logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेख निजाम यांनी माफी मागितली तरी,काही नगरसेवकाचा आणि तथाकथित संघटनेचा दुटप्पीपणा उघड, शिवरायाच्या नावाने फक्त राजकारण :- शेख युनूस शेख निजाम यांनी माफी मागितली तरी,काही नगरसेवकाचा आणि तथाकथित संघटनेचा दुटप्पीपणा उघड, शिवरायाच्या नावाने फक्त राजकारण :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरात सध्या स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी छत्रपती शिवाजी महाराजा बद्दलच्या वक्तव्यावर जाहीर माफी मागून ही, शहरातील काही नगरसेवक आणि स्वतःला संघटना म्हणवणारे काही लोक जाणून बुजून वाट पेटवत आहेत. असा आरोप सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार शेख युनुस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, माफी मागितल्यावर ही विरोध कशासाठी? माणसाने चूक मान्य करून माफी मागितली तर महाराजांची शिकवलेली माफी आणि मोठ्या मनाची शिकवण कुठे गेली? यांचा उद्देश शिवप्रेम आहे की , फक्त शेख निजाम यांना टार्गेट करून स्वतःची पोळी भाजणे, हा जनतेसमोर पडलेला प्रश्न आहे. शहरात नळाला पाणी घाण येत आहे, शहराचे रस्त्याची चाळण झाली आहे. या प्रश्नावर कधी न बोलणारे काही नगरसेवक आणि काही तथाकथित संघटना फक्त प्रसिद्धीसाठी या विषयावर पुढे पुढे करीत आहेत. आधी प्रभागातील काम करा, मग शिवरायांचे नाव घ्या, असा टोला शहरातील नागरिकाकडून मारला जात आहे. खरे शिवभक्त वाद वाढवत नाहीत, वाद मिटवतात. पण यांनी शिवरायांच्या नावावर फक्त आपले राजकारण चमकायचे आहे, तेच लोक माफी मिळूनही आग लावण्याचे काम करीत आहेत, हे बीड करांनी चांगल्या प्रकारे ओळखले.

19 hrs ago
user_बालाजी जगतकर
बालाजी जगतकर
Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
19 hrs ago
75547a4f-739b-4969-8954-4d8f7baf5477

शेख निजाम यांनी माफी मागितली तरी,काही नगरसेवकाचा आणि तथाकथित संघटनेचा दुटप्पीपणा उघड, शिवरायाच्या नावाने फक्त राजकारण :- शेख युनूस शेख निजाम यांनी माफी मागितली तरी,काही नगरसेवकाचा आणि तथाकथित संघटनेचा दुटप्पीपणा उघड, शिवरायाच्या नावाने फक्त राजकारण :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरात सध्या स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी छत्रपती शिवाजी महाराजा बद्दलच्या वक्तव्यावर जाहीर माफी मागून ही, शहरातील काही नगरसेवक आणि स्वतःला संघटना म्हणवणारे काही लोक जाणून बुजून वाट पेटवत आहेत. असा आरोप सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार शेख युनुस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, माफी मागितल्यावर ही विरोध कशासाठी? माणसाने चूक मान्य करून माफी मागितली तर महाराजांची शिकवलेली माफी आणि मोठ्या मनाची शिकवण कुठे गेली? यांचा उद्देश शिवप्रेम आहे की , फक्त शेख निजाम यांना टार्गेट करून स्वतःची पोळी भाजणे, हा जनतेसमोर पडलेला प्रश्न आहे. शहरात नळाला पाणी घाण येत आहे, शहराचे रस्त्याची चाळण झाली आहे. या प्रश्नावर कधी न बोलणारे काही नगरसेवक आणि काही तथाकथित संघटना फक्त प्रसिद्धीसाठी या विषयावर पुढे पुढे करीत आहेत. आधी प्रभागातील काम करा, मग शिवरायांचे नाव घ्या, असा टोला शहरातील नागरिकाकडून मारला जात आहे. खरे शिवभक्त वाद वाढवत नाहीत, वाद मिटवतात. पण यांनी शिवरायांच्या नावावर फक्त आपले राजकारण चमकायचे आहे, तेच लोक माफी मिळूनही आग लावण्याचे काम करीत आहेत, हे बीड करांनी चांगल्या प्रकारे ओळखले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) बीड: (महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन.)मुप्टा चे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा परिषद, बीड येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. *प्रमुख मागण्या:* 1)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्यास कारणीभूत ऑनलाइन संच मान्यतेत टाकण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता देण्यात याव्यात. 2) इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गाच्या प्रात्यक्षिक बॅच चा कार्यभार 30 विद्यार्थ्या ऐवजी प्रति 20 विद्यार्थ्या ची बॅच प्रचलित पूर्वीसारखे कायम करावी. 3) शिक्षकांचे प्रलंबित देयके (वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,निवड श्रेणी फरक आदी.) तात्काळ अदा करावीत. 4) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रस्ताव तात्काळ निकाली काढावीत. 5) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे बंद केलेले जीपीएफ खाते तात्काळ पूर्ववत करावीत. 6) सातव्या वेतन आयोगामधील पाचवा हप्ता रोखीने अदा करावा. 7) सर्व शिक्षकांचे जीपीएफ खाते तात्काळ ऑनलाइन करून ऑनलाईन स्लिप वितरित कराव्यात . 8) अनुदान प्रचलित टप्पा वाढ देण्यात यावा. 9) सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे , जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे ,ज्युनियर विभाग चे जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.शिक्षकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या निदर्शनास बहुसंख्येने उपस्थित राहावे.
    1
    मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने 
तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव)

मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने 
तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव)
बीड: (महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन.)मुप्टा चे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा परिषद, बीड येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. 
*प्रमुख मागण्या:* 
1)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्यास कारणीभूत ऑनलाइन संच मान्यतेत टाकण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता देण्यात याव्यात.
2) इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गाच्या प्रात्यक्षिक बॅच चा कार्यभार 30 विद्यार्थ्या ऐवजी प्रति 20 विद्यार्थ्या ची बॅच प्रचलित पूर्वीसारखे कायम करावी.
3) शिक्षकांचे प्रलंबित देयके (वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,निवड श्रेणी फरक आदी.) तात्काळ अदा करावीत.
4) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रस्ताव तात्काळ निकाली काढावीत. 
5) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे बंद केलेले जीपीएफ खाते तात्काळ पूर्ववत करावीत.
6) सातव्या वेतन आयोगामधील पाचवा हप्ता रोखीने अदा करावा.
7) सर्व शिक्षकांचे जीपीएफ खाते तात्काळ ऑनलाइन करून ऑनलाईन स्लिप वितरित कराव्यात .
8) अनुदान प्रचलित टप्पा वाढ देण्यात यावा.
9) सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे , जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे ,ज्युनियर विभाग चे जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.शिक्षकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या निदर्शनास बहुसंख्येने उपस्थित राहावे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे* ‌बीड दि. २१ (प्रतिनिधी) रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी व औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पिराजी पतंगे यांनी १५ आॅगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती . आज आंदोलनाचा 7 वा दिवस सुरू झाला तरी त्यांचे अन्नत्याग उपोषण सुरूच होते, जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर आज ते टोकाची भूमिका घेतील असा इशारा संघटनेच्या वतीने दिला होता. त्याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लेखी पत्र दिल्यामुळे सलग सात दिवस सुरू असलेले अन्नत्याग उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले, अशी माहिती कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्या अधिनस्थ कंत्राटदाराकडून कंत्राटी कामगारांना किमान वेतन अधिनियम व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ आजतागायत मिळत नाही तो मिळावा, शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन परिपत्रक / आदेश निर्गमित केले त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत नसल्याने त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी अन्नत्याग उपोषणाचे हत्यार उपसले होते. अखेर ७ व्या दिवशी लोकशाही मार्गाने आंदोलन केले त्याला यश मिळाले.वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर मुख्य अभियंता यांनी दि . २४ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त बैठक आयोजित केली , तर घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना येत्या १५ दिवसात त्यांचे मूलभूत अधिकार व हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी लेखी पत्र देऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे सादर केला जाईल असे लेखी पत्र दिले. नगरपरिषद बीड च्या सफाईची निविदा काढून कामगारांना लवकरच कामावर रुजू करण्यात येईल असे लेखी पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांनी दिल्यामुळे सलग ७ दिवस सुरू असलेले भाई राजेश कुमार जोगदंड यांचे अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले. अपर जिल्हादंडाधिकारी यांचे प्रतिनिधी महसूल सहायक शिवाजी पाटील यांनी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पतंगे यांना लिंबू सरबत दिले तर जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे प्रतिनिधी सुधाकर नागरगोजे, किशोर डमाले यांनी रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड तथा सफाई कामगारांचे प्रतिनिधी यांना जलपान देऊन अन्नत्याग उपोषणाची सांगता केली, सदरील आंदोलनास भारतीय दलित पँथर चे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे सर, बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी पाठिंबा दिला होता. अशी माहिती रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
    1
    *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे
*नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे*
