Shuru
Apke Nagar Ki App…
पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन! दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.
मराठवाडा संवाद न्युज
पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन! दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- ईद मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह; जुलूसात एकतेचा संदेश नवीन जालना टांगा स्टँडपासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप.. रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शालहाराने सन्मान.. पैगंबर हजरत मोहम्मद स.अ. यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर ईद मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह; जुलूसात एकतेचा संदेश नवीन जालना टांगा स्टँडपासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप.. रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शालहाराने सन्मान.. पैगंबर हजरत मोहम्मद स.अ. यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर1
- 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪 #खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी1
- बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .1
- चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा! चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!1
- ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठान येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर भेटलेल्या बालपणीच्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आणि सोनेरी आठवणींना उजाळा दिला. संसाराच्या व्यापातून स्वतःसाठी एक दिवस सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे (कळसकर) यांच्या विशेष पुढाकाराने या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर संसाराच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना एक दिवस स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगता यावा, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. यासाठी कुमशी, घोसापुरी आणि नामलगाव परिसरातील १९९०-९१ या बॅचच्या (इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी) माजी विद्यार्थिनींना एकत्र आणण्यात आले. खेळ, शिदोरी आणि मनमोकळ्या गप्पा तब्बल साडेतीन दशकांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या सर्वजणींनी संपूर्ण दिवस एकमेकींना गजरे लावून, सुख-दुःखाच्या गप्पा मारत आणि मनमोकळेपणाने संवाद साधत (शेअरिंग करून) बालपणातील ते दिवस पुन्हा अनुभवले. या मेळाव्यातील काही खास क्षण: पारंपरिक खेळ: या वयातही महिलांनी शाळेच्या मैदानावर खेळले जाणारे खो-खो, आंधळी कोशिंबीर आणि पायदोड यांसारखे पारंपरिक खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. सहभोजन: प्रत्येकीने घरून आणलेली 'शिदोरी' एकत्र करून सर्वजणींनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. रक्षाबंधन व स्नेहभेट: मैत्रिणींनी एकमेकींना राखी बांधून मैत्रीचे हे अतूट नाते अधिक घट्ट केले आणि एकमेकींना स्नेहभेटही दिली. या आनंददायी आणि भावपूर्ण मेळाव्याला मीरा बांड, शिवकन्या बांड, शारदा शेळके, किस्किनदा बांड, मंगल करपे, कांता शिंदे, उषा जाधव, शालिनी नेरे, दैवशाला डोळस आणि रुक्मिणी नागापुरे आदी माजी विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती. ३५ वर्षांनंतरचा हा मेळावा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.2
- न्यायालय हे नाटकाचे व्यासपीठ नाही! ११ वर्षे न्यायालयीन वेळ वाया घालवणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५ लाखांचा दंड.. वकील-अशिलातील गोपनीयतेचा भंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा कठोर निर्णय; बार कौन्सिलची कारवाई कायम.. कायदेशीर नीतिमत्ता आणि अशिलाच्या गोपनीयतेचा मोठा विजय; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक — ॲड. महेश धन्नाव.. न्यायालय हे नाटकाचे व्यासपीठ नाही! ११ वर्षे न्यायालयीन वेळ वाया घालवणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५ लाखांचा दंड.. वकील-अशिलातील गोपनीयतेचा भंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा कठोर निर्णय; बार कौन्सिलची कारवाई कायम.. कायदेशीर नीतिमत्ता आणि अशिलाच्या गोपनीयतेचा मोठा विजय; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक — ॲड. महेश धन्नाव.. न्यायालयाचा वापर वैयक्तिक वाद, सूडबुद्धी किंवा प्रसिद्धीसाठी करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा अत्यंत कठोर संदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तब्बल ११ वर्षे न्यायालयीन प्रक्रियेत वेळ वाया घालवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने वकील रिझवान सिद्दीकी आणि त्यांची माजी महिला अशील रेहाना खान यांच्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरोधात केलेल्या तक्रारीसंदर्भात आपल्या वकिलाला दिलेली गोपनीय माहिती तसेच वैयक्तिक संभाषणांचे रेकॉर्डिंग वकिलाने काही टीव्ही वाहिन्यांवर सार्वजनिक केल्याचा आरोप होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या शिस्तपालन समितीने वकील रिझवान सिद्दीकी यांच्यावर व्यावसायिक गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत त्यांची सनद दोन वर्षांसाठी निलंबित केली होती. या निर्णयाला वकिलाने आव्हान दिले होते.1
- धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* *धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबई येथे आपल्या भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री आदिती ताई तटकरे तसेच पुणे येथे सौ. प्रमिलाताई पुरुषोत्तम केंद्रे यांच्या कडून राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले आहे. तीनही बहिणींकडून राखी बांधून तिघींच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा तसेच कायम जनतेची सेवा घडावी, अशा शुभेच्छा धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणींना दिल्या. पंकजाताई मुंडे, प्रमिलाताई केंद्रे तसेच आपल्या सर्व बहिणी यांच्याबरोबरच आदितीताई तटकरे यांच्या समवेत धनंजय मुंडे हे दरवर्षी न चुकता रक्षा बंधन साजरे करतात, ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे.2
- रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बुलडाणा बाजारपेठ फुलली; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी1
- जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव1