Shuru
Apke Nagar Ki App…
जात पडताळणीच्या अन्यायाविरोधात कोळी समाज आक्रमक; समिती कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मराठवाड्यातील कोळी महादेव व कोळी मल्हार जमात बांधवांनी जात पडताळणी समितीच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध प्रकरणांमध्ये जात पडताळणी करताना अन्याय होत असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगर येथे समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास समिती कार्यालयावर टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
Marathi News Point
जात पडताळणीच्या अन्यायाविरोधात कोळी समाज आक्रमक; समिती कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मराठवाड्यातील कोळी महादेव व कोळी मल्हार जमात बांधवांनी जात पडताळणी समितीच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध प्रकरणांमध्ये जात पडताळणी करताना अन्याय होत असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगर येथे समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास समिती कार्यालयावर टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाज नगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले, पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापासून ऑनलाईन अर्ज भरून, अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती।लक्षात येताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. तसेच कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचे ठोकून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित 'थर्ड पार्टी' कंपनीही हात वर करत "आम्हाला काहीच माहिती नाही, असं सांगत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. Byte : विद्यार्थी3
- खाटू श्याम देवस्थान या ठिकाणी भाविकांची अफाट गर्दी जिल्हाभरातून आलेल्या भाविकांनी छत्रपती संभाजी नगर: येथील खाटू श्याम देवस्थान या ठिकाणी आज रविवार रोजी भाविकांनी अफाट गर्दी केली दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या या ठिकाणी जिल्हाभरातून नाहीतर महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येतात..2
- महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करून सुरक्षा हटविण्याची मागणी, *अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस सुरक्षा हटविण्याची मागणी* *महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा* छत्रपती संभाजीनगर येथे अभिजित दिपके यांनी त्यांच्या घरी एका पोलीस अधिकारी यांचे अपमान केल्याने त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली, (CJP) कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी त्यांच्या घरी संरक्षण करत असलेले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साध्या गणवेशात असलेले PSI सुरेश सांगळे यांना मी कोणाला भेटू, कोणाला भेटू नये सांगणारे तुम्ही कोण, तुम्ही दिल्ली पोलीसांसारखे वागू नका, म्हणत अपनास्पद वागणूक देत बाहेर जाण्याचे सांगितले, अभिजित दिपके यांनी PSI यांचा अपमान केल्याबद्दल दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्या घरासमोर पोलीस प्रोटेक्शनानुसार त्यांना दिले जात असलेले संरक्षण काढून घेण्यात यावे असे निवेदन पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने दिले आहे, निवेदनात पुढे असे ही सांगितले आहे की पोलीस कर्मचारी यांना अरेरावीची भाषा करणारे अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना कमिशनर ऑफिस समोर व पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आंदोलन व चक्काजाम करण्यात येईल असे निवेदन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे जिल्हा युवक अध्यक्ष शंकर उर्फ अण्णा डरांगे यांनी दिला, *रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा*1
- सुनील तटकरेंबाबत रुपाली ठोंबरेचं खळबळजनक विधान. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? रुपाली ठोंबरे यांनी नेमका काय दावा केलाय.?1
- क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा: पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडून ५ मार्गदर्शक सूचना जाहीर1
- ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचे मनोज जरांगे, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर गंभीर आरोप मुख्य पॉइंटर्स : जात पडताळणी समित्यांच्या कामाबाबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे वैध ठरली असून, त्यापैकी केवळ काही प्रमाणपत्रे रद्द झाल्याचा दावा वाघमारे यांनी केला. वंशावळीत दिशाभूल करून जात पडताळणी प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचे आढळल्याने संबंधित प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले. “अत्यल्प प्रमाणपत्रे रद्द झाली असताना मनोज जरांगे-पाटील या मुद्द्याचा कांगावा करत आहेत,” असा आरोप वाघमारे यांनी केला. जरांगे हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःचे हित साधण्यासाठी समाजाची दिशाभूल करत असल्याचा दावा. ओबीसींची अवैध प्रमाणपत्रे ठरवली जात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. ओबीसी-मराठा समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा वाघमारे यांचा आरोप. “महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या प्रयत्नात कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तलवारीची किंवा कोयत्याची भाषा करणाऱ्यांवर गृह विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी. या परिस्थितीसाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा वाघमारे यांनी दिला. उदय सामंत आणि प्रसाद लाड हे जरांगे यांच्या आंदोलनाला ताकद देत असल्याचा आरोप. “उदय सामंत सांगतील तसे जरांगे नाचत आहेत,” असा घणाघाती आरोप वाघमारे यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी. मनोज जरांगे यांनी १९९४ च्या जीआरचा मुद्दा उपस्थित केला असल्यास तो रद्द करून दाखवावा, असे आव्हान वाघमारे यांनी दिले. ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाला लक्ष्य करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप. महसूल विभागाचे काम करणारे चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा वाघमारे यांनी केला. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींवर टीका करताना वैयक्तिक किंवा अवमानकारक भाषा वापरणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. “आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; मात्र आंदोलनाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करू नये,” असे वाघमारे म्हणाले. वाशी येथे झालेल्या आंदोलनाच्या संदर्भातही वाघमारे यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आंदोलनादरम्यान सरकारचे कौतुक करणे आणि नंतर पुन्हा सरकारवर टीका करणे, यावर त्यांनी सवाल उपस्थित केला. जरांगे यांच्या आंदोलनामागे ठोस भूमिका नसून “स्क्रिप्टेड आंदोलन” असल्याचा गंभीर आरोप. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. “ओबीसी-मराठा संघर्ष निर्माण झाला तर त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील,” असा इशारा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थिती गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी वाघमारे यांची मागणी. संभाव्य हेडलाईन “ओबीसी-मराठा वाद पेटवण्याचा प्रयत्न; जरांगे, सामंत आणि लाडांवर नवनाथ वाघमारेंचे गंभीर आरोप” सबहेड “तलवारीची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे” — नवनाथ वाघमारे1
- छत्रपती संभाजीनगर-मुलीला बॅड टच, १० आणि ११ वर्षांच्या भावांनी आरोपीला चोपले छत्रपती संभाजीनगर मुलीला बॅड टच, १० आणि ११ वर्षांच्या भावांनी आरोपीला चोपले ANC : आई कामावर गेल्याची संधी साधून घरात एकटी असलेल्या १३ वर्षीय मुलीकडे तंबाखू मागण्याच्या बहाण्याने शेजारी राहणारा ३५ वर्षीय व्यक्ती घरात शिरला. तंबाखूची पुडी घेताना त्याने मुलीचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिच्या १० आणि ११ वर्षांच्या भावांनी धाव घेत आरोपीला मारहाण केली. त्यामुळे आरोपी घरातून पळून गेला. सिटी चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर रात्री पोलिसांत फिर्याद देण्यात आली. घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. VIS - सिटी चौक पोलिस स्टेशन1