‌बीड दि. २१ (प्रतिनिधी) रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी व औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पिराजी पतंगे यांनी १५ आॅगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती . आज आंदोलनाचा 7 वा दिवस सुरू झाला तरी त्यांचे अन्नत्याग उपोषण सुरूच होते, जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर आज ते टोकाची भूमिका घेतील असा इशारा संघटनेच्या वतीने दिला होता. त्याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लेखी पत्र दिल्यामुळे सलग सात दिवस सुरू असलेले अन्नत्याग उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले, अशी  माहिती कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्या अधिनस्थ कंत्राटदाराकडून कंत्राटी कामगारांना किमान वेतन अधिनियम व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई  सवलतीचा लाभ आजतागायत मिळत नाही तो मिळावा, शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन परिपत्रक / आदेश निर्गमित केले त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत नसल्याने त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी अन्नत्याग उपोषणाचे हत्यार उपसले होते. अखेर ७ व्या दिवशी लोकशाही मार्गाने आंदोलन केले त्याला यश मिळाले.वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर मुख्य अभियंता यांनी दि . २४ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त बैठक आयोजित केली , तर घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना येत्या १५ दिवसात त्यांचे मूलभूत अधिकार व हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी लेखी पत्र देऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे सादर केला जाईल असे लेखी पत्र दिले. नगरपरिषद बीड च्या  सफाईची निविदा काढून 
कामगारांना लवकरच कामावर रुजू करण्यात येईल असे लेखी पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांनी दिल्यामुळे सलग ७ दिवस सुरू असलेले भाई राजेश कुमार जोगदंड यांचे अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले. अपर जिल्हादंडाधिकारी यांचे प्रतिनिधी महसूल सहायक  शिवाजी पाटील यांनी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पतंगे यांना लिंबू सरबत दिले तर जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे प्रतिनिधी सुधाकर नागरगोजे, किशोर डमाले यांनी रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड तथा सफाई कामगारांचे प्रतिनिधी यांना जलपान देऊन अन्नत्याग उपोषणाची सांगता केली, सदरील आंदोलनास भारतीय दलित पँथर चे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे सर, बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी पाठिंबा दिला होता.
अशी माहिती रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली  आहे.
    user_Rajeshkumar Jogdand
    Rajeshkumar Jogdand
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कै.सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन संपन्न वडवणी प्रतिनिधी : वडवणी येथील प्रतिष्ठित कुरकुटे परिवारातील कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त चौंडेश्वरी मंगल कार्यालय, वडवणी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या “शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी । विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥” या अभंगावर निरूपण करत उपस्थितांना भक्ती, संतविचार आणि जीवनाचे मर्म समजावून सांगितले. आपल्या किर्तनातून महाराजांनी संत तुकाराम महाराजांची विठ्ठल चरणी असलेली अखेरची विनवणी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडली. “हे देवा, माझा तुम्हाला कधीही विसर पडू देऊ नका. मी तुमच्या चरणी आहे, तुमची सेवा करणे एवढेच मला ठाऊक आहे,” असा या अभंगाचा भावार्थ त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या रसाळ वाणीतून संतविचार ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. गंगापूजनानिमित्त कुरकुटे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी गोड जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या स्मृतीस दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “गंध असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा; गंध संपला तरी, गंध दरवळत राहावा...” या भावनेतून कै. सौ. शांताबाई कुरकुटे यांच्या प्रेमळ आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला. कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या पश्चात हनुमंत कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, डिगांबर कुरकुटे अशी तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुरकुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील. कार्यक्रमास कुरकुटे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    कै.सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन संपन्न
वडवणी प्रतिनिधी : वडवणी येथील प्रतिष्ठित कुरकुटे परिवारातील कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या गंगापूजनानिमित्त चौंडेश्वरी मंगल कार्यालय, वडवणी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या “शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी । विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥” या अभंगावर निरूपण करत उपस्थितांना भक्ती, संतविचार आणि जीवनाचे मर्म समजावून सांगितले.
