logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरंजे,उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध,आवाडे गटाचे वर्चस्व  हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरंजे,उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध,आवाडे गटाचे वर्चस्व  कुंभोज / प्रतिनिधी हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या आवाडे गटाच्या कट्टर समर्थक अश्विनी अनिल बिरंजे यांची बिनविरोध निवड झाली.तर आळते पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेले इंगवले गटाचे समर्थक संतोष कांबळे (शिवसेना शिंदे गट) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.सभापती पदासाठी अश्विनी बिरंजे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.त्यानंतर उपसभापती पदासाठी संतोष कांबळे यांच्या नावावर सदस्यांनी एकमत दर्शविल्याने त्यांची निवड निश्चित झाली.या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी काम पाहिले.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर,आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले,राजू इंगवले,किरण इंगवले, झाकीर भालदार,वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, राजेश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर नूतन सभापती अश्विनी बिरंजे व उपसभापती संतोष कांबळे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.पंचायत समिती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान,या निवड प्रक्रियेनंतर जनसुराज्य पक्षाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

1 day ago
user_आमची मराठी.com
आमची मराठी.com
शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
1 day ago

हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरंजे,उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध,आवाडे गटाचे वर्चस्व  हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरंजे,उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध,आवाडे गटाचे वर्चस्व  कुंभोज / प्रतिनिधी हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या आवाडे गटाच्या कट्टर समर्थक अश्विनी अनिल बिरंजे यांची बिनविरोध निवड झाली.तर आळते पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेले इंगवले गटाचे समर्थक संतोष कांबळे (शिवसेना शिंदे गट) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.सभापती पदासाठी अश्विनी बिरंजे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.त्यानंतर उपसभापती पदासाठी संतोष कांबळे यांच्या नावावर सदस्यांनी एकमत दर्शविल्याने त्यांची निवड निश्चित झाली.या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी काम पाहिले.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर,आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले,राजू इंगवले,किरण इंगवले, झाकीर भालदार,वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, राजेश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर नूतन सभापती अश्विनी बिरंजे व उपसभापती संतोष कांबळे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.पंचायत समिती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान,या निवड प्रक्रियेनंतर जनसुराज्य पक्षाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर विकासाबाबत संभ्रम; सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न कोल्हापूर / प्रतिनिधी  मुंबई शहराचे “फुप्फुस” मानल्या जाणाऱ्या मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जागेच्या विकासाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला.आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करत या मोठ्या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगितले. मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जमिनीवर विकासकामे सुरू असून या ठिकाणी नेमक्या कोणत्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी अधिवेशनात नमूद केले.या संदर्भात त्यांनी राज्य सरकारने नागरिकांसाठी खुली सुनावणी आयोजित करावी किंवा प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या या हरित क्षेत्राचा आराखडा पारदर्शकपणे लोकांसमोर यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबई सेंट्रल पार्क विकसित करताना नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील आणि या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण होणार नसल्याचा स्पष्ट खुलासा सामंत यांनी केला. पार्कचा विकास हा पर्यावरणपूरक आणि नागरिकांना खुला असा करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मोठे हरित क्षेत्र उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या 295 एकर जागेचा विकास कशा स्वरूपात होणार याकडे आता नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचेही लक्ष लागले आहे.
    1
    मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर विकासाबाबत संभ्रम; सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न
कोल्हापूर / प्रतिनिधी 
मुंबई शहराचे “फुप्फुस” मानल्या जाणाऱ्या मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जागेच्या विकासाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला.आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करत या मोठ्या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगितले.
मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जमिनीवर विकासकामे सुरू असून या ठिकाणी नेमक्या कोणत्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी अधिवेशनात नमूद केले.या संदर्भात त्यांनी राज्य सरकारने नागरिकांसाठी खुली सुनावणी आयोजित करावी किंवा प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या या हरित क्षेत्राचा आराखडा पारदर्शकपणे लोकांसमोर यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबई सेंट्रल पार्क विकसित करताना नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील आणि या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच या प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण होणार नसल्याचा स्पष्ट खुलासा सामंत यांनी केला. पार्कचा विकास हा पर्यावरणपूरक आणि नागरिकांना खुला असा करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मोठे हरित क्षेत्र उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या 295 एकर जागेचा विकास कशा स्वरूपात होणार याकडे आता नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचेही लक्ष लागले आहे.
    user_आमची मराठी.com
    आमची मराठी.com
    शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • कोल्हापूर : रविराज कांबळे अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता कोल्हापुरातही उमटताना दिसत आहेत. शहरातील विविध गॅस एजन्सींच्या बाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.संभाव्य गॅस टंचाईच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सिलेंडर घेण्यासाठी एजन्सींकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा जाणवणार नसून पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    1
    कोल्हापूर : रविराज कांबळे 
अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता कोल्हापुरातही उमटताना दिसत आहेत. शहरातील विविध गॅस एजन्सींच्या बाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.संभाव्य गॅस टंचाईच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सिलेंडर घेण्यासाठी एजन्सींकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा जाणवणार नसून पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रफुल्लित केंद्रामार्फत कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे प्रेरणादायी उपक्रम पार पडला. यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शाळेला दोन सीलिंग फॅन भेट दिले. तसेच प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांचा ‘पद्मश्री ग्लोबल एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
    2
    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रफुल्लित केंद्रामार्फत कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे प्रेरणादायी उपक्रम पार पडला. यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शाळेला दोन सीलिंग फॅन भेट दिले. तसेच प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांचा ‘पद्मश्री ग्लोबल एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज
    1
    Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज
    user_सारथी महाराष्ट्राचा न्यूज
    सारथी महाराष्ट्राचा न्यूज
    Voice of people जत, सांगली, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • सोलापूर : ज्योती वाघमारे यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहित नव्हते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावावरून त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. मात्र, त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहीत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवशी त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल माहीत झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
    1
    सोलापूर : ज्योती वाघमारे यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहित नव्हते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावावरून त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. मात्र, त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहीत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवशी त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल माहीत झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    user_युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते
    1
    सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे  सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही.
यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • कोल्हापूर ता.11 :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी विशाल किरण शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित चंद्रकांत जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.कौसर इस्माईल बागवान, तर उप-सभापतीपदी सौ.दिपा अजित ठाणेकर यांची निवड आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजीत विशेष बैठकीत करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. स्थायी समिती सभापतीपदासाठी नगरसेवक विशाल शिराळे व अमर प्रणव समर्थ यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी दिलेल्या 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर स्थायी समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये किरण शिराळे यांना 9 मते तर अमर समर्थ 7 मते पडली. किरण शिराळे यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन स्थायी समिती सभापती हे प्रभाग क्र.7-अ या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. परिवहन समिती सभापतीपदासाठी नगरसेवक सत्यजित चंद्रकात जाधव व दुर्वास परशुराम कदम यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी दिलेल्या 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर परिवहन समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सत्यजित जाधव यांना 8 मते तर दुर्वास कदम यांना 5 मते पडली. सत्यजित जाधव यांना सर्वाधिक मते पडल्याने त्यांची परिवहन समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन परिवहन समिती सभापती हे प्रभाग क्र.11 -क या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी नगरसेविका सौ.कौसर इस्माइल बागवान व सौ.जयश्री धनाजी कांबळे यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सौ.कौसर बागवान यांना 5 मते तर सौ.जयश्री कांबळे यांना 4 मते पडली. सौ.कौसर बागवान यांना सर्वाधिक मते पडल्याने त्यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन महिला व बालकल्याण समिती सभापती हे प्रभाग क्र.18-ब या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. महिला व बालकल्याण समिती उप-सभापतीपदासाठी नगरसेविका सौ.दिपा अजित ठाणेकर व सौ.अरुणा विशाल गवळी यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सौ.दिपा ठाणेकर यांना 5 मते तर सौ.अरुणा गवळी यांना 4 मते पडली. सौ.दिपा ठाणेकर यांना सर्वाधिक 5 मते पडल्याने त्यांची महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन महिला व बालकल्याण समिती उपसभापती हे प्रभाग क्र.7-ब या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. यावेळी आयुक्त के.मंजूलक्ष्मी, पीठासन अधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अधिकारी, नगरसेवक/नगरसेविका यांनी नुतन स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मुख्य लेखापाल संजय सरनाईक, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, परवाना अधिक्षक अशोक यादव, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी उपस्थित होते. 00000000000000
    2
    कोल्हापूर ता.11 :- कोल्हापूर
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी विशाल किरण शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित चंद्रकांत जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.कौसर इस्माईल बागवान, तर उप-सभापतीपदी सौ.दिपा अजित ठाणेकर यांची निवड आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजीत विशेष बैठकीत करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. 
स्थायी समिती सभापतीपदासाठी नगरसेवक विशाल शिराळे व अमर प्रणव समर्थ यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी दिलेल्या 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर स्थायी समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये किरण शिराळे यांना 9 मते तर अमर समर्थ 7 मते पडली. किरण शिराळे यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन स्थायी समिती सभापती हे प्रभाग क्र.7-अ या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.  
परिवहन समिती सभापतीपदासाठी नगरसेवक सत्यजित चंद्रकात जाधव व दुर्वास परशुराम कदम यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी दिलेल्या 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर परिवहन समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सत्यजित जाधव यांना 8 मते तर दुर्वास कदम यांना 5 मते पडली. सत्यजित जाधव यांना सर्वाधिक मते पडल्याने त्यांची परिवहन समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन परिवहन समिती सभापती हे प्रभाग क्र.11 -क या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. 
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी नगरसेविका सौ.कौसर इस्माइल बागवान व सौ.जयश्री धनाजी कांबळे यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सौ.कौसर बागवान यांना 5 मते तर सौ.जयश्री कांबळे यांना 4 मते पडली. सौ.कौसर बागवान यांना सर्वाधिक मते पडल्याने त्यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन महिला व बालकल्याण समिती सभापती हे प्रभाग क्र.18-ब या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. 
महिला व बालकल्याण समिती उप-सभापतीपदासाठी नगरसेविका सौ.दिपा अजित ठाणेकर व सौ.अरुणा विशाल गवळी यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सौ.दिपा ठाणेकर यांना 5 मते तर सौ.अरुणा गवळी यांना 4 मते पडली. सौ.दिपा ठाणेकर यांना सर्वाधिक 5 मते पडल्याने त्यांची महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन महिला व बालकल्याण समिती उपसभापती हे प्रभाग क्र.7-ब या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. 
यावेळी आयुक्त के.मंजूलक्ष्मी, पीठासन अधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अधिकारी, नगरसेवक/नगरसेविका यांनी नुतन स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मुख्य लेखापाल संजय सरनाईक, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, परवाना अधिक्षक अशोक यादव, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी उपस्थित होते.  
00000000000000
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.