logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जातीअंत संघर्ष समितीचे जिल्हा अधिवेशन संपन्न कॉ.गंगाधर गायकवाड यांची जिल्हा निमंत्रकपदी एकमताने निवड नांदेड : जातीव्यवस्था, सामाजिक विषमता आणि जातीय भेदभावाविरोधात व्यापक जनजागृती व संघर्ष उभारण्याच्या निर्धाराने जातीअंत संघर्ष समितीचे नांदेड जिल्हा अधिवेशन शिवाजी नगर येथील हॉटेल विसावा येथे १४ सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले.या अधिवेशनाचे उदघाटक डॉ.सचिन सरोदे तर स्वागताध्यक्ष डॉ. प्रा.राजेंद्र गोनारकर हे होते. महाराष्ट्र राज्याचे प्रभारी कॉ.शैलेंद्र कांबळे (मुंबई), व राज्याचे निमंत्रक कॉ.बब्रुवहन पोटभरे आणि जनवादी चळवळीचे नेते कॉ.विजय गाभने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या अधिवेशनात दलित अत्याचारावर चर्चा करण्यात आली. अधिवेशनात समितीच्या नूतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून कॉ.गंगाधर गायकवाड यांची जिल्हा निमंत्रकपदी एकमताने निवड करण्यात आली. अधिवेशनात जातीय अत्याचार, सामाजिक विषमता, भेदभाव, अंधश्रद्धा तसेच जातीव्यवस्थेच्या मुळावर प्रहार करण्यासाठी संघटितपणे संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कॉ.गंगाधर गायकवाड (निमंत्रक), कॉ. जनार्धन काळे (कार्यकारी निमंत्रक) तर डॉ.प्रा.आदिनाथ इंगोले (सह निमंत्रक), व सदस्य म्हणून कॉ.विजय लोहबंदे, आडेलू बोनगीर, आनंद लव्हाळे, मेघाताई इंगोले, संगीता गाभने, माधव देशटवाड, प्रा.पंजाबराव शेरे, जयराज गायकवाड, उत्तम कोमवाड यांची जिल्हा कमिटी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. उर्वरित पाच जागा रिक्त ठेवण्यात आल्या. यावेळी, अखिल भारतीय किसान सभेचे नेते कॉ.अर्जुन आडे, राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंचचे नेते कॉ.शंकर सिडाम, सीटू राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार, जमसं च्या राज्य सचिव मंडळ सदस्या व जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड,महाराष्ट्र राज्य शेत मजूर युनियनचे सह सचिव कॉ. विनोद गोविंवार, सीटू राज्य कमिटी सदस्या कॉ.करवंदा गायकवाड, एसएफआयच्या जिल्हा सचिव कॉ. मीना आरसे,डॉ.हेमंत कार्ले, ऍड. प्रशांत कोकणे,श्याम सरोदे, मंगेश वट्टेवाड, राहुल नरवाडे, कॉ. मारोती केंद्रे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात जातीअंताच्या चळवळीला अधिक व्यापक आणि संघटित स्वरूप देण्याचा निर्धार करण्यात आला. जातव्यवस्था नष्ट करा समताधिष्ठित समाज निर्माण करा या निर्धाराने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. कॉ.गंगाधर गायकवाड यांची निमंत्रकपदी झालेली निवड ही जातीअंताच्या चळवळीला नवी दिशा देणारी ठरणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

22 hrs ago
user_Mohammad Rafikh
Mohammad Rafikh
Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
22 hrs ago
34713a1e-c1d9-4052-9b8c-1cf5f3d0a3cd

More news from Maharashtra and nearby areas
  • “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक" “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"
    1
    “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - 
मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"
“ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - 
मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    9 hrs ago
  • महिना उलटला पाऊस नाही, विहिर बोरवेलला पुरेसे पाणी असूनही शेतातील वीज गुल,खरीप पिके धोक्यात,शेतकऱ्याचा टाहो हिंगोली जिल्ह्यात विशेषता कळमनुरी तालुक्यात एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके हातची गेली आहेत,तूर ,कापूस, सोयाबीन,हळद ही पिके पाऊस नसल्याने धोक्यात आली आहे.एकंदरीत तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.महिनाभरापासून पाऊस नाही विहिरी बोरला पुरेशी पाणी असताना देखील शेतातील वीज वारंवार गुण होत आहे त्यामुळे मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही,अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे कळमनुरी तालुक्यातील सांडस परीसरात शेतकऱ्यांनी या समस्या बद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे .या भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने येथील पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे .
    1
    महिना उलटला पाऊस नाही, विहिर बोरवेलला पुरेसे पाणी असूनही शेतातील वीज गुल,खरीप पिके धोक्यात,शेतकऱ्याचा टाहो

