रिसोड येथे जमात-ए-इस्लामी हिंद युथ मुव्हमेंटच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद... रिसोड येथे जमात-ए-इस्लामी हिंद युथ मुव्हमेंटच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९६ रक्तदात्यांचे रक्तदान ६ महिलांचा सहभाग ठरला विशेष आकर्षण; ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त गुलशन-ए-आशिया इंग्लिश स्कूलमध्ये आयोजन रिसोड : ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त जमात-ए-इस्लामी हिंद युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रिसोड शहरातील चांदणी चौक परिसरातील गुलशन-ए-आशिया इंग्लिश स्कूलमध्ये २६ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ९६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात ६ महिलांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. महिलांचा सहभाग हे यंदाच्या शिबिराचे विशेष आकर्षण ठरले असून उपस्थितांमध्ये त्याची चर्चा झाली. सामाजिक बांधिलकी जपत महिलांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतल्याचे यावेळी दिसून आले.रक्तदान शिबिराला रिसोडचे नगराध्यक्ष भगवानदादा क्षीरसागर, रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण, तसेच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून समाजहिताचे कार्य पुढे नेले जात असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या जम्बो रक्तदान शिबिरासाठी जमात-ए-इस्लामी हिंदचे पदाधिकारी, युथ मुव्हमेंटचे कार्यकर्ते व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. रक्तदात्यांची नोंदणी, मार्गदर्शन, व्यवस्था आणि शिबिराचे नियोजन यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याने शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.रक्तदान हे जीवनदान या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद सामाजिक एकतेचे आणि सेवाभावाचे उदाहरण ठरला. ९६ रक्तदात्यांनी केलेले रक्तदान आणि त्यामध्ये सहभागी झालेल्या ६ महिलांचा सहभाग यामुळे यंदाचे शिबिर विशेष ठरले. रक्तदान शिबिराला भेट देण्यात साठी आलेल्या मान्यवरांचे जमात ऐ इस्लामी हिंद च्या वतीने पुष्पगुच्छ व प्रेषित महंमद पैगंबर यांच्या जीवन विषयावर आधारित पुस्तक देऊन सन्मान सत्कार करण्यात आले. सदर शिबिरासाठी सौ कांता देवी डाळे रक्तपेढी वाशिम यांच्याकडून डॉ दिगंबर निरगुडे पाटील, गणेश चंद्रशेखर,जीवन वानखेडे, गणेश गडकर, अक्षय पिंपळे,अभिजीत जावळे यांनी रक्त संकलन केले

- जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती1
- सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते1
- साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय! १० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा1
- नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .1
- माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार1
- 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट1
- ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.4
- मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे1