logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सांगोला तालुकास्तरीय भजन स्पर्धेत माळी बहीण-भावंडांचे यश श्रावणी माळी प्रथम, श्रवण माळी द्वितीय; सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षिसाने गौरव सांगोला : श्री गणेश उत्सव आगमन व श्री संत गजानन महाराज यांच्या ११६ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त १५ सप्टेंबर २०२६ रोजी सांगोला येथे तालुकास्तरीय संगीत एकल अभंग व गौळण गायन भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खर्डी येथील श्रुती स्वरा क्लासिकल म्युझिक अकॅडमीच्या विद्यार्थिनी कु. श्रावणी नवनाथ माळी हिने खुल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. तर लहान गटात तिचा भाऊ श्रवण नवनाथ माळी याने द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल श्रावणी व श्रवण माळी या सख्ख्या भाऊ-बहीण यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दोघेही सांगोला तालुक्यातील देवळे गावचे रहिवासी असून, त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ह.भ.प. वैभव केंगार सर (संगीत अलंकार) व ह.भ.प. माऊली खरात (एम.ए. म्युझिक, तबला अलंकार) यांनी काम पाहिले. तबलावादनाची साथ श्री. विनायक कोळेकर यांनी केली. या विद्यार्थ्यांना ह.भ.प. रामदास (नाना) रोंगे सर (संगीत अलंकार), ह.भ.प. धनंजय रोंगे सर (एम.ए. म्युझिक, तबला अलंकार), ह.भ.प. मच्छिंद्र कोळेकर, ह.भ.प. सुधाकर कुंभार गुरुजी व ह.भ.प. बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले. गायन साथ म्हणून श्रवण माळी व नवनाथ माळी, तर टाळाची साथ श्री. चिंतामणी खांडेकर व श्री. सिद्धेश्वर कुंभार यांनी केली. आई सौ. वंदना माळी यांचेही विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक सोमेश यावलकर सर, अतुल उकळे सर तसेच गणेश उत्सव तरुण मंडळ, वज्राबाद पेठ, सांगोला यांच्या वतीने करण्यात आले होते. श्रावणी व श्रवण यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थित भजन मंडळे, श्री गणेश तरुण मंडळ सांगोला तसेच जय हनुमान भजनी मंडळ, देवळे यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

2 hrs ago
user_Tej maharashtra varta
Tej maharashtra varta
पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
9ac71262-7356-4548-b86a-27d24c9e6d0f

