थेरगाव येथील नदी प्रदूषणाची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून पाहणी; कारवाईचे आदेश पिंपरी: थेरगाव येथील नदी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येची गंभीर दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक गोविंद बारणे यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सभापती अभिषेक बारणे यांनी पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि ‘ग’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत थेरगाव बोट क्लब परिसराचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नदीपात्रात साचलेला कचरा, प्रक्रीया न करता सोडले जाणारे सांडपाणी आणि औद्योगिक प्रदुषणामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती समोर आली. या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य, शेती आणि नदीतील जैवविविधता धोक्यात आल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पाहणी दौऱ्यात नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या आणि कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याच्या सूचनाही सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. "पवना नदीचे प्रदूषण ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहराचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी कटिबद्ध आहोत. नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर आणि बेकायदेशीरपणे सांडपाणी सोडणाऱ्यांवर आता केवळ दंड करून थांबणार नाही, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाकडून नदीपात्र स्वच्छतेची विशेष मोहीम तातडीने राबवण्यात येईल." - अभिषेक बारणे, सभापती - स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.
थेरगाव येथील नदी प्रदूषणाची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून पाहणी; कारवाईचे आदेश पिंपरी: थेरगाव येथील नदी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येची गंभीर दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक गोविंद बारणे यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सभापती अभिषेक बारणे यांनी पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि ‘ग’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत थेरगाव बोट क्लब परिसराचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नदीपात्रात साचलेला कचरा, प्रक्रीया न करता सोडले जाणारे सांडपाणी आणि औद्योगिक प्रदुषणामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती समोर आली. या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य, शेती
आणि नदीतील जैवविविधता धोक्यात आल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पाहणी दौऱ्यात नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या आणि कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याच्या सूचनाही सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. "पवना नदीचे प्रदूषण ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहराचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी कटिबद्ध आहोत. नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर आणि बेकायदेशीरपणे सांडपाणी सोडणाऱ्यांवर आता केवळ दंड करून थांबणार नाही, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाकडून नदीपात्र स्वच्छतेची विशेष मोहीम तातडीने राबवण्यात येईल." - अभिषेक बारणे, सभापती - स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Maharashtra 18 news1
- अंजनगाव खेलोबा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून दोन समाजामध्ये वाद1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे. सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत.... #पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या #PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews1
- पाकिट संस्कृतीमुळे पुणे बुडाले का? मोठा प्रश्न!1
- Post by Kishor subhash jadhav1
- Post by Prasad Panchal1
- राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात गारपीठाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कांदा, मका, गहू, भाजीपाला पिके भुईसपाट; तात्काळ नुकसान भरपाईची मागणी1