logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जनतेचा आर्थिक विकास व सामाजिक विकास हेच शासनाचे ध्येय आ. बनसोडे सर्वसामान्यांचा आर्थिक व सामाजिक विकास हेच शासनाचे प्रमुख ध्येय : माजी मंत्री आ. संजय बनसोडे उदगीर (प्रतिनिधी) महिला बचत गटांना कर्ज वाटप, शेतकरी सन्मान पुरस्कार वितरण तसेच घरकुल लाभार्थ्यांना घराच्या चाव्यांचे वाटप या संयुक्त कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी माजी मंत्री आ. संजय बनसोडे म्हणाले की, महिला बचत गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मजबूत आधारस्तंभ असून त्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी कर्जवाटपासारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. महिलांनी उद्योग, व्यवसाय व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनून कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर पंचायत समितीच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात आयोजीत महिला बचत गटांना कर्ज वाटप, शेतकरी सन्मान पुरस्कार वितरण व घरकुल लाभार्थी चावी वाटप कार्यक्रमांप्रसंगी आ.संजय बनसोडे बोलत होते. यावेळी लातूर जि.प. चे बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिरादार, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जि.प.सदस्य डाॅ.दिपक सोमवंशी, यमुनाजी भुजबळे, उदगीर पंचायत समितीच्या सभापती वनमाला मरलापल्ले, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, उपसभापती विक्की भोसले, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, उपनगराध्यक्षा शितल शिंदे, बालाजी भोसले, सय्यद जानीमियाँ, प्रकाश बिरादार, मनोज चिखले, सर्जेराव भांगे, सरमंगला बिरादार, संदिप बिरादार, चंद्रकांत कांबळे, सुरेखा भांगे, शिल्पा केवडे, भास्कर जाधव, धनराज नादरगे, कमलाकर नादरगे, प्रकाश राठोड, बालाजी अंधारे, बळीराम सोनकांबळे, वसंत पाटील, राजकुमार पाटील, प्रमोद काळोजी, इम्रान सय्यद, प्रा.श्याम डावळे, सुदर्शन पाटील, रत्नाकर बिरादार, धर्मपाल नादरगे, रमेश भंडे, अनिता शेळके, मारोती बिरादार, जर्नाधन उगिले, डाॅ.सचिन राठोड, शेख शफी, धनंजय गुडसुरकर, छाया राठोड,आदी उपस्थित होते. शेतकरी सन्मान पुरस्कार वितरणाबाबत बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, आधुनिक शेती, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर देण्याचे आवाहन करुन राज्याच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांचे योगदान अमूल्य असून त्यांच्या सन्मानासाठी शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे. माझ्या शेतकरी बांधवांसोबत माझ्या महिला शेतकरी भगिनीही कष्ट करत आहेत. आता यापुढे त्यांचाही सन्मान यापुढे होईल असे सांगुन महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विज बिल माफ करून सरकार त्यांच्या पाठीमागे कटिबद्ध आहे हे दाखवून दिले असल्याचेही आ.संजय बनसोडे यांनी सांगितले. घरकुल लाभार्थ्यांना चाव्यांचे वाटप करताना आ.संजय बनसोडे म्हणाले की, स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणे हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो. शासनाच्या घरकुल योजनांमुळे अनेक गरजू कुटुंबांना सुरक्षित व हक्काचे निवासस्थान मिळत असून अशा योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. कार्यक्रमात महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण, प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान तसेच घरकुल लाभार्थ्यांना घराच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. उपस्थितांनी शासनाच्या विविध योजनांचे स्वागत करत आ. संजय बनसोडे यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला बचत गटांच्या सदस्य, शेतकरी, घरकुल लाभार्थी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

15 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
15 hrs ago
e2893d4e-87c6-49a6-af2a-804f308f35ac

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    1
    मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले.  या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    2
    ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न

मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. 
या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
    2
    भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. ​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    1
    नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले.
​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    1
    पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! 
पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा!
#Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.
    1
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा
    1
    भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या  79 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व  निष्ठावंत कार्यकर्त्यांना  हार्दिक शुभेच्छा
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
    1
    चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती.
चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026.
लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. 
या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे.
शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.