महागाव हद्दीत अवैध देशी दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा धडाका चारचाकीसह ३० पेट्या बॉबी संत्रा देशी दारू जप्त; ६.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत महागाव : यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईला वेग आला असून, महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील धनोडा येथे अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. या कारवाईत टाटा टियागो EV चारचाकीसह तब्बल ३० पेट्या बॉबी संत्रा देशी दारू असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात ईद-ए-मिलाद बंदोबस्त तसेच आरोपी शोध व अवैध धंद्यांविरोधातील कारवाईसाठी गस्त घालत होते. त्यावेळी धनोडा येथे एका चारचाकी वाहनातून अवैधरीत्या देशी दारू विक्रीसाठी नेली जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह धनोडा येथे सापळा रचून टाटा टियागो EV क्रमांक MH-29-CB-2623 या वाहनाची झडती घेतली. वाहनामध्ये १० पोती आढळून आली. प्रत्येक पोत्यात तीन पेट्या, अशा एकूण ३० पेट्या होत्या. प्रत्येक पेटीत ९० मिली क्षमतेच्या १०० बाटल्या असल्याने एकूण ३,००० नग देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारूची किंमत १ लाख २० हजार रुपये, तर वाहनाची किंमत धरून एकूण मुद्देमाल ६ लाख २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मनोज परसराम कदम (वय ४०, रा. गणपती चौक, वॉर्ड क्रमांक १६, महागाव) याच्याविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचा इशारा! यवतमाळ जिल्ह्यात अवैध दारू, अवैध शस्त्रसाठा, अवैध उत्खनन तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला प्रभावी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धिरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी केली. अवैध दारूचा साठा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधातील या कारवाईमुळे महागाव परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून, आगामी काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवायांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

- कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे. सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .1
- ईद-ए-मीलादुन्नबी च्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात पोलिसांचे भव्य पथ संचलन शहरात सुरक्षेचा आढावा1
- मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे1
- 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट1
- सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते1
- मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले. तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे. सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.1
- 🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात! 📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes1
- हदगावा तालुक्यातील तामसा येथे भव्य भोम प्रदोष कावड यात्रा काढण्यात आली.1