काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. राहुलभाऊ बोन्द्रे यांच्या नेतृत्वात आयोजित गॅस दरवाढीच्या विरोधातील आंदोलनात आज आम्ही उपस्थित राहून शासनाच्या अन्यायकारक निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. 🔥 गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन 🔥 काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. राहुलभाऊ बोन्द्रे यांच्या नेतृत्वात आयोजित गॅस दरवाढीच्या विरोधातील आंदोलनात आज आम्ही उपस्थित राहून शासनाच्या अन्यायकारक निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. सामान्य जनतेच्या खिशावर सतत वाढणारी महागाई आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीतील वाढ ही प्रत्येक कुटुंबासाठी मोठे आर्थिक ओझे ठरत आहे. जनतेला “अच्छे दिन” दाखवण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारनेच आज जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. या आंदोलनात मी डॉ. अमोल सुखदेव लहाने (जनसेवक, प्रभाग क्र.१०) व सौ. स्वाती अमोल लहाने (नगरसेविका, प्रभाग क्र.१०) उपस्थित राहून जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला, पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. तसेच माझ्या प्रभागातील माझ्या भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून महागाईविरोधात एकजुटीने आवाज उठवला.

- छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाईसाहेब यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतींना उजाळा देणारा उत्सव आज करवंड येथे संपन्न झाले.1
- महावितरणचा 'शॉक'! बुलढाण्यात विद्युत तारेच्या घर्षणामुळे साडेचार एकर मका जळून खाक1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- भोकरदन मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त विविध ठिकाणी अभिवादन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,आमदार संतोष दानवे,माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित.1
- खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध मंडळांनी सादर केलेली लेझीम पथके आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, मध्यरात्री १२ वाजेपर्यंत चाललेली ही मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली. शोभायात्रेची सुरुवात करण्यापूर्वी सर्व मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि 'जय भीम'च्या जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली. या शोभायात्रेत शहर पोलीस स्टेशन आणि शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण ८ प्रमुख मंडळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये सम्राट अशोक क्रीडा मंडळ (बाळापूर फैल), मिमशक्ती क्रीडा मंडळ (बाळापूर फैल), पंचशील क्रीडा मंडळ (बकरी बाजार, बाळापूर फैल), सम्राट क्रीडा मंडळ (हरी फैल), समता क्रीडा मंडळ (शंकर नगर), तथागत बहुउद्देशीय नवयुवक मंडळ (हिरा नगर) व अशोक क्रीडा मंडळ (दालफैल), सिद्धार्थ क्रीडा मंडळ (नवा फैल) सहभागी झाले होते.मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांनी लेझीमचा चित्तथरारक खेळ सादर केला. तसेच, अनेक मंडळांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे जिवंत देखावे सादर केले होते. रस्ते भीमभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आणि सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य यामुळे रात्री १२ वाजेपर्यंत चाललेली ही मिरवणूक कोणत्याही गालबोटाविना शांततेत पार पडली. प्रशासनाने आणि शहरवासीयांनी या शिस्तबद्ध आयोजनाचे कौतुक केले आहे.1
- जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना निवेदन.. मातंग समाजाच्या वतीने निवेदन1
- Post by Jansagar 9 Marathi1
- *किन्होळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावामध्ये शोभायात्रा* प्रतिनिधी - संतोष बाहेकर..( बुलडाणा) बुलडाणा - येथुन जवळच असलेल्या किन्होळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज किन्होळा येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. राजकीय, शासकीय, व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने हजर होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सदर मिरवणूक बस स्टँड वरील पुतळ्यापासून सुरुवात झाली.1