आपल्या किर्तनातून महाराजांनी संत तुकाराम महाराजांची विठ्ठल चरणी असलेली अखेरची विनवणी अत्यंत भावपूर्ण पद्धतीने मांडली. “हे देवा, माझा तुम्हाला कधीही विसर पडू देऊ नका. मी तुमच्या चरणी आहे, तुमची सेवा करणे एवढेच मला ठाऊक आहे,” असा या अभंगाचा भावार्थ त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या रसाळ वाणीतून संतविचार ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
गंगापूजनानिमित्त कुरकुटे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी गोड जेवणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या स्मृतीस दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
“गंध असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा;
गंध संपला तरी, गंध दरवळत राहावा...”
या भावनेतून कै. सौ. शांताबाई कुरकुटे यांच्या प्रेमळ आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला.
कै. सौ. शांताबाई तुळशीदास कुरकुटे यांच्या पश्चात हनुमंत कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, डिगांबर कुरकुटे अशी तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुरकुटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.
कार्यक्रमास कुरकुटे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    1 hr ago
  • 🚨 जालना शहरात ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त; २४ वर्षीय आरोपी जेरबंद 🚨 जालना शहरात ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त; २४ वर्षीय आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तब्बल ३ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना, दि. २५ ऑगस्ट : जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, स्थानिक गुन्हे शाखेने एका २४ वर्षीय तरुणाला गांजा बाळगल्याप्रकरणी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल ६ किलो २८५ ग्रॅम गांजा, किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये, जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी अवैध गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक अवैध गांजा विक्री करणाऱ्यांचा शोध घेत असताना सुरज सदाशिव हादगुले (वय २४, रा. महेबुबनगर, अंबड, जि. जालना) हा गांजा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नुरशहावली दर्गा रोड, बसस्थानक परिसर, जालना येथे कारवाई करून सुरज हादगुले याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६ किलो २८५ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) ii (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून पुढील कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, विजय डिक्कर, फुलचंद गव्हाणे, इरशाद पटेल, सतीश श्रीवास, रमेश काळे, योगेश सहाने, प्रदीप करतारे, गणपत पवार व सुनील पवार यांनी केली.
    2
    🚨 जालना शहरात ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त; २४ वर्षीय आरोपी जेरबंद

🚨 जालना शहरात ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त; २४ वर्षीय आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तब्बल ३ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
जालना, दि. २५ ऑगस्ट : जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, स्थानिक गुन्हे शाखेने एका २४ वर्षीय तरुणाला गांजा बाळगल्याप्रकरणी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल ६ किलो २८५ ग्रॅम गांजा, किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये, जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी अवैध गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक अवैध गांजा विक्री करणाऱ्यांचा शोध घेत असताना सुरज सदाशिव हादगुले (वय २४, रा. महेबुबनगर, अंबड, जि. जालना) हा गांजा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नुरशहावली दर्गा रोड, बसस्थानक परिसर, जालना येथे कारवाई करून सुरज हादगुले याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६ किलो २८५ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये आहे.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) ii (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून पुढील कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, विजय डिक्कर, फुलचंद गव्हाणे, इरशाद पटेल, सतीश श्रीवास, रमेश काळे, योगेश सहाने, प्रदीप करतारे, गणपत पवार व सुनील पवार यांनी केली.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या पवित्र आणि अतूट प्रेमाचा सण. याच सणाचे औचित्य साधून वैजापूरमधील विद्यार्थ्यांनी देशासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या सीमेवरील जवानांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुक्ताई प्राथमिक विद्यालय आणि कैलास पाटील विद्यालयातील चिमुकल्यांनी स्वहस्ते राख्या बनवून जवानांना पाठवल्या आहेत. पाहूया या विशेष उपक्रमाचा हा सविस्तर वृत्तांत..."
