशांना काही दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.1
- बीड जिल्ह्यातील धोकादायक जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांच्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी ६९ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली २२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सादर केलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आहे, अनेक इमारती धोकादायक स्थितीत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात एकूण ५८ शाळा इमारतींविना आहेत, तर १७४ शाळांमधील ३१३ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे ७० शाळांमध्ये ९८ अतिरिक्त वर्गखोल्यांची तातडीने आवश्यकता आहे. या सर्व कामांसाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून शाळा इमारतींसाठी ५७ कोटी रुपये आणि २९० वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी ५० लाख रुपये, असा एकूण ६९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी आंदोलकांनी केली. याशिवाय, पाटोदा तालुक्यातील चिंचोली, केज तालुक्यातील तरनळी येथील सानप वस्ती शाळा आणि माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील काळेगाव थडी केंद्र टाकरवण येथील जिल्हा परिषद शाळांसाठीही तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर मुख्यमंत्री, पालकमंत्री बीड आणि शिक्षणमंत्री यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बीड, भगवान सोनावणे यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात शेख युनुस, माजी सैनिक अशोक येडे, किष्किंधा पांचाळ, सादेक सय्यद, रामधन जमाले, प्राचार्य डी.जी. तांदळे (मार्गदर्शक मराठवाडा शिक्षक संघ), बाजीराव ढाकणे, प्राचार्य ॲड. राजकुमार यादव, डॉ. संजय तांदळे, हनुमंत घोडके, कृष्णा साळुंके, शिवशर्मा शेलार, नितीन पिसाळ महाराज, हिरामण तांदळे, रविंद्र मुंडे, प्रा. विठ्ठल सवासे, तुकाराम पवार आदी सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बीड, भगवान सोनावणे यांनी या आंदोलनाची तात्काळ दखल घेतली. त्यांनी नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी २२ कोटी रुपये आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी रुपये, असा एकूण २८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचे लेखी पत्र आंदोलकांना दिले.2
- बीड शहराची जीवनवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून नदीपात्रात सांडपाणी, कचरा आणि जैविक कचरा टाकल्यामुळे तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करून तिचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली आहे. डॉ. ढवळे यांनी खंत व्यक्त केली की, बीड नगर परिषद निवडणुकीत बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र आजही नदीपात्रातील परिस्थिती 'जैसे थे' असून दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित बांधकामे, कचरा आणि जैविक कचरा टाकल्याने प्रदूषण वाढले असून, याचा थेट परिणाम बीडकरांच्या आरोग्यावर होत आहे. नदी संवर्धन हा सार्वजनिक हित, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर विषय असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात बिंदुसरा नदी प्रकल्पाचा तातडीने आढावा घेण्याची, नदीपात्रातील अतिक्रमणे हटवण्याची आणि नगर परिषद कर्मचारी नदीपात्रात कचरा टाकत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, नदीपात्रासाठी फ्लड झोन, ग्रीन झोन, रेड झोन व यलो झोन निश्चित करून संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात असे म्हटले आहे. भविष्यात १९८९ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होऊ शकते, त्यामुळे पूररेषेतील अतिक्रमणांबाबत दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.1