हिंगोली जिल्ह्यात विशेषता कळमनुरी तालुक्यात एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके हातची गेली आहेत,तूर ,कापूस, सोयाबीन,हळद ही पिके पाऊस नसल्याने धोक्यात आली आहे.एकंदरीत तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.महिनाभरापासून पाऊस नाही विहिरी बोरला पुरेशी पाणी असताना देखील शेतातील वीज वारंवार गुण होत आहे त्यामुळे मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही,अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे कळमनुरी तालुक्यातील सांडस परीसरात शेतकऱ्यांनी या समस्या बद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे .या भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने येथील पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • आकाशात चंद्र-चांदणीचा दुर्मिळ योग; मनमोहक दृश्याने वेधले लक्ष आकाश निरीक्षकांसाठी सोमवारी एक अनोखी पर्वणी ठरली. आकाशात चंद्राच्या कोरीसोबत तेजस्वी चांदणीचे मनोहारी दर्शन घडल्याने नागरिकांचे लक्ष या खगोलीय दृश्याकडे वेधले गेले. पावसाळ्यानंतर स्वच्छ होत चाललेल्या आकाशात चंद्राची कोर आणि जवळ चमकणारी चांदणी यांचे दृश्य अत्यंत आकर्षक दिसत होते. अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपत सोशल मीडियावर शेअर केले. खगोल अभ्यासकांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात आकाश निरीक्षणासाठी अनेक विशेष घटना घडत आहेत. १४ सप्टेंबर रोजी चंद्र, शुक्र आणि बुध यांच्या कोरीसदृश दृश्याचे दर्शन होणे ही विशेष खगोलीय घटना ठरली. सायंकाळच्या आकाशात चंद्राच्या आसपास दिसणारी तेजस्वी चांदणी पाहण्यासाठी नागरिकांनी काही काळ आकाशाकडे नजर लावली. निसर्गाचे हे सुंदर रूप पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खगोलीय घटनांबाबत वाढते कुतूहल अशा दुर्मीळ खगोलीय घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि खगोलप्रेमींमध्ये आकाश निरीक्षणाची उत्सुकता वाढत आहे. दुर्बीण नसतानाही काही घटना स्वच्छ आकाशात साध्या डोळ्यांनी पाहता येतात, त्यामुळे या घटनांकडे नागरिकांचे विशेष आकर्षण असते.
    1
    आकाशात चंद्र-चांदणीचा दुर्मिळ योग; मनमोहक दृश्याने वेधले लक्ष
आकाश निरीक्षकांसाठी सोमवारी एक अनोखी पर्वणी ठरली. आकाशात चंद्राच्या कोरीसोबत तेजस्वी चांदणीचे मनोहारी दर्शन घडल्याने नागरिकांचे लक्ष या खगोलीय दृश्याकडे वेधले गेले.
पावसाळ्यानंतर स्वच्छ होत चाललेल्या आकाशात चंद्राची कोर आणि जवळ चमकणारी चांदणी यांचे दृश्य अत्यंत आकर्षक दिसत होते. अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपत सोशल मीडियावर शेअर केले.
खगोल अभ्यासकांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात आकाश निरीक्षणासाठी अनेक विशेष घटना घडत आहेत. १४ सप्टेंबर रोजी चंद्र, शुक्र आणि बुध यांच्या कोरीसदृश दृश्याचे दर्शन होणे ही विशेष खगोलीय घटना ठरली.
सायंकाळच्या आकाशात चंद्राच्या आसपास दिसणारी तेजस्वी चांदणी पाहण्यासाठी नागरिकांनी काही काळ आकाशाकडे नजर लावली. निसर्गाचे हे सुंदर रूप पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
खगोलीय घटनांबाबत वाढते कुतूहल
अशा दुर्मीळ खगोलीय घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि खगोलप्रेमींमध्ये आकाश निरीक्षणाची उत्सुकता वाढत आहे. दुर्बीण नसतानाही काही घटना स्वच्छ आकाशात साध्या डोळ्यांनी पाहता येतात, त्यामुळे या घटनांकडे नागरिकांचे विशेष आकर्षण असते.
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    20 hrs ago
  • मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी सोनपेठ (दर्शन) :- तब्बल 35000 कोटी रुपयांचा खर्च सहा पदरी ग्रीन फील एक्सप्रेस वे आणि माळशिरस घाटात तब्बल आठ किलोमीटरचा भव्य असा बोगदा मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे कल्याण परिसराला मराठवाड्याची जोडणाऱ्या कल्याण ते लातूर जनकल्याण एक्सप्रेस वेला राज्य सरकारची मंजुरी दिलेली आहे सध्या लातूर ते कल्याण प्रवासासाठी 12 तास वेळ लागतो तू वेळ हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर चार तासाचा होणार आहे.
    1
    मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी 

मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी 
सोनपेठ (दर्शन) :- 
तब्बल 35000 कोटी रुपयांचा खर्च सहा पदरी ग्रीन फील एक्सप्रेस वे आणि माळशिरस घाटात तब्बल आठ किलोमीटरचा भव्य असा बोगदा मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे कल्याण परिसराला मराठवाड्याची जोडणाऱ्या कल्याण ते लातूर जनकल्याण एक्सप्रेस वेला राज्य सरकारची मंजुरी दिलेली आहे सध्या लातूर ते कल्याण प्रवासासाठी 12 तास वेळ लागतो तू वेळ हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर चार तासाचा होणार आहे.
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती गणेश चतुर्थी निमित्त चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
    1
    चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती 
गणेश चतुर्थी निमित्त चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद
    1
    परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद
    user_Beed News Express
    Beed News Express
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कृषी विभागाला निर्देश जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर व वस्तुनिष्ठ असा तालुका, पीकनिहाय अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक झाली. बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पावसातील खंड, खरीप पिकांची सद्य:स्थिती तसेच दुष्काळाच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शिवाजी बुचाले, जिल्ह्याचे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती.   जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ७९५.३ मि.मी. आहे. १३ सप्टेंबरअखेर ५०१.५ मि.मी. पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ६३.१ टक्के आहे. ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ ३०.२ टक्के पाऊस झाला आहे. या कालावधीत १४ ते १८ दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. सप्टेंबरमध्येही आतापर्यंत केवळ १७.५ मि.मी. पाऊस झाला आहे. या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निकषानुसार आवश्यक त्या उपाययोजनेसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा. कृषी विभागासह वरिष्ठ भूवैज्ञानिक, पशुसंवर्धन विभागाने समन्वय ठेवत आवश्यक ती कार्यवाही तत्काळ पार पाडावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले.
    1
    हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा
तातडीने सर्वेक्षण अहवाल करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कृषी विभागाला निर्देश

जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर व वस्तुनिष्ठ असा तालुका, पीकनिहाय अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक झाली. बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पावसातील खंड, खरीप पिकांची सद्य:स्थिती तसेच दुष्काळाच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शिवाजी बुचाले, जिल्ह्याचे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती.  
जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ७९५.३ मि.मी. आहे. १३ सप्टेंबरअखेर ५०१.५ मि.मी. पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ६३.१ टक्के आहे. ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ ३०.२ टक्के पाऊस झाला आहे. या कालावधीत १४ ते १८ दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. सप्टेंबरमध्येही आतापर्यंत केवळ १७.५ मि.मी. पाऊस झाला आहे. या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निकषानुसार आवश्यक त्या उपाययोजनेसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा. कृषी विभागासह वरिष्ठ भूवैज्ञानिक, पशुसंवर्धन विभागाने समन्वय ठेवत आवश्यक ती कार्यवाही तत्काळ पार पाडावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड
    1
    ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड
ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    11 hrs ago
  • भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या! राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन. भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या! राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन. सोनपेठ (दर्शन) :- छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आपले सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय द्यावेत. दि.१८ सप्टेंबर २०२६ ⏰ सकाळी १० ते सायंकाळी ६ 📍 आठही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष 🏛️ २१ सप्टेंबर २०२६ | सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात उच्चस्तरीय समिती नागरिक व संबंधित घटकांशी थेट चर्चा करणार. 📧 प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास लेखी अभिप्राय पाठवा आपला अभिप्राय — अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती परीक्षेकडे एक महत्त्वाचे पाऊल!
    1
    भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय द्या!
राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्याचे आवाहन.

छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी आपले सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय द्यावेत.
दि.१८ सप्टेंबर २०२६
⏰ सकाळी १० ते सायंकाळी ६
📍 आठही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष
🏛️ २१ सप्टेंबर २०२६ | सकाळी १०.३० वाजता
छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात उच्चस्तरीय समिती नागरिक व संबंधित घटकांशी थेट चर्चा करणार.
📧 प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास लेखी अभिप्राय पाठवा 
आपला अभिप्राय — अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती परीक्षेकडे एक महत्त्वाचे पाऊल!
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.