    1
    जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम
रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या पवित्र आणि अतूट प्रेमाचा सण. याच सणाचे औचित्य साधून वैजापूरमधील विद्यार्थ्यांनी देशासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या सीमेवरील जवानांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुक्ताई प्राथमिक विद्यालय आणि कैलास पाटील विद्यालयातील चिमुकल्यांनी स्वहस्ते राख्या बनवून जवानांना पाठवल्या आहेत. पाहूया या विशेष उपक्रमाचा हा सविस्तर वृत्तांत..."
    user_RBM News Maharashtra
    RBM News Maharashtra
    पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात; राजकीय झेंडे बाजूला ठेवून हक्कांसाठी एकजूट होऊन लढा- उत्तमराव माने *शेतकरी भावा, जागा हो; कष्ट शेतकऱ्यांचे, नफा इतरांचा- उत्तमराव माने* *शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात; राजकीय झेंडे बाजूला ठेवून हक्कांसाठी एकजूट होऊन लढा- उत्तमराव माने* *शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम नाही; नफा मात्र इतरांच्या खिशात : उत्तमराव माने* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शेतीमध्ये कष्ट करून उत्पादन घेतलेल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नसून, त्यांच्या मालाचा भाव सरकार आणि व्यापारी ठरवतात. मात्र हाच कच्चा माल प्रक्रिया करून पक्का झाल्यानंतर त्या मालाची किंमत कारखानदार आणि व्यापारी ठरवतात. ही केवळ भावनिक बाब नसून भारतीय शेती व्यवस्थेतील विसंगतीचे वास्तव उदाहरण आहे, असे मत शेतकरी नेते उत्तमराव माने यांनी व्यक्त केले. शेतकरी बाप व भाऊ पिढ्यान्‌पिढ्या आपल्या वडिलोपार्जित जमिनीत रात्रंदिवस कष्ट करून शेतीमाल पिकवतो. वर्षभर निसर्गाच्या संकटांचा सामना करून स्वतःजवळील भांडवल तसेच बँक व सावकार यांचे कर्ज घेऊन शेतीत गुंतवणूक करतो. त्याच्या उत्पादनातून अनेक घटकांना उत्पन्न मिळते; मात्र शेती उद्योगाचा पाया असलेल्या शेतकऱ्यालाच स्वतःकष्ट करून काढलेल्या उत्पादनाचा योग्य भाव मिळत नाही, ही भारतीय शेतकऱ्यांसमोरील मोठी शोकांतिका आहे. जमिनीची मशागत, बियाणे खरेदी, लागवड खर्च, खते, औषधे, वीज, खुरपणी व तण नियंत्रण, सिंचन, मजुरी आणि स्वतःची मेहनत यांचा हिशोब केला, तर शेतकऱ्याला शेती करणेही कठीण होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही शेतकऱ्याची हीच वास्तविक परिस्थिती असल्याचे सांगितले. अनुदान, कर्जमाफी, वीज सवलत आणि विविध योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांवर उपकार केल्याचे चित्र निर्माण करते. मात्र शेतकऱ्याला कायमस्वरूपी स्वावलंबी करण्याऐवजी त्याला मदतीवर अवलंबून ठेवण्याचे धोरण केंद्र व राज्य सरकारांकडून राबवले जात असल्याची आजतागयात परिस्थिती आहे. ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखान्याचा कागदोपत्री मालक असला, तरी प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत त्याला डावलले जात आहे. कारखान्याच्या व्यवहाराबाबत शेतकऱ्यांना पुरेशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी जागरूक होणे गरजेचे आहे. देशातील उद्योगपतींच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाते, कर्जावरील व्याज कमी केले जाते आणि विविध सवलती दिल्या जातात. वेळप्रसंगी कर्जमाफीही केली जाते. मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या कर्जाबाबत निर्णय घेताना सरकार हात आखडता घेत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “शेतकरी भावांनो, आपल्या शेतात मेहनत व कष्ट करून पिकवलेल्या मालाच्या घामाचा योग्य आर्थिक मोबदला मिळवायचा असेल, तर राजकीय झेंडे बाजूला ठेवा आणि आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढा. अन्यथा पिढ्यान्‌पिढ्या सरकार कोणत्याही पक्षाचे आले, तरी शेतीमालाची लूट थांबणार नाही. या फसव्या व्यवस्थेविरोधात शेतकरी भावांनो जागे होण्याची गरज आहे,”असे मत शेतकरी नेते उत्तमराव माने यांनी व्यक्त केले.
