Shuru
Apke Nagar Ki App…
गिरोली परिसरात वानरांचा हैदोस, शेतातील सौर उर्जेच्या प्लेटचे केले नुकसान मानोरा :--तालुक्यातील गिरोली येथील शेतकरी विजय मारुती कांबळे यांच्या शेतातील शक्ती कंपनीच्या सौर ऊर्जा पंपाच्या प्लेटचे नुकसान वानरांच्या कळपाने केल्याने नुकसान भरपाई मिळावी असे निवेदन कांबळे यांनी तहसीलदार यांना दिले आहे. सविस्तर वृत्त असे की मागील काही दिवसा पासून कांबळे यांच्या शेतातील शक्ती कंपनीच्या सौर ऊर्जा पंपाच्या प्लेटावर वानरांचा कळप येऊन उड्या मारल्याने एक प्लेट तुटली दुसरी प्लेट वाकली त्याच्यामुळे वीज निर्मिती बंद झाली . सदर प्लेट खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी शेताची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन दिले आहे.
कु.मोनाली अनिल राठोड
गिरोली परिसरात वानरांचा हैदोस, शेतातील सौर उर्जेच्या प्लेटचे केले नुकसान मानोरा :--तालुक्यातील गिरोली येथील शेतकरी विजय मारुती कांबळे यांच्या शेतातील शक्ती कंपनीच्या सौर ऊर्जा पंपाच्या प्लेटचे नुकसान वानरांच्या कळपाने केल्याने नुकसान भरपाई मिळावी असे निवेदन कांबळे यांनी तहसीलदार यांना दिले आहे. सविस्तर वृत्त असे की मागील काही दिवसा पासून कांबळे यांच्या शेतातील शक्ती कंपनीच्या सौर ऊर्जा पंपाच्या प्लेटावर वानरांचा कळप येऊन उड्या मारल्याने एक प्लेट तुटली दुसरी प्लेट वाकली त्याच्यामुळे वीज निर्मिती बंद झाली . सदर प्लेट खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी शेताची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन दिले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!1
- अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट"..1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी व श्री शिवपंचायतन मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ फेब्रुवारीला आर्वी (जि. वर्धा) – येथील श्री श्याम शक्ती सेवा समिती ट्रस्टच्या वतीने श्री श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी तसेच श्री शिवपंचायतन मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा समारंभाचे आयोजन करण्यात आले असून हा धार्मिक सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजता शुभ मुहूर्तावर मुख्य प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. या पवित्र प्रसंगी दररोज सकाळी देवपूजन, हवन, विविध धार्मिक विधी, सुंदरकांड पाठ, मंगलमय भजन संध्या, जागरण तसेच महिला मंडळांच्या भक्तीमय नृत्यप्रस्तुती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशी श्री राणी सती दादीजींचा मंगलपाठ, तर चौथ्या दिवशी भजन संध्या व जागरण होणार आहे. अंतिम दिवशी महाअभिषेक, न्यास विधी, शिखर कलश स्थापना, दिव्य शृंगार, छप्पन भोग, पूर्णाहुती आणि भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली असून त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. मंदिर व सभामंडप उभारणीसाठी भूमिदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या पुण्यस्मरणार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून सर्व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा धार्मिक महोत्सव आर्वी शहरातील देऊरवाडा रोड परिसरातील शालीग्राम धर्मशाळेजवळील मंदिर प्रांगणात पार पडणार असून परिसरात उत्सवी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. *💥आर्वी येथे श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी व श्री शिवपंचायतन मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ फेब्रुवारीला* *💥धार्मिक सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार* *💥या