डॉक्टरांवरील हल्लेखोरांची दिंड; महागाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई पाच आरोपी जेरबंद; मुख्य आरोपीसह चार जण जेलबंद महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, नर्सिंग ऑफिसर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करून रुग्णालय तसेच कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरमध्ये तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध महागाव पोलिसांनी कारवाई केली आहे. शेख इजराइल शेख शाबुद्दीन वय 28 वर्षे, प्रवीण उर्फ छकुला विलास कांबळे वय 28 वर्षयोगेश खंदारे, श्रीकांत देशमाने व 19 वर्ष योगेश खंदारे आणि एका विधीसंघर्ष बालकासह तीन आरोपींना २३ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी आरोपींची महागाव शहरातील व्यापारी पेठेतून धिंड काढल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता १० ते १२ जणांच्या टोळक्याने ग्रामीण रुग्णालयात धुडगूस घातला होता. हल्लेखोरांच्या दहशतीमुळे महिला डॉक्टर व परिचारिकांना बाथरूममध्ये लपून बसावे लागले होते. नर्सिंग ऑफिसर पूनम कोकरे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले होते. तसेच रुग्णालयातील साहित्य व कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरची तोडफोड करण्यात आली होती. घटनेनंतर डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर महागाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन आरोपींना जेरबंद केले. ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम शेख, एपीआय सुनील अंबुरे, एपीआय किशोर मुरकुटे व पोलीस पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील इतर हल्लेखोर अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. “या प्रकरणातील कोणालाही कायद्याच्या कचाट्यातून सुटका होणार नाही इतरांवरही आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी दिली.
डॉक्टरांवरील हल्लेखोरांची दिंड; महागाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई पाच आरोपी जेरबंद; मुख्य आरोपीसह चार जण जेलबंद महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, नर्सिंग ऑफिसर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करून रुग्णालय तसेच कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरमध्ये तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध महागाव पोलिसांनी कारवाई केली आहे. शेख इजराइल शेख शाबुद्दीन वय 28 वर्षे, प्रवीण उर्फ छकुला विलास कांबळे वय 28 वर्षयोगेश खंदारे, श्रीकांत देशमाने व 19 वर्ष योगेश खंदारे आणि एका विधीसंघर्ष बालकासह तीन आरोपींना २३ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी आरोपींची महागाव शहरातील व्यापारी पेठेतून धिंड काढल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता १० ते १२ जणांच्या टोळक्याने ग्रामीण रुग्णालयात धुडगूस घातला होता. हल्लेखोरांच्या दहशतीमुळे महिला डॉक्टर व परिचारिकांना बाथरूममध्ये लपून बसावे लागले होते. नर्सिंग ऑफिसर पूनम कोकरे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले होते. तसेच रुग्णालयातील साहित्य व कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरची तोडफोड करण्यात आली होती. घटनेनंतर डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर महागाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन आरोपींना जेरबंद केले. ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम शेख, एपीआय सुनील अंबुरे, एपीआय किशोर मुरकुटे व पोलीस पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील इतर हल्लेखोर अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. “या प्रकरणातील कोणालाही कायद्याच्या कचाट्यातून सुटका होणार नाही इतरांवरही आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी दिली.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा; कृषी बाजार सभापती पंढरीनाथ घुले1
- *देगलूर येथील आधार केंद्र चालू करण्याच्या मागणीसाठी*शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने बोंब मारो आंदोलन संपन्न* देगलूर येथील पोस्ट ऑफीस मधील आधार कार्ड नोंदणी केंद्र गेल्या 4 महीन्या पासून बंद असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. सदरील केंद्र त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी देगलूर येथील पोस्ट ऑफिस समोर शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोंबा बोंब बोंबमारो आंदोलन व निदर्शने करण्यात आली. आधार केंद्र मागील 4 महीन्या पासून बंद असल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोस्ट ऑफीस अधिकारी यांना घेराव घालून व नांदेडच्या मुख्य अधिक्षक पाठक, व उपमुख्य अधिक्षक कुलकर्णी यांना निवेदन देऊन आधार केंद्र त्वरित चालू करण्यात यावे अन्यथा पोस्ट ऑफीस समोर निदर्शने धरणे बोंबमारो आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले होते, तरीपण अद्याप पर्यंत आधार केंद्र चालू न झाल्याने दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून पोस्ट ऑफीस समोर निदर्शने व बोंबा बोंब बोंबमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आधार केंद्र त्वरित चालू करण्यात यावे अशा घोषणा देण्यात आल्या. शैक्षणिक व इतर शासकीय कामांसाठी आधार कार्ड बंधनकारक असल्याने आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी स्त्री, पुरुष, वयोवृद्ध, लहान बालके, सकाळी पाच वाजतापासून सर्व कामधंदे सोडून भुकताण विसरून रांगेमध्ये उभे रहावे लागत होते, त्यामुळे 4 महिन्यांपासून बंद असलेले एकमेव आधार कार्ड नोंदणी केंद्र त्वरित चालू करण्यात यावे अशी मागणी करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोस्ट ऑफीस समोर तीव्र बोंबाबोंब बोंबमारो आंदोलन व निदर्शने करण्यात आली शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी उपजिल्हा प्रमुख नागनाथ वाडेकर, मुखेडचे तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर, मष्णाजी पैलावार, विनोद सोनकांबळे, अशोक कांबळे, मानाजी लोणे पाटील लोणीकर, गंगाधर पाटील चाकूरकर, राजु उल्लेवार,हाणमंत राजुरे लख्खेकर, संजय पाटील मंगरुळे लख्खेकर,अशोक मारवाडे कावळगड्डेकर, शिवाजी पाटील, दत्ता राजुरे.