    3
    शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात; राजकीय झेंडे बाजूला ठेवून हक्कांसाठी एकजूट होऊन लढा- उत्तमराव माने
*शेतकरी भावा, जागा हो; कष्ट शेतकऱ्यांचे, नफा इतरांचा- उत्तमराव माने*
*शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात; राजकीय झेंडे बाजूला ठेवून हक्कांसाठी एकजूट होऊन लढा- उत्तमराव माने*
*शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम नाही; नफा मात्र इतरांच्या खिशात : उत्तमराव माने*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
शेतीमध्ये कष्ट करून उत्पादन घेतलेल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नसून, त्यांच्या मालाचा भाव सरकार आणि व्यापारी ठरवतात. मात्र हाच कच्चा माल प्रक्रिया करून पक्का झाल्यानंतर त्या मालाची किंमत कारखानदार आणि व्यापारी ठरवतात. ही केवळ भावनिक बाब नसून भारतीय शेती व्यवस्थेतील विसंगतीचे वास्तव उदाहरण आहे, असे मत शेतकरी नेते उत्तमराव माने यांनी व्यक्त केले.
शेतकरी बाप व भाऊ पिढ्यान्‌पिढ्या आपल्या वडिलोपार्जित जमिनीत रात्रंदिवस कष्ट करून शेतीमाल पिकवतो. वर्षभर निसर्गाच्या संकटांचा सामना करून स्वतःजवळील भांडवल तसेच बँक व सावकार यांचे कर्ज घेऊन शेतीत गुंतवणूक करतो. त्याच्या उत्पादनातून अनेक घटकांना उत्पन्न मिळते; मात्र शेती उद्योगाचा पाया असलेल्या शेतकऱ्यालाच स्वतःकष्ट करून काढलेल्या उत्पादनाचा योग्य भाव मिळत नाही, ही भारतीय शेतकऱ्यांसमोरील मोठी शोकांतिका आहे.
जमिनीची मशागत, बियाणे खरेदी, लागवड खर्च, खते, औषधे, वीज, खुरपणी व तण नियंत्रण, सिंचन, मजुरी आणि स्वतःची मेहनत यांचा हिशोब केला, तर शेतकऱ्याला शेती करणेही कठीण होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही शेतकऱ्याची हीच वास्तविक परिस्थिती असल्याचे सांगितले.
अनुदान, कर्जमाफी, वीज सवलत आणि विविध योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांवर उपकार केल्याचे चित्र निर्माण करते. मात्र शेतकऱ्याला कायमस्वरूपी स्वावलंबी करण्याऐवजी त्याला मदतीवर अवलंबून ठेवण्याचे धोरण केंद्र व राज्य सरकारांकडून राबवले जात असल्याची आजतागयात परिस्थिती आहे.
ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखान्याचा कागदोपत्री मालक असला, तरी प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत त्याला डावलले जात आहे. कारखान्याच्या व्यवहाराबाबत शेतकऱ्यांना पुरेशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी जागरूक होणे गरजेचे आहे. 
देशातील उद्योगपतींच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाते, कर्जावरील व्याज कमी केले जाते आणि विविध सवलती दिल्या जातात. वेळप्रसंगी कर्जमाफीही केली जाते. मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या कर्जाबाबत निर्णय घेताना सरकार हात आखडता घेत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“शेतकरी भावांनो, आपल्या शेतात मेहनत व कष्ट करून पिकवलेल्या मालाच्या घामाचा योग्य आर्थिक मोबदला मिळवायचा असेल, तर राजकीय झेंडे बाजूला ठेवा आणि आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढा. अन्यथा पिढ्यान्‌पिढ्या सरकार कोणत्याही पक्षाचे आले, तरी शेतीमालाची लूट थांबणार नाही. या फसव्या व्यवस्थेविरोधात शेतकरी भावांनो जागे होण्याची गरज आहे,”असे मत शेतकरी नेते उत्तमराव माने यांनी व्यक्त केले.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • वडवणी शहरात रस्ता रोको
    1
    वडवणी शहरात रस्ता रोको
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    22 hrs ago
  • शेळी चोरून नेताना चोर रंगेहात नागरिकांनी पकडला; घटना व्हिडिओ पहा
    2
    शेळी चोरून नेताना चोर रंगेहात नागरिकांनी पकडला; घटना 
व्हिडिओ पहा
    user_Beed News Express
    Beed News Express
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.