पवित्र प्रसंगी दररोज सकाळी देवपूजन, हवन, विविध धार्मिक विधी, सुंदरकांड पाठ, मंगलमय भजन संध्या, जागरण तसेच महिला मंडळांच्या भक्तीमय नृत्यप्रस्तुती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन* *💥आर्वी शहरातील देऊरवाडा रोड परिसरातील शालीग्राम धर्मशाळेजवळील मंदिर प्रांगणात पार पडणार असून परिसरात उत्सवी व भक्तीमय वातावरण निर्माण* *💥भजन संध्या व जागरण होणार आहे. अंतिम दिवशी महाअभिषेक, न्यास विधी, शिखर कलश स्थापना, दिव्य शृंगार, छप्पन भोग, पूर्णाहुती आणि भव्य भजन संध्या* *✍️ *CT इंडियन न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे* 7350846789 *WhatsApp 84210782441
- 🔱 पावसात अदृश्य… शिवरात्रीला प्रकट! 🔱 तेलंगणातील तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्हा, नंदिपेट मंडल परिसरातील उम्मेडा गावाजवळ गोदावरी नदीच्या पवित्र काठावर वसलेले श्री सोमेश्वर (उमामहेश्वर) मंदिर हे देवस्थान महाशिवरात्रीला अक्षरशः चमत्कारासारखे प्रकट होते! 🌊 पावसाळ्यात धरणातील पाणी वाढल्याने वर्षभर पाण्यात लपलेले हे प्राचीन मंदिर, पाणी ओसरताच महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले होते. 🛕 कळस, गाभारा आणि दीपमाळ पुन्हा उजेडात येतात आणि श्रद्धा-निसर्ग-अध्यात्म यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. 🪔 कार्तिक महिन्यातील गंगा पूजन व दीपोत्सव तर भक्तांसाठी अविस्मरणीय क्षण ठरतो. ✨ निसर्गाच्या कुशीत दरवर्षी पुन्हा उगवणारा हा अध्यात्माचा दीप—गोदावरीकाठी अनुभवायला मिळणारी दिव्य पर्वणी! यंदा महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. हर हर महादेव! 🔱 #श्रीसोमेश्वर #उमामहेश्वर #गोदावरीकाठ #महाशिवरात्री2026 #Telangana #Nizamabad #Umedda #आस्था #धार्मिकवार्ता #NNLDigitalMedia1
- खामगाव : तालुक्यातील जयपूर लांडे येथे शासकीय कामगार किट वाटपाच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाला असून, भाजप पदाधिकाऱ्यांकडून केवळ आपल्या जवळच्या व्यक्तींचेच फॉर्म स्वीकारले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीची ऑडिओ रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगाच्या भांड्यांच्या संचाचे वाटप केले जात आहे.जयपूर लांडे येथे हे फॉर्म स्वीकारत असताना, तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठराविक लोकांचेच फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात केली.जेव्हा इतर सामान्य कामगार आणि ग्रामस्थ आपले फॉर्म घेऊन पोहोचले, तेव्हा त्यांचे फॉर्म स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जाब विचारला असता, पदाधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ भाजप पदाधिकाऱ्यांच्या पसंतीचे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचेच फॉर्म घेतले जात आहेत,सामान्य आणि गरजू कामगारांना डावलले जात आहे,शासकीय योजनेचे रूपांतर राजकीय कार्यक्रमात केल्याचा संताप व्यक्त होत आहे.या वादादरम्यान झालेला संवाद काही व्यक्तींनी रेकॉर्ड केला असून, ती क्लिप आता तालुक्यात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये पदाधिकाऱ्यांचा अरेरावीचा सूर आणि ग्रामस्थांचा संताप स्पष्टपणे ऐकू येत आहे. या प्रकारामुळे जयपूर लांडे परिसरात तणावाचे वातावरण असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.1
