logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्ह्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी; विकासाला गती- पालकमंत्री मकरंद जाधव पाटील जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे १ मे महाराष्ट्राच्या ६७ व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना" जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे. कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन, शेततळे, फळबाग लागवड आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना दिली जात आहे. "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी"योजनेद्वारेही शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळत आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात "नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन" अंतर्गत चारा विकास प्रकल्प सुरू करण्यात आला असून, शेळीपालन व कुक्कुटपालन प्रकल्पांमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होत आहे. औद्योगिक क्षेत्रात जिल्ह्यात १ लाख १६ हजार ६२८ उद्यम नोंदणी होऊन २ लाख ४८ हजारांहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. निर्यात क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर असून, जानेवारी २०२६ अखेरपर्यंत ८६८ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. नवीन उद्योग, वाढती गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती यामुळे जिल्ह्याची आर्थिक घडी अधिक मजबूत होत आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आपण १०० टक्के लक्षांक पूर्ण केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून ७२९ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. सध्या १८ गावांना टँकरद्वारे तर ५९ गावांना विहीर अधिग्रहणातून पाणीपुरवठा केला जात आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ३०० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. "प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २" अंतर्गत १ लाख ३ हजार ५३७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात घरे पूर्ण झाली आहेत. महिला सक्षमीकरणासाठी "उमेद" अभियानांतर्गत २४ हजार स्वयं सहायता समूह स्थापन करून २ लाख २६ हजार कुटुंबांना जोडण्यात आले आहे. तसेच २ लाख ५२ हजारांहून अधिक "लखपती दीदी" निर्माण करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रात "माझे गाव आरोग्य संपन्न गाव" मोहिमेद्वारे ग्रामस्तरावर आरोग्य सेवा मजबूत करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि विविध योजनांद्वारे सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. डिजिटल सेवांमुळे शासन आणि नागरिकांमधील दरी कमी होत असून ऑनलाईन सेवा, सहज प्रणाली आणि चॅटबॉट्समुळे पारदर्शकता वाढत आहे. तसेच "महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण-२०२६" अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगारनिर्मिती होणार आहे. क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले असून, आर्चरी प्रशिक्षण केंद्रासारख्या सुविधा विकसित करण्यात येत आहेत. पर्यटन विकासासाठी लोणार सरोवर, सिंदखेड राजा आणि शेगाव या स्थळांचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. १ मेपासून देशभर "जनगणना २०२६" सुरु होणार असून देशाच्या विकासासाठी जनगणना अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळची जनगणना आधुनिक आणि डिजिटल पद्धतीने होणार असून जनगणना दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात स्वगणना दि. १ ते १५ मे या कालावधीत तर दुसऱ्या टप्प्यात घरगणना दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी अचूक माहिती देत या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ना. मकरंद पाटील यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारंभात पोलीस विभागाने शानदार पथसंचलन केले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश मोरे यांनी केले. पोलीस दलात केलेल्या प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस उपनिरिक्षक सुनिल राऊत व पोलीस हवालदार संजय नागवे यांना सन्मानित करण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार सन 2025-26 साठी ग्राम महसुल अधिकारी अनुराधा लवंगे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. माहिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यातल महिला व बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आशा सिरसाठ, रजनी जुळे, वर्षा पालकर व वृषाली बोंदे या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

8 hrs ago
user_Pathan juber
Pathan juber
बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
8 hrs ago
989be23a-051e-41e5-8f76-b4b06f5e8dbb

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
    1
    बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले.
पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते. यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले. अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.
    1
    महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते.
यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले.
अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    17 hrs ago
  • पत्रकाराच्या वाढदिवसानिमित्त... तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या
    1
    पत्रकाराच्या वाढदिवसानिमित्त... तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या
    user_Gajanan Dhandare
    Gajanan Dhandare
    News Anchor खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ​खामगाव : येत्या १ मे ते १५ मे या कालावधीत होऊ घातलेल्या महत्त्वपूर्ण जनगणनेच्या पार्श्वभूमीवर, खामगावचे तहसीलदार तथा जनगणना चार्ज अधिकारी सुनील पाटील यांनी नागरिकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी या प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. ​यावेळी बोलताना सुनील पाटील म्हणाले की, १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिक स्वतःहून आपली आणि आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरू शकतात. यासाठी प्रशासनाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन विचारलेल्या ३३ प्रश्नांची अचूक माहिती भरू शकतात.नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय असेल. ही माहिती कोणत्याही कायद्यान्वये इतर कोणालाही दिली जात नाही, याची खात्रीही त्यांनी यावेळी दिली.नागरिकांनी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर त्यांना एक 'SE-ID' (Self Enumeration ID) कोड प्राप्त होईल. यानंतर, जेव्हा प्रगणक (Enumerator) प्रत्यक्ष घरी येतील, तेव्हा त्यांना फक्त हा कोड दाखवणे पुरेसे ठरेल. या कोडच्या आधारे आपली माहिती प्रणालीमध्ये पडताळली (Confirm) जाईल, ज्यामुळे नागरिकांचा वेळही वाचणार आहे. ​तहसीलदारांनी स्पष्ट केले की, जनगणनेची ही माहिती केवळ राज्याच्या आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यासाठी वापरली जाते. सरकारी योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी ही आकडेवारी आधारभूत असते. त्यामुळे खामगाव तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाची अचूक माहिती नोंदवून या राष्ट्रीय कार्यात आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
    1
    ​खामगाव : येत्या १ मे ते १५ मे या कालावधीत होऊ घातलेल्या महत्त्वपूर्ण जनगणनेच्या पार्श्वभूमीवर, खामगावचे तहसीलदार तथा जनगणना चार्ज अधिकारी सुनील पाटील यांनी नागरिकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी या प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. ​यावेळी बोलताना सुनील पाटील म्हणाले की, १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिक स्वतःहून आपली आणि आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरू शकतात. यासाठी प्रशासनाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन विचारलेल्या ३३ प्रश्नांची अचूक माहिती भरू शकतात.नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय असेल. ही माहिती कोणत्याही कायद्यान्वये इतर कोणालाही दिली जात नाही, याची खात्रीही त्यांनी यावेळी दिली.नागरिकांनी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर त्यांना एक 'SE-ID' (Self Enumeration ID) कोड प्राप्त होईल. यानंतर, जेव्हा प्रगणक (Enumerator) प्रत्यक्ष घरी येतील, तेव्हा त्यांना फक्त हा कोड दाखवणे पुरेसे ठरेल. या कोडच्या आधारे आपली माहिती प्रणालीमध्ये पडताळली (Confirm) जाईल, ज्यामुळे नागरिकांचा वेळही वाचणार आहे. ​तहसीलदारांनी स्पष्ट केले की, जनगणनेची ही माहिती केवळ राज्याच्या आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यासाठी वापरली जाते. सरकारी योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी ही आकडेवारी आधारभूत असते. त्यामुळे खामगाव तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाची अचूक माहिती नोंदवून या राष्ट्रीय कार्यात आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Electrician सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मका काढण्यासाठी गेलेल्या तरूणाचा हडम मशिनीत अडकून दुर्दैवी मृत्यू..जळगाव जामोद तालुक्यातील घटना...
    1
    मका काढण्यासाठी गेलेल्या तरूणाचा हडम मशिनीत अडकून दुर्दैवी मृत्यू..जळगाव जामोद तालुक्यातील घटना...
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल मधील शेतकऱ्यांनी महावितरणच्या विविध समस्यांची निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे यामध्ये भराडी सर्कलमधील विविध गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती व तसेच भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पाटील यांचीही यावेळी उपस्थित होती
    1
    सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल मधील शेतकऱ्यांनी महावितरणच्या विविध समस्यांची निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे यामध्ये भराडी सर्कलमधील विविध गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती व तसेच भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पाटील यांचीही यावेळी उपस्थित होती
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • ​खामगाव : खामगाव-शेलोडी मार्गावर काल, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची अमोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चारही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी शेलोडी रोडवरून दोन दुचाकी भरधाव वेगाने जात असताना त्यांचा एकमेकांवर ताबा सुटला आणि अमोरासमोर धडक झाली. या अपघातात इकराम गफ्फार गवळी (वय २९), शे. अदनान शे. इरफान (वय २४), मुन्ना एजाज खान (वय २९, तिघेही रा. मोठे प्लॉट, खामगाव) आणि सौरव बलदेव भारवाड (वय १८, रा. शेलोडी) हे चौघे जण गंभीर जखमी झाले.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चौघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), अकोला येथे रेफर केले आहे.
    1
    ​खामगाव :  खामगाव-शेलोडी मार्गावर काल, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची अमोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चारही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी शेलोडी रोडवरून दोन दुचाकी भरधाव वेगाने जात असताना त्यांचा एकमेकांवर ताबा सुटला आणि अमोरासमोर धडक झाली. या अपघातात इकराम गफ्फार गवळी (वय २९), शे. अदनान शे. इरफान (वय २४), मुन्ना एजाज खान (वय २९, तिघेही रा. मोठे प्लॉट, खामगाव) आणि सौरव बलदेव भारवाड (वय १८, रा. शेलोडी) हे चौघे जण गंभीर जखमी झाले.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चौघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), अकोला येथे रेफर केले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.