logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मराठवाडा हायस्कूलमध्ये छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त बलिदान मास साजरा परभणी (प्रतिनिधी) : “जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले आणि देश-धर्मासाठी मरावे कसे हे छत्रपती संभाजी महाराज यांनी जगाला दाखवून दिले,” असे प्रेरणादायी विचार प्रमुख वक्ते शिवप्रसाद कोरे यांनी व्यक्त केले. नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूल, शिवाजीनगर (परभणी) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बलिदान मास कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक शिवाजी आरळकर होते. यावेळी पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील, सहाय्यक पर्यवेक्षक सुनील रामपूरकर, सहाय्यक पर्यवेक्षक नंदकिशोर साळवे तसेच विद्यार्थी संसदेचे प्रतिनिधी श्रीपाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते शिवप्रसाद कोरे यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रम, शौर्य आणि त्यागमय जीवनाचा सविस्तर आढावा घेतला. शंभूराजे हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर स्वाभिमान, विद्वत्ता आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक होते. स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला त्यांनी निर्भयपणे सामोरे जात मुघल बादशहा औरंगजेब यांच्या प्रबळ साम्राज्याशी धैर्याने सामना केला, असे त्यांनी सांगितले. तसेच धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्य रक्षणासाठी शंभूराजांनी अमानुष अत्याचार सहन केले; मात्र धर्मांतर स्वीकारले नाही. त्यामुळे त्यांचे बलिदान इतिहासात अद्वितीय असल्याचे कोरे यांनी नमूद केले. शंभूराजांनी लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ त्यांच्या विद्वत्तेचा पुरावा असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी पर्यवेक्षक शिवाजी आरळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणामंत्र दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीपाद कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल धानोरकर, प्रदीप मुळे, श्री बिरादार, गणेश सूर्यवंशी, सुनील तुरुकमाने, गोपाळ रोडे, अविनाश जाधव, विनोद लोलगे, गणेश काळबांडे, गिरीश देशपांडे, अभिजीत कुलकर्णी, संजय नागरे, सुडके, सुधाकर रेडगे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रम, शौर्य व बलिदानाबद्दल अभिमान आणि प्रेरणा निर्माण झाली.

2 hrs ago
user_Kapil Ashokrao Shinde
Kapil Ashokrao Shinde
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
2 hrs ago
32e91374-bd54-4621-96d7-39f4b9c90af0

More news from Maharashtra and nearby areas
  • *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*
    1
    *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    17 hrs ago
  • तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    1
    तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जालना शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करण मोरे (वय १८, रा. खरपुडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक कोचिंग क्लासच्या इमारतीवर टँकरद्वारे पाणी चढवण्याचे काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातही गर्दी केली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
    1
    जालना शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
करण मोरे (वय १८, रा. खरपुडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक कोचिंग क्लासच्या इमारतीवर टँकरद्वारे पाणी चढवण्याचे काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातही गर्दी केली.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    12 min ago
  • पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण. वडवणी प्रतिनिधी- ​वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. ​तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा. ​पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    1
    पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण.
वडवणी प्रतिनिधी- 
​वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा  बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे.
​तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा.
​पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    1 hr ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    23 min ago
  • Post by गंगाधर जक्कुलवार
    1
    Post by गंगाधर जक्कुलवार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 🚩 पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩 हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव दत्त संस्थान येथे २० ते २७ मार्च २०२६ दरम्यान श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार आहे. यापूर्वी परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 🙏 #Himayatnagar #Pimpalgaon #RamKatha #DattYagya #NamSankirtan ReligiousEvent Maharashtra SpiritualProgram Bhakti SanatanDharma 🚩🙏
    1
    🚩 पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩
हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव दत्त संस्थान येथे २० ते २७ मार्च २०२६ दरम्यान श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार आहे.
यापूर्वी परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 🙏
#Himayatnagar #Pimpalgaon #RamKatha #DattYagya #NamSankirtan ReligiousEvent Maharashtra SpiritualProgram Bhakti SanatanDharma 🚩🙏
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    9 hrs ago
  • सोनपेठ पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या निकिता अवचारे यांची निवड : उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख
    1
    सोनपेठ पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या निकिता अवचारे यांची निवड : उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.