- राष्ट्रपतींच्या दौऱ्यानेच जाग आली का? संत नगरी शेगावात प्रशासनाच्या ‘तत्परते’वर नागरिकांचा सवाल शेगाव : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संत नगरी शेगावात प्रशासन अक्षरशः धावपळ करताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते आनंद सागर बाळापूर रोडवरील खड्डे बुजविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू झाली असून खामगाव रोडवरील दुभाजकांची साफसफाई, झाडांची मशागत, गवत काढणे, रस्त्यांची स्वच्छता अशा सर्व कामांना अचानक वेग आला आहे. मात्र या ‘तत्परते’मुळे शहरातील नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे — ही कामे फक्त व्हीआयपी दौऱ्यापुरतीच का? काही दिवसांपूर्वीच शेगावातील प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. हजारो दिंड्या, वारकरी आणि भाविक संत नगरीत दाखल झाले होते. त्या वेळी रस्त्यांवरील खड्डे जैसे थे होते, अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद होत्या, स्वच्छतेचा प्रश्न कायम होता. नगरपालिकेकडून कोणतीही ठोस हालचाल दिसून आली नाही. भक्तांच्या सोयी-सुविधांपेक्षा प्रशासनाची उदासीनता अधिक ठळकपणे जाणवत होती. आता मात्र राष्ट्रपतींचा दौरा जाहीर होताच काही दिवसांतच चित्र पालटले आहे. वर्षानुवर्षे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन अचानक सक्रिय झाले आहे. जे काम नियमित देखभाल म्हणून व्हायला हवे होते, ते आज ‘ततडीच्या कामां’च्या नावाखाली सुरू आहे. त्यामुळे नागरिक संतप्त होत विचारत आहेत — शेगावातील समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रपतींच्या दौऱ्याचीच गरज होती का? संत नगरीचा दर्जा, येथील लाखो भाविकांची वर्दळ, शहराची वाढती लोकसंख्या या सगळ्यांचा विचार करता रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि स्वच्छता ही मूलभूत कामे कायमस्वरूपी दर्जेदार असणे अपेक्षित आहे. परंतु येथे परिस्थिती उलटी दिसते. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींकडे दुर्लक्ष आणि व्हीआयपींसाठी तातडीची ‘मेकओव्हर’ मोहीम — हीच प्रशासनाची कार्यपद्धती बनली आहे का, असा रोखठोक सवाल आता केला जात आहे. राष्ट्रपतींचा दौरा हा निश्चितच शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे. मात्र त्या निमित्ताने सुरू झालेली ही धावपळ प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर बोट ठेवणारी ठरत आहे. संत नगरी शेगावात विकास हा कायमस्वरूपी आणि नागरिककेंद्री होणार की तो फक्त मोठ्या पाहुण्यांच्या स्वागतापुरताच मर्यादित राहणार? हा प्रश्न आज प्रत्येक शेगावकराच्या मनात घुमत आहे.1
- श्री चाफेश्वर भगवान पालखी नगर प्रदक्षिणा संपन्न! ................................................... ज्ञानेशप्रसाद ब्युरो चिफ वाशिम जिल्हा वाशिम: जिल्ह्यातील ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऋषीवट नगरी अर्थातच रिसोड येथे, महाशिवरात्रीचे पावन पर्वावर, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी, सायंकाळी 4 वा. येथील जागरूक देवस्थान चाफेश्वर भगवान यांची पालखी मिरवणूक अतिशय उत्साहात काढण्यात आली असून, या पालखी सोहळ्यामध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्त्रियांनी भजनी मंडळाद्वारे शिवस्तुती भक्ती गीत म्हणत, आपली भक्ती प्रकट केली. पालखी मार्गावर भाविक महिलांनी आपापल्या अंगणामध्ये पाणी शिंपडून रांगोळीची सजावट करून पालखीचे उत्साहात स्वागत केले. ज्ञानेश्वर थोरात यांनी, पालखीतील भक्तांकरिता, पालखी मार्गावर थंड पाण्याची व्यवस्था केली होती. प्रमुख मार्गाने पालखी मार्गक्रमण करत करत ही पालखी अमरदास बाबा मंदिर ते श्री आप्पास्वामी मंदिरा पासून जय संताजी चौक, संत रविदास चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन सराफ लाईन, गणेश मंदिर, अष्टभुजा देवी चौकातून, आपल्या नियोजित स्थळी श्री चाफेश्वर मंदिर परिसरामध्ये शिव शंकराची महाआरती केल्यानंतर, पालखीची सांगता करण्यात आली.1