मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमनाबाबत व्यापक मोहिम हाती घेणार; -जिल्हाधिकारी आशिष येरेकर अमरावती : जिल्हा स्त्री रूग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी, यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी आगीचा प्रकार घडू नये, यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज फायर ऑडीट आणि फायर सेफ्टी ऑडीट, इतर उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपायायोजना करण्यावर भर दिला. यासाठी जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापना आणि शासकीस कार्यालयांची येत्या आठ दिवसांत पाहणी करावी. यात प्रामुख्याने अग्निशमनाबाबत उपाययोजना सुचविण्यात याव्यात. तसेच या सूचना पुढील आठ दिवसात अंमलात आणाव्यात. यासाठी आस्थापनांना जबाबदार धरून त्यांच्याकडून अग्निशमन यंत्रणांची दुरूस्ती, देखभाल आवश्यक असलेल्या ठिकाणी नवीन यंत्रणा बसविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत राखण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दर महिन्याला देण्यात यावे. तसेच ही यंत्रणा संबंधित आस्थापनांना सोपविताना जबाबदारी निश्चित करण्यात यावी. जोखमीच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा स्वयंचलित मोडमध्ये ठेवण्यात यावी. तसेच याची नियमित देखभाल आणि दुरूस्ती करण्यावर भर देण्यात यावा. यात प्रामुख्याने स्वयंचलित यंत्रणा कार्यक्षम असल्याची खात्री करावी. अग्निशमन यंत्र वापराबाबत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात यावे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी याचे प्रात्यक्षिक घेण्यात यावे. यातील सुरक्षा विषयक कामांमध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. रूग्णालयात विजेच्या नियंत्रित वापरावर असलेल्या वैद्यकीय उपकरणांना स्टॅबिलायझर जोडण्यात यावेत. तसेच स्मोक डिटेक्टर कार्यान्वीत होण्यासाठी या यंत्रणेची नियमीत देखभाल करण्यात यावी. मोठ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार फायर सिलींडर, होज पाईप किंवा स्प्रिंकलर व्यवस्था करण्यात यावी. अग्निशमन यंत्रणेच्या पाहणीसाठी शहरी भागात 50 आणि ग्रामीण भागात 50 टिम तयार करण्यात येतील. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अग्निशमनाबाबत सुधारणा करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.
मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमनाबाबत व्यापक मोहिम हाती घेणार; -जिल्हाधिकारी आशिष येरेकर अमरावती : जिल्हा स्त्री रूग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी, यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी आगीचा प्रकार घडू नये, यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज फायर ऑडीट आणि फायर सेफ्टी ऑडीट, इतर उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपायायोजना करण्यावर भर दिला. यासाठी जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापना आणि शासकीस कार्यालयांची येत्या आठ दिवसांत पाहणी करावी. यात प्रामुख्याने अग्निशमनाबाबत उपाययोजना सुचविण्यात याव्यात. तसेच या सूचना पुढील आठ दिवसात अंमलात आणाव्यात. यासाठी आस्थापनांना जबाबदार धरून त्यांच्याकडून अग्निशमन यंत्रणांची दुरूस्ती, देखभाल आवश्यक असलेल्या ठिकाणी नवीन यंत्रणा बसविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत राखण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दर महिन्याला देण्यात यावे. तसेच ही यंत्रणा संबंधित आस्थापनांना सोपविताना जबाबदारी निश्चित करण्यात यावी. जोखमीच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा स्वयंचलित मोडमध्ये ठेवण्यात यावी. तसेच याची नियमित देखभाल आणि दुरूस्ती करण्यावर भर देण्यात यावा. यात प्रामुख्याने स्वयंचलित यंत्रणा कार्यक्षम असल्याची खात्री करावी. अग्निशमन यंत्र वापराबाबत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात यावे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी याचे प्रात्यक्षिक घेण्यात यावे. यातील सुरक्षा विषयक कामांमध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. रूग्णालयात विजेच्या नियंत्रित वापरावर असलेल्या वैद्यकीय उपकरणांना स्टॅबिलायझर जोडण्यात यावेत. तसेच स्मोक डिटेक्टर कार्यान्वीत होण्यासाठी या यंत्रणेची नियमीत देखभाल करण्यात यावी. मोठ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार फायर सिलींडर, होज पाईप किंवा स्प्रिंकलर व्यवस्था करण्यात यावी. अग्निशमन यंत्रणेच्या पाहणीसाठी शहरी भागात 50 आणि ग्रामीण भागात 50 टिम तयार करण्यात येतील. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अग्निशमनाबाबत सुधारणा करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.
- सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.1
- हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 26/08/26 कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले. या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.4
- अकोट शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपीकडुन ०८ चोरीच्या मोटरसायकली व ०२ मोटारसायकल इंजिन व मोटरसायकलचे स्पेअर पार्ट असा एकुन ६,०५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त. अकोट शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपीकडुन ०८ चोरीच्या मोटरसायकली व ०२ मोटारसायकल इंजिन व मोटरसायकलचे स्पेअर पार्ट असा एकुन ६,०५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त. अकोट तालुका प्रतिनिधी.. पोलीस ठाणे अकोट शहर येथे अपराध क्रमांक ६८४/२०२६ कलम ३०३ (२) बि.एन.एस-२०२३ अन्वये दिनांक १६/०८/२०२६ रोजी दाखल असुन सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे शिवराज मोहन हाडोळे वय ३२ वर्षे रा. नंदीपेठ अकोट यांनी रिपोर्ट दिला की, दि.१६/०८/२०२६ रोजी रात्री ०२/१५ वा चे सुमारास त्याची एम एच ३० बि. एच ७६९९ क्रमांकाची काळया रंगाची स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल जिचा इंजिन क्रमांक HA10AGKHA20067 व चेसीस क्रमांक MBLHAW082KHA04910 किमंत ७०,०००/- रू ची घरासमोर उभी केली होती सकाळी ०५/३० वाजता त्याचा लहान भाऊ सुरज हाडोळे हा शेतात जाण्यासाठी उठला असता त्याला फिर्यादीने उभी करून ठेवलेली मोटरसायकल त्याला दिसली नाही. म्हणुन त्याने फिर्यादीस उठवुन विचारले की तु आपली मोटरसायकल कोणाला दिली का तर फिर्यादीने उठुन दारात पाहीले असता त्याने घरासमोर उभी करून ठेवलेली स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल क्रमांक एम.एच ३० बि.एच ७६९९ किमंत ७०,०००/- रू काळया रंगाची दिसली नाही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे. अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासादरम्यान तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशईत आरोपी गजानन प्रभुदास रायबोले वय २३ वर्षे, अब्दुल जावेद अब्दुल जमील जमादार वय ३० वर्षे दोन्ही रा. इंदिरा नगर येवदा ता. दर्यापुर जि. अमरावती यांना ताब्यात घेवुन कसुन चौकशी केली असता त्यांनी अकोट शहर व परिसरात मोटारसायकल चोरी केल्याची माहीती दिली. वरून दोन्ही आरोपीतांचे घराची झडती घेतली असता आरोपीकडुन पोलीस स्टेशन अकोट शहर येथे दाखल अप क्रमांक १) ६८४/२०२६ कलम ३०३(२) बि.एन.एस-२०२३ २) अप क्रमांक ७१५/२०२६ कलम ३०३(२) बि.एन.एस-२०२३ मधील मोटरसायकली मिळुन आल्या असुन त्याचेकडुन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. शाईन मोटर सायकल काळया रंगाची ७०,०००, हिरो होन्डा कंपनीची काळया रंगाची निळा पट्टा असलेली स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल ६५,०००/-,हिरो होन्डा कंपनीची सिल्वर रंगाची पिवळा पट्टा असलेली स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल ६०,०००/-,हिरो होन्डा कंपनीची काळया रंगाची स्प्लेन्डर प्लस मोटरसायकल ६५,०००/-, हिरो होन्डा कंपनीची काळया रंगाची निळा व पांढरा रंगाचे पट्टे असलेली स्प्लेन्डर प्लस मो सा ६५,०००/-, हिरो कंपनीची काळया रंगाची सिल्हर रंगाचे पट्टे असलेली स्प्लेन्डर प्लस मो सा६५०००, हिरो कंपनीची काळया रंगाची सिल्वर रंगाचे पट्टे असलेली स्प्लेन्डर प्लस मो सा ६०,०००/- ,हिरो होन्डा कंपनीची निळ्या रंगाची पेंशन प्लस मो सा ६५,०००/-, हिरो कंपनीचे मोटरसायकल इंजिन ३५,०००/-,हिरो कंपनीचे मोटरसायकल इंजिन ३५,०००/-, एक मोटरसायकल चेसीस १०,०००/-, मोटरसायकल चे वेगवेगळे स्पेअर पार्ट १०,०००/- असा एकुन दोन्ही आरोपीकडुन ६,०५,०००/- रू चा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला असुन सदर जप्त करण्यात आलेल्या वाहनाबाबत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधिक्षक बि. चंद्रकांत रेड्डी मा. उपविभागिय पोलिस अधिकारी निखील पाटील, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार किशोर जुनघरे तसेच गुन्हे शोध पथक प्रमुख पोउपनि निलेश बारहाते, व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोहेकॉ नरेंद्र जाधव, पोहेकॉ रामेश्वर भगत, पोहेकॉ कपिल राठोड, पोहेकॉ नितेश सोळंके, पोहेकॉ सुबोध खंडारे यांनी केली.4
- *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.2
- देश की शिक्षा पर खुलकर चर्चा | बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू Rok Tok Hindustan news imran shaikh देश की शिक्षा व्यवस्था, मौजूदा चुनौतियों और बच्चों के भविष्य जैसे अहम मुद्दों पर बाबा खान से खास बातचीत। देखिए Rok Tok Hindustan News पर बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू और जानिए शिक्षा को लेकर उनकी बेबाक राय। सच • साहस • सवाल | Rok Tok Hindustan News #RokTokHindustanNews #बाबाखान #शिक्षा #Education #EducationSystem #ExclusiveInterview #देशकीशिक्षा #MumbaiNews #MumbraNews #News #BreakingNews1
- पिपंळगाव मा येथील वार्ड 3 मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था पिपंळगाव मा येथील वार्ड न 3 मध्ये नागरिकांना येण्या ज्याण्याचा रस्था अतिशय गंभीर अवस्थेत असल्या मुळे नागरिक अतिशय संस्तप्त झाले तरी त्यांना लवकरात लवकर ग्रामपंचायत ने जाण्या योग्य रस्ता करून द्यावा गावा मध्ये अनेक विकास कामा करिता दरवर्षी निधी येतो तर तो कुठे खर्च केला जातो असे आवश्यक असलेले काम जर होत नसेल1
- ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.4
- *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास* वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.2