सांगोला तालुकास्तरीय भजन स्पर्धेत माळी बहीण-भावंडांचे यश श्रावणी माळी प्रथम, श्रवण माळी द्वितीय; सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षिसाने गौरव सांगोला : श्री गणेश उत्सव आगमन व श्री संत गजानन महाराज यांच्या ११६ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त १५ सप्टेंबर २०२६ रोजी सांगोला येथे तालुकास्तरीय संगीत एकल अभंग व गौळण गायन भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खर्डी येथील श्रुती स्वरा क्लासिकल म्युझिक अकॅडमीच्या विद्यार्थिनी कु. श्रावणी नवनाथ माळी हिने खुल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. तर लहान गटात तिचा भाऊ श्रवण नवनाथ माळी याने द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल श्रावणी व श्रवण माळी या सख्ख्या भाऊ-बहीण यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दोघेही सांगोला तालुक्यातील देवळे गावचे रहिवासी असून, त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ह.भ.प. वैभव केंगार सर (संगीत अलंकार) व ह.भ.प. माऊली खरात (एम.ए. म्युझिक, तबला अलंकार) यांनी काम पाहिले. तबलावादनाची साथ श्री. विनायक कोळेकर यांनी केली. या विद्यार्थ्यांना ह.भ.प. रामदास (नाना) रोंगे सर (संगीत अलंकार), ह.भ.प. धनंजय रोंगे सर (एम.ए. म्युझिक, तबला अलंकार), ह.भ.प. मच्छिंद्र कोळेकर, ह.भ.प. सुधाकर कुंभार गुरुजी व ह.भ.प. बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले. गायन साथ म्हणून श्रवण माळी व नवनाथ माळी, तर टाळाची साथ श्री. चिंतामणी खांडेकर व श्री. सिद्धेश्वर कुंभार यांनी केली. आई सौ. वंदना माळी यांचेही विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक सोमेश यावलकर सर, अतुल उकळे सर तसेच गणेश उत्सव तरुण मंडळ, वज्राबाद पेठ, सांगोला यांच्या वतीने करण्यात आले होते. श्रावणी व श्रवण यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थित भजन मंडळे, श्री गणेश तरुण मंडळ सांगोला तसेच जय हनुमान भजनी मंडळ, देवळे यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.
    4
    १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात
१९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात
वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.
युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ
युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे.
सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे.
गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.
    user_हणमंत बिराप्पा कोळी
    हणमंत बिराप्पा कोळी
    News Anchor जत, सांगली, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना
    1
    दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • यवतमाळ मध्ये साखरेचा ट्रक पलटी लोकांनी साखरेची पोती केली लंपास.
    1
    यवतमाळ मध्ये साखरेचा ट्रक पलटी लोकांनी साखरेची पोती केली लंपास.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आरोग्य यंत्रणा गोरगरीब रुग्णाची लूट कशी करू शकते ते पहा एक अधिकारी कर्तव्यदक्ष असेल तर येवढ उघड होऊ शकतं; तर हजारो IPS, IAS, IRS, IFS अधिकारी ज्यांना देशाच्या घटनेन संरक्षण दिल आहे व राजकिय हस्तक्षेप त्यांच काहीच वाकडं करू शकत नाही मग काय होऊ शकेल!!!! पण भ्रस्टाचारान सर्व व्यवस्था पोकरली गेली आहे. ग्रामपंचायतीपासु ते दील्लीपर्यंत सरकारी अधिकारी राजकिय व्यवस्थेच बाहुल होऊन काम करतात आणि यामधे पिळला जाठतो सामान्य नागरीक. विचार करा जवळपास ७० ते ८०% जनता दिवसाला ५०० रूपये कमवत नाही आणि एक IV सेट मधिल कमाई. ही सर्वच औषधांची कहानी. हे गेली कित्तेक वर्ष चालू आहे. १० रू च्या वस्तुवर ४०० किंवा ५०० रूपये किंमत कशी छापली जाऊ शकते??? मोदीसाहेब जे जनरीक स्वस्त म्हणतात तिथे पण काही वेगळी परिस्थीती नाही. जे अरोग्य व्यवसायाशी संमंधीत आहेत त्याना सर्व माहित आहे. ही गरीबांची पिळवनुक आहे,
    1
    आरोग्य यंत्रणा गोरगरीब रुग्णाची लूट कशी करू शकते ते पहा
एक अधिकारी कर्तव्यदक्ष असेल तर येवढ उघड होऊ शकतं;
तर हजारो IPS, IAS, IRS, IFS  अधिकारी ज्यांना देशाच्या घटनेन संरक्षण दिल आहे व राजकिय हस्तक्षेप त्यांच काहीच वाकडं करू शकत नाही मग काय होऊ शकेल!!!!
पण भ्रस्टाचारान सर्व व्यवस्था पोकरली गेली आहे. ग्रामपंचायतीपासु ते दील्लीपर्यंत सरकारी अधिकारी राजकिय व्यवस्थेच बाहुल होऊन काम करतात आणि यामधे पिळला जाठतो सामान्य नागरीक.
विचार करा जवळपास ७० ते ८०% जनता दिवसाला ५०० रूपये कमवत नाही आणि एक IV सेट मधिल कमाई.
ही सर्वच औषधांची कहानी.
हे गेली कित्तेक वर्ष चालू आहे. १० रू च्या वस्तुवर ४०० किंवा ५०० रूपये किंमत कशी छापली जाऊ शकते???
मोदीसाहेब जे जनरीक स्वस्त म्हणतात तिथे पण काही वेगळी परिस्थीती नाही. जे अरोग्य व्यवसायाशी संमंधीत आहेत त्याना सर्व माहित आहे.
ही गरीबांची पिळवनुक आहे,
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    19 min ago
  • महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!” कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे." "महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला. दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.
    1
    महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!”
कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे."
"महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला.
दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.
    user_SM Rokhthok News
    SM Rokhthok News
    Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांनी उजनी धरणातून कॅनल द्वारे तुळशी गावाला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे
    1
    ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू 
ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांनी उजनी धरणातून कॅनल द्वारे तुळशी गावाला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे
    user_प्रताप शेळके
    प्रताप शेळके
    Farmer मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार
    1
    बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • डोळ्यात अंजन घालून बघण्यासारखा खूप अप्रतिम व्हिडिओ कृतज्ञता सदगुरुराया, तुम्ही आम्हाला देव पाहण्याची आणि तो अनुभवण्याची दृष्टी दिली
    1
    डोळ्यात अंजन घालून बघण्यासारखा खूप अप्रतिम व्हिडिओ  
कृतज्ञता सदगुरुराया, 
तुम्ही आम्हाला देव पाहण्याची आणि तो अनुभवण्याची दृष्टी दिली
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    28 min ago
  • आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
    1
    आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात

आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता.
१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी
घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.