बुलडाणा/बुलढाण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. प्रवीणकुमार देवरे; डॉ. किरण पाटील यांची पुण्याला बदली राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर एक मोठी खांदेपालट केली असून बुलढाणा जिल्ह्याला आता नवीन जिल्हाधिकारी मिळाले आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले डॉ. किरण पाटील यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी आता डॉ. प्रवीणकुमार देवरे बुलढाण्याचे नवे सारथ्य करणार आहेत. काय आहे हा संपूर्ण बदल, पाहूया या विशेष वृत्तात. राज्य शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची पुणे येथे 'पशुसंवर्धन आयुक्त' म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे येथूनच डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची वर्णी लागली आहे. डॉ. देवरे हे यापूर्वी पुण्यात पशुसंवर्धन आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता ही दोन्ही पदे एकमेकांकडे हस्तांतरित झाली आहेत.विशेष म्हणजे, डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्यासाठी बुलढाणा जिल्हा नवीन नाही. २००५ मध्ये त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात महसूल अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. जिल्ह्याचा भौगोलिक आणि प्रशासकीय आवाका त्यांना आधीपासूनच माहित असल्याने, त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला गतीने मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शासकीय नियमानुसार, दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार तातडीने एकमेकांकडे सोपवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. डॉ. किरण पाटील यांनी आपल्या कार्यकाळात बुलढाण्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते, त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.डॉ. देवरे यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या प्रशासनाला आता कोणती नवी दिशा मिळणार? प्रलंबित प्रकल्प आणि जनसामान्यांचे प्रश्न ते कसे मार्गी लावणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बुलडाणा/बुलढाण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. प्रवीणकुमार देवरे; डॉ. किरण पाटील यांची पुण्याला बदली राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर एक मोठी खांदेपालट केली असून बुलढाणा जिल्ह्याला आता नवीन जिल्हाधिकारी मिळाले आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले डॉ. किरण पाटील यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी आता डॉ. प्रवीणकुमार देवरे बुलढाण्याचे नवे सारथ्य करणार आहेत. काय आहे हा संपूर्ण बदल, पाहूया या विशेष वृत्तात. राज्य शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची पुणे येथे 'पशुसंवर्धन आयुक्त' म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे येथूनच डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची वर्णी लागली आहे. डॉ. देवरे हे यापूर्वी पुण्यात पशुसंवर्धन आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता ही दोन्ही पदे एकमेकांकडे हस्तांतरित झाली आहेत.विशेष म्हणजे, डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्यासाठी बुलढाणा जिल्हा नवीन नाही. २००५ मध्ये त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात महसूल अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. जिल्ह्याचा भौगोलिक आणि प्रशासकीय आवाका त्यांना आधीपासूनच माहित असल्याने, त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला गतीने मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शासकीय नियमानुसार, दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार तातडीने एकमेकांकडे सोपवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. डॉ. किरण पाटील यांनी आपल्या कार्यकाळात बुलढाण्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते, त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.डॉ. देवरे यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या प्रशासनाला आता कोणती नवी दिशा मिळणार? प्रलंबित प्रकल्प आणि जनसामान्यांचे प्रश्न ते कसे मार्गी लावणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
- राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर एक मोठी खांदेपालट केली असून बुलढाणा जिल्ह्याला आता नवीन जिल्हाधिकारी मिळाले आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले डॉ. किरण पाटील यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी आता डॉ. प्रवीणकुमार देवरे बुलढाण्याचे नवे सारथ्य करणार आहेत. काय आहे हा संपूर्ण बदल, पाहूया या विशेष वृत्तात. राज्य शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची पुणे येथे 'पशुसंवर्धन आयुक्त' म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे येथूनच डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची वर्णी लागली आहे. डॉ. देवरे हे यापूर्वी पुण्यात पशुसंवर्धन आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता ही दोन्ही पदे एकमेकांकडे हस्तांतरित झाली आहेत.विशेष म्हणजे, डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्यासाठी बुलढाणा जिल्हा नवीन नाही. २००५ मध्ये त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात महसूल अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. जिल्ह्याचा भौगोलिक आणि प्रशासकीय आवाका त्यांना आधीपासूनच माहित असल्याने, त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला गतीने मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शासकीय नियमानुसार, दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार तातडीने एकमेकांकडे सोपवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. डॉ. किरण पाटील यांनी आपल्या कार्यकाळात बुलढाण्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते, त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.डॉ. देवरे यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या प्रशासनाला आता कोणती नवी दिशा मिळणार? प्रलंबित प्रकल्प आणि जनसामान्यांचे प्रश्न ते कसे मार्गी लावणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- उकळी ग्रामपंचायत कारभारावर सवाल; अमोल बोरे यांचे अर्धनग्न आंदोलन.. कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा; प्रशासनासमोर वाढले आव्हान... मेहकर :-पंचायत समिती अंतर्गत उकळी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात अमोल बोरे यांनी पंचायत समिती समोर अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.... ग्रामसेवक दारूच्या नशेत कार्यालयात येत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, गरिबाकडून घकुलासाठी 10 हजार रुपयाची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा करण्यात आलाय.. या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, संबंधित ग्रामसेवकावर कारवाई न झाल्यास सहपरिवार आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे...1
- 🔥 पतसंस्थाओं का काला बाजार: मजबूरी या लूट? 🔥 17% ब्याज का जाल! सच्चाई जानकर दंग रह जाओगे 🔥 लाइसेंस के नाम पर लूट! DDR ऑफिस की बड़ी सच्चाई 🔥 बैंक vs पतसंस्था: कौन कर रहा है जनता के साथ धोखा? 🔥 गरीब फंसा कर्ज के जाल में! असली खेल अब सामने 🔥 12% vs 17% ब्याज! आखिर सच क्या है? 🔥 पतसंस्था का काला सच | जनता क्यों हो रही बर्बाद? 🔥 DDR ऑफिस के नीचे क्या चल रहा है? 🔥 कर्ज के नाम पर ठगी! पूरा सिस्टम एक्सपोज 🔥 इन्कलाब 24 न्यूज की बड़ी पड़ताल | सच देखकर चौंक जाओगे #पतसंस्था #कर्ज #ब्याज #17प्रतिशत #लूट #बैंक #DDR #सरकारी_सिस्टम #FinancialScam #LoanTrap #BreakingNews #Inquilab24News #IndiaNews #Corruption #BlackTruth #ViralNews #YouTubeIndia #TrendingNow #Expose #Finance #MoneyTrap #LoanScam #PublicVoice #Justice #IndianEconomy #RealityCheck #NewsUpdate #HindiNews #ViralVideo #TruthRevealed1
- Post by Ashish yada Ashish yadav ashish yadav1
- खामगाव: एकमेव आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पुरातन खंडोबा मंदिराचा यात्रा महोत्सव आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या १५० वर्षांपासून जोपासली जाणारी '१२ गाड्या ओढण्याची' परंपरा यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पार पडली. बुलढाणा जिल्ह्यात विशेष महत्त्व आहे. नवसाला पावणारा खंडोबा अशी या मंदिराची ख्याती असून, सायंकाळी कमल सिंह गौतम चौकातून १२ बैलगाड्या ओढण्याचा थरारक सोहळा पार पडला. गडकरी भक्तगणांनी श्रद्धेपोटी आणि आपला नवस फेडण्यासाठी या बैलगाड्या ओढल्या. ही परंपरा अबाधित ठेवण्यासाठी गडकरी बांधवांचा यावेळी विशेष सन्मान व विधीवत पूजन करण्यात आले. या उत्सवासाठी ९ दिवस आधी खंडोबा मंदिरात घटाची स्थापना करण्यात आली होती. या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जयंतीच्या दिवशी या महोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडला. तत्पूर्वी मंदिरात गडकऱ्यांचा हळद लावण्याचा सोहळा आणि शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. खामगावच्या जगदंबा रोड, महात्मा बसवेश्वर चौक परिसरात हा उत्सव साजरा झाला. विशेष म्हणजे ऐतिहासिक शांती महोत्सवाच्या (मोठी देवी) परिसरातच हा महोत्सव होत असल्याने याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या महोत्सवात सर्व धर्मीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून खामगावच्या सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता खंडोबा यात्रा महोत्सव समितीच्या वतीने दर्शनासाठी मंदिर सलग २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खामगाव शहरासह जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात खंडोबाचे दर्शन घेतले.खंडोबा मंडळाने ही दीडशे वर्षांची परंपरा आणखीही कायम ठेवली आहे.1
- अंजनगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; तिसऱ्या दिवशीही तणाव कायम सोलापूर (माढा तालुका), ३ एप्रिल २०२६ — सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेमुळे मराठा आणि धनगर समाजात निर्माण झालेला वाद तिसऱ्या दिवशीही शमलेला नाही. गावात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जमावबंदी लागू करण्यात आली असून, दगडफेक आणि लाठीचार्जच्या घटनाही घडल्या आहेत. वादाची पार्श्वभूमी खेलोबा मंदिर परिसरात (पालखी मार्गावर) मंगळवारी रात्री अंधारात पुतळा बसवण्यात आला. धनगर समाजाकडून याला तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, देवस्थानच्या २० गुंठे जागेवर अतिक्रमण झाले असून, पालखी मार्ग अडवला जाईल. त्यामुळे पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे. मराठा समाजाकडून मात्र पुतळा सन्मानाने ठेवण्याची भूमिका घेण्यात आली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पूजा-अर्चा करण्याच्या मुद्द्यावर दोन्ही गट आमने-सामने आले. संतप्त जमावाने तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली. मोजमाप (सर्व्हे) सुरू असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर धाव घेतल्याचेही दिसले. गोपीचंद पडळकरांची आक्रमक भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “खेलोबा मंदिरालगत चुकीच्या पद्धतीने (रात्री अंधारात) पुतळा बसवणे कदापि सहन केले जाणार नाही. पुतळा बसवायची जबाबदारी माझ्यावर सोपवा — वाजत-गाजत, दिवसा सन्मानाने बसवू.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत “सात गुंठे जागा उपलब्ध आहे, तिथे पुतळा बसवू” असे सूचित केल्याचे पडळकर यांनी सांगितले. त्यांनी यात राजकारण सुरू असल्याचा आरोपही केला. या वक्तव्यानंतर काही मराठा आंदोलकांनी पडळकरांची “जीभ घसरली” अशी टीका केली. लक्ष्मण हाके यांची भूमिका धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन तीव्र केले. “छत्रपतींच्या पुतळ्याला नव्हे, त्या जागेला विरोध आहे,” असे सांगत त्यांनी पुतळा हटवण्यावर ठाम राहिले. “गोळ्या घातल्या तरी माघार नाही,” असेही त्यांनी म्हटले. आज मोजणी सुरू असताना हाके यांनी बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. इतर प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही समाजांना शांतता राखण्याचे आवाहन केले. प्रशासन दोन्ही बाजूंसोबत चर्चा करत आहे, पण तोडगा अद्याप निघालेला नाही. गावातील काही स्थानिकांनी “सर्व समाज मंदिराचे भक्त आहेत, जातीय तेढ कशी निर्माण झाली?” असा प्रश्न उपस्थित केला. शिवराय हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्यावरून समाजात भांडणे होणे आणि राजकीय रंग चढणे हे दुर्दैवी आहे. दोन्ही समाजांनी शांतता राखून, प्रशासनाच्या माध्यमातून योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- भोकरदन येथे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थित मध्ये प्रसिद्ध व्यापारी अय्युब सेठ बेग, मंजूर सेठ बेग यांच्या निवास्थानी ईद स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न1
- बुलढाणा शहरात सध्या महामानवांच्या जयंतीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात चार दिवसीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा २०२६ च्या वतीने या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत पार पडणार असून, यामध्ये वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी बुलढाणेकरांना मिळणार आहे. कार्यक्रमाचे वेळापत्रक: ११ एप्रिल: सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम १२ एप्रिल: प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांचे विशेष व्याख्यान. १३ एप्रिल: संतोष जोंधळे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम. १४ एप्रिल: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे शहरातून भव्य आणि शांततामय मिरवणूक काढली जाणार आहे. या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन समितीचे अध्यक्ष पवन भालेराव यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे. नुकतेच या महोत्सवाच्या प्रचार रथाचे भव्य उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना पवन भालेराव यांनी सांगितले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 'जातीमुक्त देशाच्या' स्वप्नाला अनुसरून, सर्वधर्मसमभावाच्या विचाराने ही जयंती साजरी केली जाणार आहे.त्यांनी शहर आणि परिसरातील सर्व समाज बांधवांना आणि नागरिकांना या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने आणि शांततेने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्स्प्रेस1