logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते. यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले. अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.

2 days ago
user_SHEGAONlive
SHEGAONlive
Local News Reporter Buldana, Buldhana•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जलंब–माटरगाव रोडवर    कंपनीच्या आरएमसी प्लांटचा बेफिकीर कारभार; ओव्हरलोड टिप्परमुळे मोटरसायकलस्वारांच्या जीवितास धोका
    1
    जलंब–माटरगाव रोडवर    कंपनीच्या आरएमसी प्लांटचा बेफिकीर कारभार; ओव्हरलोड टिप्परमुळे मोटरसायकलस्वारांच्या जीवितास धोका
    user_राजु पाटील घाटे महाराष्ट्र दर्शन न्युज
    राजु पाटील घाटे महाराष्ट्र दर्शन न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • तथागतांच्या शांतीचा संदेश आणि महामानवाच्या अस्थिधातूंचे दर्शन; बुलढाण्यात निघाली भव्य धम्म शांती रॅली.
    1
    तथागतांच्या शांतीचा संदेश आणि महामानवाच्या अस्थिधातूंचे दर्शन; बुलढाण्यात निघाली भव्य धम्म शांती रॅली.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by नज़ीर रज़वी
    1
    Post by नज़ीर रज़वी
    user_नज़ीर रज़वी
    नज़ीर रज़वी
    Advertising Photographer नांदुरा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    30 min ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Architect सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by नंदकिशोर साखरकर
    1
    Post by नंदकिशोर  साखरकर
    user_नंदकिशोर  साखरकर
    नंदकिशोर साखरकर
    Chauffeur service मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • भोकरदन पंचायत समितीच्या पाठीमागे राहणाऱ्या वडार समाजाच्या लोकांच्या घरावर नगरपरिषदेने अतिक्रमणच्या नावाखाली चालवली त्याच नागरिकांनी आज कामगार दिनी भोकरदन नगर परिषद मध्ये राडा केलाय
    1
    भोकरदन पंचायत समितीच्या पाठीमागे राहणाऱ्या वडार समाजाच्या लोकांच्या घरावर नगरपरिषदेने अतिक्रमणच्या नावाखाली चालवली त्याच नागरिकांनी आज कामगार दिनी भोकरदन नगर परिषद मध्ये राडा केलाय
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील मसला येथे हजरत भिकनशहा वली बाबांच्या यात्रेस उत्साहात सुरुवात सिल्लोड/मसला: सिल्लोड तालुक्यातील मसला (बु.) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत भिकनशहा वली बाबा यांच्या उरुसाला (यात्रेला) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त मसला परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल यात्रेच्या पहिल्या दिवशी परंपरेनुसार संदल मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत 'या बाबा, मदतीला' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दर्गा शरीफवर संदल चढवल्यानंतर विशेष प्रार्थना आणि 'दुवा' करण्यात आली. यात्रेचे मुख्य आकर्षण मसला येथील ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याने येथे विविध प्रकारची दुकाने आणि करमणुकीची साधने दाखल झाली आहेत. पाळणे आणि खेळणी: लहान मुलांसाठी आकाशपाळणे, ब्रेक डान्स आणि विविध प्रकारची खेळणी यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. खाद्यपदार्थ: जिलेबी, भजी आणि इतर गोड पदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. व्यापार: संसारोपयोगी वस्तू, मातीची भांडी आणि कपड्यांची दुकाने यात्रेत मोठ्या प्रमाणावर थाटली गेली आहेत. प्रशासन व कमिटीची जय्यत तयारी यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्गा कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. "ही यात्रा केवळ एका धर्माची नसून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. तालुक्यातील हजारो भाविक श्रद्धेने येथे नतमस्तक होतात." > — स्थानिक ग्रामस्थ व यात्रा कमिटी सदस्य पुढील दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत कुस्त्यांचा हंगामाही होण्याची शक्यता असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
    3
    सिल्लोड तालुक्यातील मसला येथे हजरत भिकनशहा वली बाबांच्या यात्रेस उत्साहात सुरुवात
सिल्लोड/मसला: सिल्लोड तालुक्यातील मसला (बु.) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत भिकनशहा वली बाबा यांच्या उरुसाला (यात्रेला) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त मसला परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
यात्रेच्या पहिल्या दिवशी परंपरेनुसार संदल मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत 'या बाबा, मदतीला' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दर्गा शरीफवर संदल चढवल्यानंतर विशेष प्रार्थना आणि 'दुवा' करण्यात आली.
यात्रेचे मुख्य आकर्षण
मसला येथील ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याने येथे विविध प्रकारची दुकाने आणि करमणुकीची साधने दाखल झाली आहेत.
पाळणे आणि खेळणी: लहान मुलांसाठी आकाशपाळणे, ब्रेक डान्स आणि विविध प्रकारची खेळणी यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.
खाद्यपदार्थ: जिलेबी, भजी आणि इतर गोड पदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
व्यापार: संसारोपयोगी वस्तू, मातीची भांडी आणि कपड्यांची दुकाने यात्रेत मोठ्या प्रमाणावर थाटली गेली आहेत.
प्रशासन व कमिटीची जय्यत तयारी
यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्गा कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
"ही यात्रा केवळ एका धर्माची नसून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. तालुक्यातील हजारो भाविक श्रद्धेने येथे नतमस्तक होतात." > — स्थानिक ग्रामस्थ व यात्रा कमिटी सदस्य
पुढील दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत कुस्त्यांचा हंगामाही होण्याची शक्यता असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • बुलढाणा पुलिस अधीक्षक निलेश तांबे का संदेश जनगणना के ताल्लुक से
    1
    बुलढाणा पुलिस अधीक्षक निलेश तांबे का संदेश जनगणना के ताल्लुक से
    user_नज़ीर रज़वी
    नज़ीर रज़वी
    Advertising Photographer नांदुरा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.