शिवाजी चव्हाण, शंकरराव जाधव, अर्जुन लूटे, राजु जाधव आदींसह इतर पदाधिकारी व स्त्री, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशिक्षण पोलिस निरीक्षक तथा पोलीस उपअधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक सुर्यवंशी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, यावेळी पोस्ट ऑफीसर पवार यांनी लवकरच आधार केंद्र चालू करण्याचे आश्वासन दिले.2
- हिदायत पटेल हत्याकांड में बड़ा अपडेट! फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत खारिज | High Court फैसला हिदायत पटेल हत्याकांड मामले में बड़ा अपडेट सामने आया है। बॉम्बे हाईकोर्ट की नागपुर बेंच ने आरोपी फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत याचिका खारिज कर दी है। 24 अगस्त 2026 को दिए गए फैसले में कोर्ट ने उपलब्ध सामग्री के आधार पर प्रथमदृष्टया संलिप्तता का उल्लेख करते हुए गिरफ्तारी से पहले जमानत देने से इनकार किया। मामले में आरोपियों के बीच टेलीफोन पर बातचीत और अन्य कॉल रिकॉर्ड से जुड़े सबूत जांच के दौरान सामने आने की बात कोर्ट के समक्ष रखी गई। जांच एजेंसी की ओर से आरोपियों की कस्टोडियल पूछताछ को भी जरूरी बताया गया है। अब इस मामले की आगे की जांच और कोर्ट की कार्यवाही पर सभी की नजर है। 📍 हिदायत पटेल हत्याकांड की हर बड़ी और महत्वपूर्ण अपडेट के लिए जुड़े रहिए India News R7 के साथ। वीडियो पसंद आए तो Like 👍 करें, Share करें और India News R7 को Subscribe जरूर करें।1
- मधापुरीत प्रेमप्रकरणाचा थरार; तरुणाचा विहिरीत मृत्यू अन्... अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात मधापुरी येथे प्रेमसंबंधाच्या कथित प्रकरणातून गुरुवारी खळबळ उडाली. अनिश चव्हाण या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला गावकऱ्यांनी वेळीच बाहेर काढले. घरी परतल्यानंतर तरुणीने विषप्राशन केल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाल्याने माना पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. एसआरपीचे पथकही दाखल झाले असून, दोघांचे नेमके नाते व घटनेमागील कारणाचा तपास सुरू आहे.1
- पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन! दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.1
- प्रमुख मागण्या आहेत 2024 पासून करार झालेला असून त्या करारामध्ये हॉलिडेज बँकिंग पाच दिवसाचा आठवडाची मागणी1
- धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* *धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबई येथे आपल्या भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री आदिती ताई तटकरे तसेच पुणे येथे सौ. प्रमिलाताई पुरुषोत्तम केंद्रे यांच्या कडून राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले आहे. तीनही बहिणींकडून राखी बांधून तिघींच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा तसेच कायम जनतेची सेवा घडावी, अशा शुभेच्छा धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणींना दिल्या. पंकजाताई मुंडे, प्रमिलाताई केंद्रे तसेच आपल्या सर्व बहिणी यांच्याबरोबरच आदितीताई तटकरे यांच्या समवेत धनंजय मुंडे हे दरवर्षी न चुकता रक्षा बंधन साजरे करतात, ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे.2
- दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... अमरावती : - जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते. श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली1
- चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी धामणगांव रेल्वे तालुक्यातील चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी प्रवासी ऑटोने जात असताना पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावर शोभा माता मंदिराजवळ चारचाकी वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ऑटोमधील पाचही मुली गंभीर जखमी झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी ऑटोने निघाल्या होत्या. दरम्यान, पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावरील शोभा माता मंदिराजवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की ऑटो रस्त्याच्या कडेला उतरला, तर चारचाकी वाहनाचीही दिशा बदलली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पाचही मुलींना तातडीने उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इरविन) येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शोभा माता मंदिराजवळ चक्काजाम आंदोलन करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. या अपघाताचा पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलीस करीत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1