logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खानापूर-आटपाडी मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यामुळे आता मतदारसंघातील तलाव, बंधारे आणि जलसाठे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे. या पाण्याचा खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. खानापूर–आटपाडी हा भाग कायम दुष्काळाच्या छायेत राहिलेला आहे. त्यातच 'अल निनो'च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्याने आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आमदार सुहास बाबर यांनी सुरुवातीपासूनच पाणी प्रश्नाला प्राधान्य दिले. त्यांनी जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत टेंभू योजना तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच मतदारसंघातील सर्व लघु पाटबंधारे तलाव, बंधारे व जलसाठे टेंभूच्या पाण्याने भरून घेण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी लावून धरली होती. सध्या कृष्णा नदी खोऱ्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करून टेंभू उपसा सिंचन योजनेद्वारे हे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व लघुपाटबंधारे तलाव व जलसाठे भरून घेतल्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार बाबर यांनी व्यक्त केला आहे.

1 hr ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
1 hr ago
2383a0d8-ace7-4a7c-bd33-13809a92ab89

खानापूर-आटपाडी मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यामुळे आता मतदारसंघातील तलाव, बंधारे आणि जलसाठे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे. या पाण्याचा खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. खानापूर–आटपाडी हा भाग कायम दुष्काळाच्या छायेत राहिलेला आहे. त्यातच 'अल निनो'च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्याने आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आमदार सुहास बाबर यांनी सुरुवातीपासूनच पाणी प्रश्नाला प्राधान्य दिले. त्यांनी जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत टेंभू योजना तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच मतदारसंघातील सर्व लघु पाटबंधारे तलाव, बंधारे व जलसाठे टेंभूच्या पाण्याने भरून घेण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी लावून धरली होती. सध्या कृष्णा नदी खोऱ्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करून टेंभू उपसा सिंचन योजनेद्वारे हे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व लघुपाटबंधारे तलाव व जलसाठे भरून घेतल्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार बाबर यांनी व्यक्त केला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कराडमधील शेनोली येथे एमडी ड्रग्स विक्रीचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एमडी ड्रग्ससह दोघांना अटक केली असून ड्रग्स विक्रीचा त्यांचा कट यशस्वीरीत्या हाणून पाडला आहे.
    1
    कराडमधील शेनोली येथे एमडी ड्रग्स विक्रीचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एमडी ड्रग्ससह दोघांना अटक केली असून ड्रग्स विक्रीचा त्यांचा कट यशस्वीरीत्या हाणून पाडला आहे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • विनायक राऊत यांच्या कुटुंबीयांभोवती सध्या वादाचे मोठे वादळ निर्माण झाले आहे. एका विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेच्या या तक्रारीमुळे विनायक राऊत यांचे कुटुंबीय सध्या अडचणीत सापडले असून या प्रकरणावरून जोरदार वाद सुरू झाला आहे.
    1
    विनायक राऊत यांच्या कुटुंबीयांभोवती सध्या वादाचे मोठे वादळ निर्माण झाले आहे. एका विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेच्या या तक्रारीमुळे विनायक राऊत यांचे कुटुंबीय सध्या अडचणीत सापडले असून या प्रकरणावरून जोरदार वाद सुरू झाला आहे.
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील बारामती येथील उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंढरपूर वारीदरम्यान माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखी दर्शनानंतर त्यांनी थेट वारकऱ्यांसोबत पंगतीत बसून भोजन केले. या कृतीतून सुनेत्रावहिनींनी अजितदादांच्या साधेपणाचा वारसा पुढे चालवत वारकरी परंपरेचा मोठा सन्मान केला आहे. वारीच्या या निमित्ताने त्यांनी अजितदादांचा साधेपणा जपतानाच सर्वांना संस्कार आणि सेवाभावाचा एक सुंदर संदेश दिला आहे।
    1
    पुणे जिल्ह्यातील बारामती येथील उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंढरपूर वारीदरम्यान माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखी दर्शनानंतर त्यांनी थेट वारकऱ्यांसोबत पंगतीत बसून भोजन केले. या कृतीतून सुनेत्रावहिनींनी अजितदादांच्या साधेपणाचा वारसा पुढे चालवत वारकरी परंपरेचा मोठा सन्मान केला आहे. वारीच्या या निमित्ताने त्यांनी अजितदादांचा साधेपणा जपतानाच सर्वांना संस्कार आणि सेवाभावाचा एक सुंदर संदेश दिला आहे।
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमधील ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मूलभूत हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. महांतेश लक्ष्मण हत्तूरे (मु. आळगे, ता. अक्कलकोट) यांनी या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाकडून मूलभूत सुविधा पुरवण्यात सतत अपयश येत असल्याचा आरोप करत, महाजन आयोगाच्या शिफारशींनुसार अक्कलकोट व दक्षिण सोलापूरमधील काही भागाचा कर्नाटकात समावेश करण्याचा विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या मागणीसाठी आता ग्रामसभांमधून रीतसर ठराव मंजूर करून ते थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवले जाणार असल्याचे महांतेश हत्तूरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, सर्व सुविधा मिळेपर्यंत आंदोलनाची ही भूमिका कायम ठेवली जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
    1
    सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमधील ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मूलभूत हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. महांतेश लक्ष्मण हत्तूरे (मु. आळगे, ता. अक्कलकोट) यांनी या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाकडून मूलभूत सुविधा पुरवण्यात सतत अपयश येत असल्याचा आरोप करत, महाजन आयोगाच्या शिफारशींनुसार अक्कलकोट व दक्षिण सोलापूरमधील काही भागाचा कर्नाटकात समावेश करण्याचा विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

या मागणीसाठी आता ग्रामसभांमधून रीतसर ठराव मंजूर करून ते थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवले जाणार असल्याचे महांतेश हत्तूरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, सर्व सुविधा मिळेपर्यंत आंदोलनाची ही भूमिका कायम ठेवली जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सहाय्यक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर थेट कर्जत कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.
    1
    अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सहाय्यक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर थेट कर्जत कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • सोलापूर येथील रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी अभिनेते अरबाज शेख यांच्या वडिलांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या भेटीदरम्यान चिवटे यांनी तेथील उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून शेख यांच्या उपचारांबाबत सविस्तर माहिती घेतली आणि त्यांची योग्य ती काळजी घेण्याची विनंती प्रशासनाला केली. यासोबतच, त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून (CM Relief Fund) जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत.
    1
    सोलापूर येथील रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी अभिनेते अरबाज शेख यांच्या वडिलांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या भेटीदरम्यान चिवटे यांनी तेथील उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून शेख यांच्या उपचारांबाबत सविस्तर माहिती घेतली आणि त्यांची योग्य ती काळजी घेण्याची विनंती प्रशासनाला केली. यासोबतच, त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून (CM Relief Fund) जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळल्याने काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्याला अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
    1
    मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळल्याने काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.

या दुर्घटनेनंतर घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्याला अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.