logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

फुलउमरी ग्रामपंचायतीत प्रशासक राजचा फज्जा अधिकारी गायब, ग्रामस्थ हैराण! मानोरा : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या फुलउमरी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक राज सुरू असून, प्रत्यक्षात मात्र प्रशासन पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गावाचा कारभार प्रशासकांच्या हाती देण्यात आला असला तरी संबंधित अधिकारी गावाकडे फिरकूनही पाहत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रारंभी विस्तार अधिकारी कैलास पद्मणे यांच्याकडे प्रशासक पदभार होता, त्यानंतर सध्या बांधकाम अभियंता सागर घाडगे यांच्याकडे हा कारभार सोपविण्यात आला आहे. मात्र, बांधकाम विभागाचा आधीच मोठा व्याप असताना अतिरिक्त जबाबदारी दिल्यामुळे ते फुलउमरी ग्रामपंचायतीच्या कामकाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायत कार्यालयात अधिकारी अनुपस्थित राहत असल्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, विकासकामे यासारखी मूलभूत कामे रखडली असून गावातील सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत, प्रशासकांनी आठवड्यातून किमान दोन दिवस तरी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

9 hrs ago
user_कु.मोनाली अनिल राठोड
कु.मोनाली अनिल राठोड
पत्रकार मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
9 hrs ago
6a058e10-dd17-4d9c-8458-7839ff53e17c

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.
    1
    दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे.
अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Amravati, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption
    1
    हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका
हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे.
निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे.
👉 नागरिकांची मागणी:
✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
✔️ देयके तात्काळ थांबवा
✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा
सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे.
#Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by श्री व्यंकटेश देवराव कदम
    1
    Post by श्री व्यंकटेश देवराव कदम
    user_श्री व्यंकटेश देवराव कदम
    श्री व्यंकटेश देवराव कदम
    Voice of people बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.