दिल्ली येथील जंतर-मंतरवर २० जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ शुक्रवारी (२४ जुलै) सडक अर्जुनी येथे भव्य सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. दुपारी १ वाजता कोहमारा टी-पॉईंट येथून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. या आंदोलनात हातात तिरंगा ध्वज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र आणि निषेध फलक घेऊन हजारोच्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान “जय भीम जय भीम जय जय जय भीम”, “जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है”, “दिल्ली पुलिस हाय हाय” आणि “भारत माता की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मोर्चादरम्यान वक्त्यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्याचे आवाहनही करण्यात आले. हा निषेध मोर्चा अत्यंत शांततेत पार पडला असून तहसील प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
दिल्ली येथील जंतर-मंतरवर २० जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ शुक्रवारी (२४ जुलै) सडक अर्जुनी येथे भव्य सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. दुपारी १ वाजता कोहमारा टी-पॉईंट येथून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चादरम्यान
आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. या आंदोलनात हातात तिरंगा ध्वज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र आणि निषेध फलक घेऊन हजारोच्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व सर्वपक्षीय कार्यकर्ते
सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान “जय भीम जय भीम जय जय जय भीम”, “जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है”, “दिल्ली पुलिस हाय हाय” आणि “भारत माता की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मोर्चादरम्यान वक्त्यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर
झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्याचे आवाहनही करण्यात आले. हा निषेध मोर्चा अत्यंत शांततेत पार पडला असून तहसील प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
- दिल्ली येथील जंतर-मंतरवर २० जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ शुक्रवारी (२४ जुलै) सडक अर्जुनी येथे भव्य सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. दुपारी १ वाजता कोहमारा टी-पॉईंट येथून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. या आंदोलनात हातात तिरंगा ध्वज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र आणि निषेध फलक घेऊन हजारोच्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान “जय भीम जय भीम जय जय जय भीम”, “जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है”, “दिल्ली पुलिस हाय हाय” आणि “भारत माता की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मोर्चादरम्यान वक्त्यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्याचे आवाहनही करण्यात आले. हा निषेध मोर्चा अत्यंत शांततेत पार पडला असून तहसील प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.4
- विद्यार्थ्यांच्या हिताच्या मुद्द्यावरून किन्नर समाज सरकार आणि पोलिसांवर अत्यंत आक्रमक झाला असून त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकार आणि पोलीस 'हिजडे बनून बसले आहेत' असा थेट हल्लाबोल करत किन्नर समाजाने या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे मोठे विधान केले आहे.1
- तालुका न्यायालय आणि तहसील कार्यालयांच्या उंबरठ्यावरच कंत्राटदाराने रस्त्याच्या बांधकामामध्ये महाभ्रष्टाचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. थेट शासकीय कार्यालयांच्या दारातच झालेल्या या भ्रष्ट कामाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.1
- श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने 'चरण सेवा' या उपक्रमाची अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे.1
- शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांच्या वादावर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत मामलेदार न्यायालयाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे.1
- नागपूर येथील खामला चौक परिसरात हँडलूम आणि हस्तकला प्रदर्शन (Handloom Handicraft Exhibition) सध्या सुरू आहे.1
- मुल येथील तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत व पारदर्शकपणे पोहोचविणे हेच अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच नागरिकांचे प्रलंबित अर्ज तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. या कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार यांनी संजय गांधी निराधार योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा, वन्यप्राणी नुकसानभरपाई आणि शेत संरक्षण कुंपण योजनेसह अनेक लोकहिताच्या विषयांवर ठोस भूमिका मांडली. या सर्व योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.1
- सडक अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर आयोजित करण्यात आले. सडक अर्जुनी येथे पार पडलेल्या या रक्तदान शिबिराला प्रतिसाद देत अनेकांनी रक्तदान केले.1